साप्ताहिक राशिभविष्य

0
626

रविवार, ४ डिसेंबर ते १० डिसेंबर २०१६
सप्ताह विशेष
•सोमवार, ५ डिसेंबर ः चंपाषष्ठी, स्कंधषष्ठी मार्तंडभैरवोत्थापन, •मंगळवार, ६ डिसेंबर : संत रोहिदास पुण्यतिथी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी, •बुधवार, ७ डिसेंबर : बुधाष्टमी, दुर्गाष्टमी,
श्रीगुरुचरित्र सप्ताहारंभ, •शनिवार, १० डिसेंबर : मोक्षदा एकादशी, गीताजयंती.

मुहूर्त : साखरपुडा- ४ डिसेंबर, बारसे- ४ डिसेंबर, जावळे- ५ डिसेंबर, गृहप्रवेश- ५ डिसेंबर.

मेष : नोकरी-व्यवसायात उत्तम लाभ
आपल्या कुंडलीतील धनेश शुक्र या आठवड्यात दशम स्थानातच राहणार आहे. याशिवाय राशीस्वामी मंगळ देखील दशमातच आहे. शुक्र-मंगळाच्या या सहयोगामुळे या आठवड्यातील घटनाक्रमात आपण बरेच बदल अनुभवू शकाल. हे ग्रह बव्हंशी लाभकारक ठरणार असल्याने नोकरी-व्यवसायात उत्तम लाभ संभवतो. नोकरीत असणार्‍यांना पगारवाढ, पदोन्नती मिळू शकेल, तर व्यवसायाचा विस्तार, चालू व्यवसायाला अन्य जोड देणे वगैरे शक्य होऊ शकेल. व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड देऊन आपण काळाच्या बरोबरीत येण्याचा प्रयत्न करू शकाल. या सार्‍यात स्त्रीवर्गाची मदत मिळेल. आपल्या कामाचे कौतुक होईल.
शुभ दिनांक- ५,६,१०.
वृषभ : आर्थिक घडी बसवणे शक्य
आपला राशीस्वामी शुक्र भाग्यस्तानातून भ्रमण करणार असून तो मकर राशीत मंगळासोबत या आठवडाभर राहणार आहे. या काळात वृषभ राशीच्या अनेक युवांना विवाह, प्रेमसंबंध या अनुषंगाने विशेष उपयुक्त योग लाभण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने काही कुटुंबात मात्र तणावाचे वातावरण निर्माण होण्याचीही शक्यता राहू शकते. मात्र हा तणाव फार काळ टिकणार नाही व तोडगा निघून आपले मनोरथ पूर्ण होऊ शकेल. या साठी काहींना मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळू शकेल. व्यवसायात ज्या लोकांनी अगोदर पुरेशी गुंतवणूक केली आहे, त्यांना आता त्याची चांगली फळे मिळू शकतील. आर्थिक घडी बसवणे सहज शक्य होऊ शकेल.
शुभ दिनांक- ४,५,६.
मिथून : आर्थिक अंदाजपत्रक कोलमडेल
राशीस्वामी बुध या आठवड्यात सप्तमस्थानात मांड ठोकून आहे. व्ययेश शुक्र अष्टमात असून षष्ठातील रवी-शनी या परस्पर शत्रूंची जोडी देखील उपद्रव माजावत आहेत. पैसा, कुटुंबातील काही प्रकरणे यांवरून कुटुंबात तणाव, मतभेद, काहीसा कलह निर्माण होऊ शकतो. काहींना याचा प्रभाव व्यवसाय व नोकरीवर पडत असल्याचेही अनुभव येऊ शकतात. एखाद्या महिलेवरून अडचणीत येण्याचा प्रसंगही काही जणांवर उद्भवू शकतो. त्यामुळे फार सावध असणे जरूरी आहे. व्ययेश शुक्रच अष्टमात गेल्यावर आर्थिक ओढाताण निर्माण होणारच. पैसा येण्याच्या अगोदरच खर्चाचे कारण उद्भवलेले असणार.
शुभ दिनांक- ६,७,८.
कर्क : प्रकृतीची काजळी घ्यावी
आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र सप्तम स्थानात आहे. कुंडली सदैव हलती ठेवण्याचे काम तो करीत असतो. तो शुक्र-मंगळाच्या सोबतीने स्वभावात चंचलता निर्माण करतो. भावनिक चंचलता व्यावहारिक स्तरावर त्रासदायक, विविध अडचणी निर्माण करणारी असू शकते. त्यामुळे या मंडळींनी परिस्थिती पाहून काही खंबीर निर्णय घेण्याची व ते कसोशीने अंमलात आणण्याची गरज आहे. लवकरच चंद्र अष्टमात जाणार आहे. ही स्थिती प्रकृतीची काजळी घ्यायला हवी, असे सुचविणारी आहे. उच्चीचा मंगळ सप्तमात शुक्राशी योग करीत असून तो खानपानाच्या सवयींमध्ये बदल करणारा, व्यसनांच्या वाढीला कारणीभूत ठरू शकतो. शुभ दिनांक- ४,५,८.
