शिरसगाव पांढरी येथून
नेर :
जवळच असलेल्या उमरठा गावातील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत
नुकताच पालक मेळावा घेण्यात
आला. वाहतूक सुविधा
कार्यक्रमांतर्गत गोरगरीब विद्याथ्र्यांना
सायकलींचे वाटपसुद्धा जिल्हा
परिषद सदस्य राहुल ठाकरे
यांच्याहस्ते करण्यात आले.
प्राथमिक शाळेच्या प्रांगणावर
झालेल्या या मेळाव्याच्या
अध्यक्षस्थानी नेर तालुका संजय
गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष
सदाशिव गावंडे तर उद्घाटक म्हणून
जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे
प्रमुख अतिथी म्हणून विलास
बोनकिले, विनायक भेंडे, परसराम
राठोड, सरपंच जवाहर राठोड, प्रदीप
भगत, विनोद डहाके, श्याम ठाकरे,
विनायक गुल्हाने, रामधन राठोड,
भावराव पाटील, जानराव राउत,
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष
शे. जाकीर शेख अमीन, बासीर
शहा, रसूल शहा, कुरेशी अकलम,
देवसिग महाराज, राहुल राउत, रमेश
रंगारी, अविनाश गावंडे, प्रमोद
नन्नवरे, अर्जुन गुल्हाने आदी
उपस्थित होते.
महागाव कसबा
यवतमाळ :
येथील कमळेश्वर मंदिरात गजानन
महाराज चरित्र गं्रथाचेे सामूहिक
पारायण झाले. गावापासून एक किमी
अंतरावर असलेल्या वनदेव कापडे
यांच्या शेतातील गजानन महाराज
मंदिरात प्रगटदिन उत्साहात पार
पडला. कार्यक्रमानंतर महापंगत
झाली. त्यात पारायण करणारयांसह
एक हजारांवर भाविकांनी
महाप्रसादाचा लाभ घेतला. दहा
वर्षांची परंपरा आजही कायम असून
पोलिस जमादार वनदेव कापडे यांनी
स्वखर्चाने मंदिराची उभारणी केली
असून कापडे परिवारातर्फे
प्रगटदिनासह महापंगत दिल्या जाते.
कार्यक्रमासाठी रमेश कापडे, सचिन
कापडे, नितीन कापडे व कापडे
परिवाराने पुढाकार घेतला.
मांगुर्डा येथील
पांढरकवडा :
जिल्हा परिषद शाळेतील बुलबुल
पथकाने जिल्हास्तर मेळाव्यास दिशा
ओळखणे व लेखी स्पर्धेत द्वितीय
क्रमांक पटकावला. दारव्हा येथे
नुकताच जिल्हास्तरीय कब-बुलबुल
मेळावा पार पडला. इंदिरा जुमनाके,
कोमल पेंदोर, नीता अनाके, राखी
मडावी, भाग्यश्री नागोसे, अनुराधा
भोयर, वनमाला मेश्राम, निलम
कोहचाडे, श्वेता महल्ले या
विद्यार्थिनींचे व्यवस्थापन समिती
अध्यक्ष सोनेराव किनाके, सरपंच
किशोर धुर्वे, मुख्यधध्यापक
भास्करवार यांनी कौतुक केले.
येथील जिल्हा
यवतमाळ :
परिषदेच्या अधिनस्त मागासवर्ग कक्ष
समिती गठित करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत शासन
निर्णयातील तरतुदीनुसार
मागासवर्गीयांचे शासकीय सेवेतील
आरक्षणाबाबतचे धोरण व शासकीय
योजनांची अंमलबजावणी
योग्यरितीने होते किवा नाही हे
पाहण्यासाठी संबंधित कार्यालयातील
अधिकारी, कर्मचारी यांच्या
सेवाविषयक बाबींचे निराकरण
करण्यासाठी या समितीचे गठण
करण्यात आले आहे. जिल्हा
समाजकल्याण अधिकारी देवसटवार
या समितीचेे अध्यक्ष राहणार आहेत.
