सप्टेंबरमध्ये पाच टक्के कमी पाऊस

हवामान खात्याचे भाकीत

0
224

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १२ सप्टेंबर
ऑगस्ट महिन्यात साधारण पाऊस झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात सुमारे पाच टक्के कमी पाऊस पडेल, असे भाकीत भारतीय हवामान खात्याने आज सोमवारी वर्तवले आहे. या महिन्यात देशाच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असली, तरी बहुतांश भागांत कमी पाऊस पडणार आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. पण, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आणि सप्टेंबरमध्ये कमी पाऊस होणार असल्याचे भाकीत असल्याने देशभरात शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत अजूनही पाहिजे तसा पाऊस झाला नसल्याने पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची शक्यता आहे. तुरळक अपवाद वगळता महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. मराठवाड्यातील काही भागात पावसाअभावी पिके करपण्याच्या अवस्थेत आहेत.