मोदी गुजरातमध्ये साजरा करणार वाढदिवस

0
176

अहमदाबाद, १३ सप्टेंबर
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १७ सप्टेंबर रोजी आपला ६६ वा वाढदिवस आपल्या गृहराज्यात अर्थात गुजरातमध्ये साजरा करणार आहेत. आपल्या आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर ते आदिवासी आणि दिव्यांगासोबत वेळ घालवणार आहेत.
१७ रोजी सकाळी मोदी गुजरातला येणार आहेत. तिथून ते थेट गांधीनगरला आपल्या आईकडे जातील. यावेळी ते कुटुबातील अन्य सदस्यांचीही भेट घेणार आहेत, अशी माहिती गुजरात भाजपाचे प्रवक्ते भारत पंड्या यांनी वृत्तसंस्थेला दिली. मोदी यांच्या मातोश्री हिराबा त्यांचे लहान बंधू पंकज मोदी यांच्याजवळ राहात आहेत.
आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर ते दाहोद या आदिवासी जिल्ह्याला भेट देतील. तिथे ते एका कार्यक्रमाचे उद्‌घाटन करणार आहेत. त्यानंतर ते रॅलीलाही संबोधित करणार आहेत. दुपारी नवसारी येथे दिव्यांगांच्या कार्यक्रमात ते सहभागी होतील.