सिद्धार्थ भवरे, डॉ. दिलीप चौधरी,
पद्मा कावे, देवेंद्र चांदेकर, अनिल
राऊत, सु. रा. जिभेकाटे, गोपाळ
शिदे, हनीफ शेख या समितीचे
सदस्य राहणार आहेत. या समितीची
पहिली सभा मंगळवार, २ एप्रिल
रोजी जिल्हा परिषदेतील
समाजकल्याण अधिकारी यांच्या
कक्षात आयोजित करण्यात आली
आहे. जिल्हा परिषदेतील
मागासवर्गीय कर्मचारयांनी
आस्थापनाविषयक तक्रारी
असल्यास समितीच्या वर नमूद
सदस्यांकडे कराव्यात, अशी माहिती
समितीचे सदस्य तथा कास्ट्राईबचे
अध्यक्ष सिद्धार्थ भवरे यांनी
दिली आहे.
जिप शाळेत
पालक मेळावा
कमळेश्वर मंदिरात
सामूहिक पारायण
मांगुर्डाचे बुलबुल
द्वितीय
जिल्हा परिषदेत
मागासवर्ग कक्ष
समिती गठित
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, ३१ मार्च
तालुक्यात वडगाव पोलिस
ठाण्याजवळ मुरझडी (लाल) हे
आदिवासी गाव आहे. अनेक
वर्षांपासून विकासाच्या बाबतीत या
गावाकडे पुढारयांनी दुर्लक्ष केले आहे.
गेल्या ३५ वर्षांत या गावाकडे कोणीही
पाहिले नाही. त्यामुळे हे गाव
विकासाच्या बाबतीत मागे राहिले.
आता मात्र या गावाच्या विकासाआड
कोणी आल्यास त्याची गय केली
जाणार नसल्याचा इशारा सरपंच इंदिरा
आडे यांनी दिला आहे.
यवतमाळ सुधार समितीचे
अध्यक्ष शिवा आडे यांनी या गावाकडे
लक्ष देऊन खासदार भावना गवळी
यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी
सरपंच मारोती आत्राम, मुरझडी
(लाल) ग्राम सुधार समितीचे राजू
मेटकर यांच्या सहकार्याने विकासाच्या
योजना प्रत्यक्ष राबविल्या. त्यामुळे
चमत्कार झाला. या गावात
विकासाची गंगा वाहू लागली. रस्ते,
पांदण रस्ता, राष्ट्रीय पेयजल योजना,
सांस्कृतिक भवन, अंतर्गत सिमेंट रस्ते,
घरकुल, विहिरी, बकरया वाटप,
मोटार पंप, सायकल वाटप, रास्त भाव
दुकान, केरोसीन दुकान परवाने अशा
अनेक योजना एक ते दीड वर्षात
कार्यान्वित झाल्या असून आज त्या
पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. या कामात
सर्व ग्रामस्थांना मदत करणारया देवराव
बोचे यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे.
वरील योजना राबवित असताना
सर्वसामान्य आदिवासी बांधवांना खरे
काम करणारे लोक कोण आहेत हे
कळले. त्यामुळे झालेल्या
निवडणुकीत ग्रामपंचायतला बहुमत
मिळाले. इंदिरा आडे सरपंच, शांता
हुमणे उपसरपंच, आणि महादेव
गेडाम, माणको गेडाम अशा तडफदार
आणि गावाच्या विकासाची तळमळ
असणारया लोकांमुळे कामाला वेग
आला. परंतु हे सर्व काही राजकीय
पुढारयांना पचले नाही. त्यांनी
सांस्कृतिक भवनाच्या कामात
अडथळा आणला. त्यामुळे शासकीय
काम थांबले. म्हणून २६ मार्चला ऐन
होळीच्या दिवशी विशेष ग्रामसभा
घेण्यात आली. या ग्रामसभेला
जास्तीत जास्त ग्रामस्थ व महिला
भगिनी हजर होत्या.
ग्रामसभेत एकमताने सांस्कृतिक
भवनाच्या कामाला मंजुरी दिली. ज्या
पुढारयांनी या कामात व्यत्यय आणले
ती जागा गावठाणाची आहे. ती जागा
१९८४ मध्ये घरकुल होते ती जागा
आज मोकळी आहे. म्हणजेच ओपन
प्लेस आहे. त्यामुळे त्या जागेवर
सांस्कृतिक भवनाचे बांधकाम
करण्यास ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या
माध्यमातून मंजुरी दिली आहे.
बांधकाम विभागाने वेळ न घालवता
काम सुरू करावे. म्हणजेच दुसरे काम
या गावात सुरू करता येईल व
कामाला गती मिळेल, अशी
गावकरयांची भावना आहे.