सिंह : बोलून कुणास दुखवू नका
राशीच्या चतुर्थात रवी-शनी केव्हाही वाईटच. तो योग सध्या आपल्या वाट्याला आला आहे. त्यात राशीस्थानात असलेला राहू आणि षष्टात असलेल्या मंगळाने भर घातली आहे. यामुळे प्रकृतीविषयी त्रास, नोकरी-व्यवसायातील स्पर्धकांची किंवा छुप्या शत्रूंनी चालवलेली कुरघोडी, कुटुंबात उद्भवणारी आजारपणे यांनी त्रस्त व्हाल, असे दिसते. या सार्‍याचा परिणाम आपल्या वर्तनावर निश्‍चितपणे होणार. अनावश्यक संताप, रागीटपणा वाढेल. या आठवड्यात आपणास बोलण्यावर अतिशय निणंत्रण ठेवण्याची गरज आहे. तिखट, तीव्र बोलण्याची प्रवृत्ती वाढेल. आपल्या बोलण्याने कोणी दुखावणार तर नाही, याची काळजी घ्यावी.
शुभ दिनांक- ४,६,७.
कन्या : कोर्टाच्या प्रकरणांमध्ये बाजू वरचढ
राशीस्वामी बुध हा सुखस्थानात आहे, तर धनेश शुक्र व लाभेश चंद्र पंचमात आहेत, राशीत असलेला गुरू सर्व शुभत्व प्रदान करीत आहेत. त्यामुळे आपली रास भाग्यवान रास ठरत आहे. शुक्र-मंगळ सहवासात आपली सारी कामे वेगाने पूर्ण होताना दिसतील. सरकार दरबारी देखील आतापर्यंत रेंगाळत पडलेली कामे आता वेग घेतील व पूर्णत्त्वास जातील. यामुळे आपल्या योजना, नवे उपक्रम मार्गी लावता येऊ शकतील. व्यवसायाचा विस्तार, नवीन करार-मदारांसाठी देखील ही वेळ उपयुक्त ठरावी. आपण श्रम व पैसा या दृष्टीने केलेली कोणतीही गुंतवणूक फलदायी ठरेल. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांमध्ये आपली बाजू वरचढ होईल.
शुभ दिनांक- ८,९,१०.
तूळ : नकारात्मक वादळ दूर होणार
आपला राशीस्वामी शुक्र याचा धनेश मंगळासोबतचा या आठवड्यातील सहवास लाभप्रद ठरेल. आपण केलेल्या प्रयत्नांना यश तर मिळेलच, मात्र त्यांचे सर्वत्र कौतुक होऊन वाहवा, भरपूर प्रसिद्धी देखील मिळत असल्याचा अनुभव येईल. त्यामुळे कला क्षेत्रात, प्रसार माध्यमात, प्रचाराच्या क्षेत्रात असणार्‍यांना काही वेगळ्या कल्पना राबवून त्या यशस्वी करून दाखविता येतील. व्यवसाय-नोकरीतील नैराश्याचे नकारात्मक वादळ आता दूर झालेले आढळेल. आपल्या विचारांना, प्रयत्नांना अधिकारी वर्गाची, तसेच हाताखालच्या सहकार्‍यांची उत्तम साथ मिळू शकेल. आर्थिक बाजू देखील बलवान होताना दिसेल.
शुभ दिनांक- ६,७,१०.
वृश्‍चिक : कर्तृत्वाची चुणूक दिसेल
या आठवड्यात आपण राशीस्वामी मंगळ आणि सप्तमेश शुक्र यांचा अपूर्व मिलाफ अनुभवणार आहात. अशात साडेसातीचा कारक शनी अस्तंगत असल्याने त्याचा फारसा उपद्रव जाणवणार नाही. त्यामुळे शुक्र-मंगळ युतीचे चांगले परिणाम उपभोगता येऊ शकतील. लाभस्थानातून गुरू या सार्‍या योगांना उत्तम बळ देत आहे. यामुळे काही अनपेक्षित लाभ अचानक फलद्रूप होऊन आनंद देऊ शकतात. हा काळ आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखविणारा राहील. अखंड कार्यरत राहून कार्यसिद्धीस नेण्याच्या आपल्या स्वभावाला दाद मिळेल. कुटुंबीय व मित्रवर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. नोकरीत भाग्योदय होऊ शकतो.