या गावाचा झालेला विकास
पाहता माजी सरपंच मारोती आत्राम
यांचा तत्कालीन जिल्हाधिकारी
श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार
संघटनेच्या कार्यक्रमात सत्कार केला
होता हे विशेष. मुरझडी (लाल) हे
एक आदर्श ग्राम म्हणून
नावलौकिकास आणल्याशिवाय
राहणार नाही त्यामुळे या विकासाच्या
कामात कोणत्याही पुढारयाने व्यत्यय
आणल्यास त्याची गय केली जाणार
नाही, असा इशारा मुरझडी (लाल)
च्या सरपंच इंदिरा आडे यांनी
दिला आहे.
मुरझडीच्या विकासाआड कुणीही आल्यास गय नाही
इंदिरा आडेंचा इशारा
सरपंच
तभा वृत्तसेवा
आर्णी, ३१ मार्च
नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा देऊरवाडी
(पु.), मनपूर व दत्तरामपूर येथे शिक्षण महोत्सव
उत्साहात साजरा करण्यात आला. या
महोत्सवानिमित्त विविध विषयांचे शैक्षणिक साहित्य
शिक्षक व विद्याथ्र्यांनी तयार करून सांस्कृतिक
कार्यक्रमांसह अनेक उपक्रम राबविले. भाषा, गणित,
इंग्रजी व कार्यानुभव आदी विषयांचे मॉडेल तयार
करून महोत्सवात ठेवण्यात आले होते.
महोत्सवाचे उद्घाटन नगर परिषद उपाध्यक्ष व
शिक्षण सभापती आरीज बेग यांच्याहस्ते करण्यात
आले. अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण सभापती
ज्योती मोरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद
नियोजन व विकास समिती सभापती अनिता भगत,
नगर परिषद सदस्य नारायण चलपेलवार, मंगला
ठाकरे, अंजली खंदार, नीता ठाकरे, शेखर लोळगे,
सुनील भगत, विस्तार अधिकारी किशोर रावते,
नगर परिषद शाळांच्या शिक्षकांची शैक्षणिक
पात्रता, शाळेतील इमारती व इतर भौतिक सुविधा
ह्या खाजगी इंग्रजी शाळांपेक्षा उच्च दर्जाच्या असून
स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी शाळा सेमी इंग्लिश
मिडीयम करणे अनिवार्य आहे. नप शाळेत
शैक्षणिक सत्र २०१३-१४ पासून सेमी इंग्लिश
माध्यमातून शिक्षण सुरू करण्याकरिता कार्यवाही
सुरू करण्यात आल्याचे नप उपाध्यक्ष आरीज बेग
यांनी सांगितले. त्याचबरोबर ई-लर्निंग सारखे
उपक्रमही नजीकच्या काळात विद्याथ्र्यांकरिता
उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते
म्हणाले.
केंद्रप्रमुख ज्योती पाटील, शाळा समिती अध्यक्ष
चितामण इंगळे, बलदेव तिरपुडे, संगीता भरभडे,
विठ्ठल चौधरी, ह. सु. भगत, माजी बँक व्यवस्थाक
वामन बन्सोड, मुख्याध्यापक मधुकर ठाकरे तथा
व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
दरम्यान स्थानांतरण झाल्याबद्दल केंद्रप्रमुख
ज्योती पाटील व संदीप काटोले यांना प्रमुख
पाहुण्यांच्याहस्ते शाल-श्रीफळ देऊन निरोप देण्यात
आला. महिला दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित
करण्यात आली होती.
नगर परिषद सदस्य नारायण चलपेलवार यांनी
शिक्षण महोत्सवात समाज सहभाग अत्यंत महत्वाचा
असून नगर परिषद शाळेत सुधारणा झाल्याचे आपल्या
भाषणातून सांगितले.
विस्तार अधिकारी तथा गटसमन्वयक किशोर
रावते यांनी शिक्षण महोत्सवाकरिता दिले जाणारे
अनुदान योग्यरित्या नगर परिषद शाळेत खर्ची
झाल्याबाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक मधुकर ठाकरे तर संचालन प्रणिता
चितावार यांनी केले.
आर्णी नप शाळेत शिक्षण महोत्सव
नवीन सत्रापासून सेमी इंग्रजी
: आरीज बेग
माध्यम
यवतमाळ :
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या
भूमिपूजनप्रसंगी जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती
मनमोहनसिग चव्हाण यांनी दोन तास आधी येऊन
येथील कर्मचारयांची अनियमितता व मुख्यालयी न
राहणारया कर्मचारयांचा आढावा घेतला.
यामध्येे बरेच कर्मचारी मुख्यालयी न राहता ये-
सावरगाव येथे प्रस्तावित
जा करीत असल्याचे आढळून आले. त्यांना धारेवर
धरले. हजेरी पुस्तिका, रुग्णकल्याण समितीचे
प्रोसेडींग पाहले आणि कर्मचारी, वैद्यकीय
अधिकारयांची अनियमितता, असुविधेबद्दल नाराजी
व्यक्त केली.
विशेष म्हणजे इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी
वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. तेव्हा
मनमोहनसिह चव्हाण यांनी उपस्थित ग्रामस्थांना
आश्वासन दिले की, येत्या महिनाभरात जर
कर्मचारयांची उपस्थिती कमी असल्यास आणि ते
मुख्यालयी गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर कार्यवाही
करण्यात येईल. यावेळी सरपंच आशीष देशमुख,
सुभाष भगत, उपसरपंच बोभाटे, ईश्वर वडेरा
उपस्थित होते.
आरोग्य सभापतींनी कर्मचारयांना धरले धारेवर
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, ३१ मार्च
स्थानिक सुसंस्कार विद्या मंदिर येथे होळीचे
औचित्य साधून पक्षीमित्र श्याम जोशी यांची पक्षी
संवर्धन कार्यशाळा घेण्यात आली. आजच्या
युगात पाण्याचे महत्त्व व त्यामुळे होणारया
दुष्परिणामांची जाणीव त्यांनी विद्याथ्र्यांना करून
दिली. या जाणीवेतून प्रेरित होऊन विद्याथ्र्यांनी
पक्ष्यांसाठी पानतळे व रेस्टॉरन्ट तयार करून होळी
साजरी करण्याचा संकल्प केला व तो तत्काळ
अमलातसुद्धा आणला.
शाळेच्या परिसरात असणारया
झाडांवर मुलांनी पानतळे तयार केले व त्यामध्ये
दररोज पाणी व आपल्या डब्यामधील अन्न
ठेवण्याचा संकल्प केला. तसेच प्रत्येकाने आपल्या
घरी असणारया बागेमध्ये झाडावर असे पानतळे
तयार केले व त्याची काळजी घेण्याची आठवण
घरच्या सर्वांना करून देण्याची जबाबदारीसुद्धा या
सुसंस्कारचे विद्यार्थी पक्षीमित्र श्याम जोशी यांच्यासह
चिमुकल्यांनी घेतली. तसेच रस्त्यावरील मोकाट
प्राण्यांना उन्हाळ्यात पाण्यामुळे होणारया त्रासाची
जाणीवसुद्धा मुलांना असल्यामुळे प्रत्येकाने
आपल्या घरासमोर प्राण्यांसाठी पाणवठे तयार
करण्याचे ठरविले.
होळी हा सण कसा साजरा करावा याविषयी
सांगताना, राज्यामध्ये असणारी दुष्काळी
परिस्थिती पाहता होणारा पाण्याचा अपव्यय
थांबविण्यासाठी होळीमध्ये पाण्याचे फुगे,
रासायनिक रंगाचा उपयोग न करण्याचे आवाहन
मुलांना केले व त्यापासून होणारया दुष्परिणामांची
जाणीव मुलांना करवून दिली. तसेच कार्यक्रमाच्या
शेवटी शाळेच्या मुख्याध्यापक उषा यांनी
पाणीविरहित होळी करून पक्षीसंवर्धन करण्याचा
संकल्प मुलांकडून करवून घेतला.
वृंदांचा सहभाग लाभला.
या कार्यशाळेमध्ये शाळेचे सचिव संजय यांनी
कार्यक्रमाकरिता सर्व शिक्षक व कर्मचारी
पानतळे तयार करून केली होळी साजरी
यवतमाळ जिल्हा पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थेने सुरू केलेल्या
कल्याण निधी योजनेअंतर्गत अपघात विम्याचा लाभ मृत सभासदाच्या वारसाला
देण्यात आला. एका कार्यक्रमात संस्थेचे सभासद सुधीर रघुनाथ काळे यांचे
अपघाती निधन झाल्यामुळे त्यांच्या वारस संध्या सुधीर काळे यांना धनादेशाचे
वितरण करण्यात आले. तसेच संस्थेच्या सभागृहात सेवानिवृत्त सभासदांचा
सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात संस्थेचे सेवानिवृत्त सभासद प्र.