शुभ दिनांक- ८,९,१०.
धनू : यशाला आनंदोत्सवाची जोड
राशीस्वामी गुरू दशमात आहे आणि राशीत बुध. धनात शुक्र, मंगळ व चंद्र अशी ग्रहांची पंगत बसली आहे. ही ग्रहस्थिती पाहता हा आठवडा सुखवर्धक ठरणार आहे. धनस्थानातील मंगळ अचानक अर्थप्राप्तीचे वा अर्थलाभास अनुकूल असे व्यावसायिक योग आणण्यास उत्सुक आहे. त्याच्या सहवासात असणारा शुक्र आपल्या प्रयत्नांना यश आणि आनंदोत्सवाची जोड देऊ शकेल. यामुळे कुटुंबात, व्यवसायात, आपल्या कार्यक्षेत्रात, मित्रवर्गात आनंद व समाधानाचे वातावरण राहील. नोकरी- व्यवसायात चांगले योग लाभावेत. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍यांना बदल करता येऊ शकेल. युवा वर्गास नोकरी-व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतील. शुभ दिनांक- ४,६,८.
मकर : योजनाबद्ध आगेकूच करा
राशीमध्ये बसलेले उच्च मंगळ, शुक्र व चंद्र आणि लाभात असलेले शनी-राहू या आठवड्यात आपणास उत्तमपैकी उत्साह, आरोग्य व धडाडी देण्याची शक्यता आहे. सुरुवातीला काही खर्च करावा लागू शकतो, मात्र नंतर त्याची भूमिका मंगलानुकूल होताना दिसेल. त्याची चांगली फळे आपणास मिळू शकतात. आपली कामे वेगाने पूर्णत्वास जाणार असल्याने योजनाबद्धपणे आगेकूच करू शकता. आपणास काही ठरवण्याचीच देर की, कामे आकारास येऊ लागतील. यात आपले कुटुंबीय, मित्रमंडळ, सहकारी यांची साथ मिळेल. अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाने कामे उत्तम रीत्या पूर्ण होऊन त्याची पुरेपूर फळे प्राप्त होतील.
शुभ दिनांक- ४,५,७.
कुंभ : नोकरी-धंद्यात आर्थिक पेच
आपला राशीस्वामी शनी त्याचा शत्रू रवीसोबत दशमात अस्तंगत आहे तर व्यय स्थानात उच्च मंगळ बसला आहे. तोही आपल्या राशीस्वामीचा शत्रू आहे. अशातच शुभंकर गुरू अष्टमात आहे. हे सारे व काहीसे प्रतिकूल ठरमारे आहे. खर्चाला अनेक वाटा फुटणे संभव आहे. वाईट संगतीत व्यसनांची वृद्धी होण्याचाही धोका आहे. हे सारे पाहता आपणांस खंबीर भूमिका घेऊन त्यानुसार वागण्याचे धोरण अवलंबिणे क्रमप्राप्त आहे. किंबहुना सारखे दोलायमान स्थितीत, ताणतणावाखाली राहण्यास ही स्थिती आपणास भाग पाडू शकते. नोकरी-धंद्यात आर्थिक पेच निर्माण होऊ शकतो. येणारा पैसा विलंब लावेल.
शुभ दिनांक- ६,७,८.
मीन : तडर्कोंडकी लाभाचे योग
आपला राशीस्वामी गुरू सप्तमातून राशीवर त्याचप्रमाणे लाभ आणि पराक्रम स्थानांवर दृष्टी ठेवून आहे. उच्चीचा मंगळ लाभात आहे. रवी-शनी नवमात असले, तरी त्यांच्या दृष्टीने बाधित होणारी स्थाने राशीस्वामी गुरू सुधारित असल्याने त्यांचा फारसा जाच होणार नाही. या शुभ स्थितीने आपणांस अपूर्व सकारात्मकता व अनुकूलता सर्वत्र अनुभवता येईल. आपल्या प्रलंबित योजना व नवे उपक्रम यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी हा काळ अतिशय उपयुक्त आहे. मंगळाच्या दृष्टीमुळे युवावर्गास नोकरीबाबत तसेच व्यवसायातील गुंतवणुकीच्या संदर्भात तडकाफडकी योग लाभू शकतात. अतिशय अल्पकाळात नोकरीत रुजू व्हावे लागेल. शुभ दिनांक- ८,९,१०.
मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६