म. गोमेकर, उपविभागीय अभियंता र. वा. डहाके अनुरेखक यांचा शाल व श्रीफळ
देऊन सत्कार करण्यात आला.
धनादेश वितरण व सत्काराप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दिनेश चौधरी, उपाध्यक्ष
भाऊराव राठोड, सचिव मोरेश्वर आसुटकर, सहसचिव विजय सिडाम, संचालक
श्रीराम बाकमवार, अशोक कामडी, विष्णू जाधव, शिरीष दाभाडकर, सुनील
बुरांडे, प्रमोद कोरडे, सुरेश ठाकरे, धनराज राठोड, सुभाष भगत, अभि. देविदास
खोकले, ज्योती बेझलवार, आशा महाजन, बँक प्रतिनिधी श्रीरंग रेकलवार,
व्यवस्थापक गजानन शिरभातेे व सर्व कर्मचारी, सभासद हजर होते.
कुटुंबातील कत्र्याकमवित्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास पतसंस्थेमार्फत
कल्याण निधी योजनेअंतर्गत अपघात विमा योजनेतून दोन लाख रुपयांचे योगदान
देण्यात येते. ही योजना विद्यमान संचालक मंडळाने संस्था स्तरावर राबवून उत्तम
धोरणात्मक निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
घाटंजी : अखिल भारतीय गांधर्व मंडळ मुंबईद्वारा घेण्यात आलेल्या संगीत
परीक्षेत तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्याथ्र्यांनी
घवघवीत यश प्राप्त केले. त्यात प्रारंभित परीक्षेत तबलावादन या विषयात पराग
भास्कर, अनिकेत वरघट, सुमीत भोरकडे, सार्थक हरदास, कार्तिक ड्यागरवार,
कुणाल कोहाड, रोशन मराठे, सौरभ बारहाते, विठ्ठल मते या विद्याथ्र्यांनी प्रथम
श्रेणी प्राप्त केली. प्रवेशिका प्रथम परीक्षेत शंतनू दशसहस्त्र, अक्षय केमेकार, प्रतिक
भगत, भूषण मिलमिले, नवेद शेख, सचिन अंबुरे या विद्याथ्र्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त
केली. या विद्याथ्र्यांना तबला विशारद, संगीत शिक्षक रवी शेंडे, संगीत शिक्षिका
दिवे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्याथ्र्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, ३१ मार्च
पाटबंधारे पतसंस्थेची कल्याण निधी योजना
अपघात विमा वारसांना लाभ
नवोदय विद्याथ्र्यांचे संगीत परीक्षेत यश
येथील स्थानिक जाजू चौकात
बलिदान दिनानिमित्त शहीद भगतसिग,
राजगुरू, सुखदेव यांना श्रद्धांजली
वाहण्यात आली. हा कार्यक्रम हिंदू
जनजागृती समिती व यंग ब्रिगेड यांच्या
संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन
करून करण्यात आली. नंतर शहीद
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, ३१ मार्च
भगतसिग, राजगुरू, सुखदेव यांच्या
प्रतिमांचे पूजन करून मेणबत्त्या लावून
श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच हिंदू
जनजागृती समितीतर्फे क्रांतिकारकांच्या
जीवनावरील माहिती सांगणारे सचित्र
फलक प्रदर्शन लावण्यात आले. या
प्रदर्शनाचा लाभ शेकडो नागरिकांनी
घेतला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
नगरसेवक प्रा. प्रवीण प्रजापती, सुशील
कोठारी, संतोष दीक्षित व जाधव यांची
उपस्थिती होती.
या प्रसंगी यंग ब्रिगेडचे संतोष
तायडे, संतोष मेश्राम, गजानन
भालेराव, श्याम देवताळे, सुनील डेरे,
अण्णा पेलेवार, ओंकार, अंकुश बोंडे
आणि हिंदू जनजागृती समितीचे मंगेश
खांदेल, प्रशांत सोळंके, अभिजित
अस्वले, दत्तात्रय फोकमारे, विष्णू खाडे
उपस्थित होते.
बलिदान दिवस साजरा
हिंदू जनजागृती समिती आणि यंग ब्रिगेड यांची श्रद्धांजली
पंचायत समिती सभागृहात
शनिवार, ३० मार्च रोजी एक दिवसीय
नागरी हक्क संरक्षण प्रचार प्रसार शिबिर
झाले. पंचायत समिती स्तरावरील
ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील,
सरपंच, तलाठी यांना विषय तज्ज्ञांकडून
प्रशिक्षण देण्यात आले.
या शिबिर कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती
प्रतिभा कडू होत्या. प्रमुख अतिथी
म्हणून उपसभापती रमेश लोखंडे,
तहसीलदार ज्ञानदेव गोरेडे, पंचायत
समिती सदस्य शशिकला दिघाडे,
सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर
तभा वृत्तसेवा
बाभुळगाव, ३१ मार्च
शिबिरात मार्गदर्शन करताना तहसिलदार ज्ञानदेव गोरडे व उपस्थित मान्यवर
बाळबुद्धे, पोलिस उपनिरीक्षक सचिन
सेलोकार, सरपंच, उपसरपंच संघटनेचे
तालुकाध्यक्ष प्रदीप हजारे, प्रमुख
मार्गदर्शक अ‍ॅड. गावंडे, अ‍ॅड. रोशनी
वानोडे, अर्चना थुल उपस्थित होते.
ग्रामीण भागात काम करणारया
अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी
यांना अनु. जाती-जमाती अत्याचार
प्रतिबंधक अधिनियमाचे प्रशिक्षण
मिळावे या कायद्याविषयी ज्ञान वृंद्धिगत
होण्यासाठी व मानवी हक्काची उजळणी
व्हावी यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
शिबिराचे आयोजन करण्यात आले
होते. यामध्ये जाती-जमाती प्रतिबंधक
अधिनियम १९८९ तरतुदीची माहीती,
१९९५ नियमांची पूर्ण माहिती, नागरी
हक्क संरक्षण अधिनियम १९५५ ची
माहिती, विशेष घटक योजनेअंतर्गत
अनुसूचित जातीसाठी वैयक्तिक
लाभाच्या असणारया सर्व योजनांची
माहिती, अंद्धश्रद्धा निर्मूलन,
महिलांविषयी कायदे व त्यांच्या
शोषनाविषयी समाज प्रबोधन, जातीयता
निर्मूलनासंबंधीचे प्रबोधन व राष्ट्रीय
एकात्मता आणि जातीय सलोखा
वृद्धिंगत करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात
आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
आरोग्य विस्तार अधिकारी किशोर
लहाने यांनी केले. प्रास्ताविक मार्गदर्शन
गटविकास अधिकारी विनोद खेडकर
यांनी केले. या शिबिरात सरपंच डॉ.
बबन बोंबले, हनुमंत जगताप, राजू
देशमुख, अजय गावंडे, सुधीर कडूकार,
प्रवीण वाईकर, ग्रामसेवक संघटनेचे
अध्यक्ष सुभाष भोयर, पंचायत विस्तार
अधिकारी रिंकी डाबरे, मरसणे
यांच्यासह तालुक्यातील सरपंच,
उपसरपंच, ग्राप सदस्य, तलाठी,
ग्रामसेवक उपस्थित होते.
नागरी हक्क संरक्षण प्रचार-प्रसार शिबिर
तभा वृत्तसेवा
मारेगाव, ३१ मार्च
अहमदनगर जिल्ह्यातील
तरवडीच्या दीनमित्रकार मुकुंदराव
पाटील सार्वजनिक
वाचनालयाच्यावतीने देण्यात येणारा
राज्यस्तर पुरस्कार २०१३ साठी डॉ.
अनंता सूर यांच्या ‘दोन अर्वाचिन
कवी' या समीक्षा ग्रंथांची निवड
करण्यात आली.
तरवडी येथे झालेल्या पारितोषिक
डॉ. अनंता सूर यांचा गौरव करताना छगन भुजबळ
वितरण कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन
भुजबळ यांच्या हस्ते रोख रक्कम,
सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन
डॉ. अनंता सूर यांना गौरविण्यात आले.
या सत्कार समारंभाला महाराष्ट्राचेे
आदिवासी विकास मंत्री बबन पाचपुते,
माजी आमदार अभंग, आयोजक उत्तम
पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती
होती.
डॉ. अनंता सूर यांच्या दोन
अर्वाचीन कवी या समीक्षा ग्रंथाला
यापूर्वी संगमनेरचा अनंत फदी
साहित्य पुरस्कार आणि विदर्भ साहित्य
संघाचा समीक्षा पुरस्कारप्राप्त झाला
आहे.
पुरस्काराबाबत अशोक पवार,
डॉ. कानडजे, प्राचार्य संजय घरोटे, प्रा.
मुंडे, प्रा. चव्हाण, प्रा. बोधकुरवार,
प्रा. भालेराव, प्रा. बोधे तसेच
विद्याथ्र्यांनी प्रा. सूर यांचे अभिनंदन
केले आहे.
डॉ. अनंता सूर यांच्या
समीक्षा ग्रंथाला साहित्य पुरस्कार
तभा वृत्तसेवा
वणी, ३१ मार्च
येथील इंडियन क्रिकेट क्लब वणीद्वारा आमदार चषक
टेनिस बॉलच्या खुल्या सामन्यांचे आयोजन करण्यात
आले. शासकीय मैदानावर २ एप्रिलपासून सुरू होणारया
या स्पर्धेत प्रथम पुरस्कार ५० हजार एक रुपये, द्वितीय
पुरस्कार ३१ हजार एक रुपये आणि तृतीय पुरस्कार २०
हजार एक रुपये ठेवण्यात आला आहे. यासह वैयक्तिक बक्षीसे, होम थिएटर,
मोबाईल, इन्डक्शन कुकर व अनेक रोख बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन आमदार वामन कासावार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी
माजी क्रीडामंत्री संजय देशमुख, देविदास काळे, नरेंद्र ठाकरे, सुनील कातकडे, शरद
ठाकरे, कैसर पटेल, प्रमोद वासेकर, नारायण गोडे, नईम अजीज, भाऊराव कावडे,
मोरेश्वर पावडे, टिकाराम कोंगरे, संध्या रामगिरवार, राजू इंकतवार यांची प्रमुख
उपस्थिती राहणार आहे. या क्रिकेट स्पर्धेत विदर्भातील संघांनी सहभागी व्हावे, असे
आवाहन इंडियन क्रिकेट क्लबचे अध्यक्ष फारूख शेख, उपाध्यक्ष मयूर घाटोळे,
सचिन काकडे यांनी केले आहे.
वणी येथे उद्यापासून
‘आमदार चषक' क्रिकेट स्पर्धा
उमरखेड, ३१ मार्च (तभा वृत्तसेवा)
केंद्र व राज्य सरकार आज विवाहापूर्वीच्या संबंधास सर्रास परवानगी देत
आहे. ही अतिशय आश्चर्यकारक बाब आहे. विवाहपूर्व संबंध हे अस्वीकार्हच
आहेत. नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित एका परिसंवादात जमाते इस्लामी
हिद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तौफीक असलम खान संवाद साधताना बोलत होते.
दिल्लीत दामिनीसारख्या घटना आपल्या देशात घडत आहेत. एका सर्वेनुसार
भारतात प्रत्येक मिनिटास १.३ व वर्षाकाठी ६८ लाख ३२ हजार ८०
बलात्काराच्या घटना घडत आहेत. या घटनांना कोण कारणीभूत आहे त्याची
कारणे काय आहेत? या सर्व बाबींकडे गांभीर्याने विचार करण्याची गरज सर्व
समाजाला आहे. एखाद्या तरुण-तरुणीचे वय १८ वर्षे झाले म्हणजे त्यांना सर्व
काही समजते असे नाही. आज भारतात भांडवलशाही तत्वे चोरमार्गाने प्रवेश
करीत आहे. उदा. एसईझेड, बहुराष्ट्रीय कंपन्या, एनरॉन इत्यादींमुळे देशातील गरीब
अजून गरीब व श्रीमंत अधिक श्रीमंत होऊन मूठभर लोक लोकशाहीचा आनंद घेत
आहेत. देशापुढे अजून गंभीर प्रश्न उभे असल्याचे तौफिख खान म्हणाले. जमाते
इस्लामी हिदचे कार्य विषद करताना ते म्हणाले, मागील दोन महिन्यात आम्ही अन्न
सुरक्षा अधिकार, अन्न सर्वांसाठी, साम्राज्यवाद विरोधी अभियान, आरोग्य
सर्वांसाठी इत्यादी अभियान राबवून आज केंद्र सरकारला अन्न सुरक्षा कायदा
करण्यास भाग पाडले. जमाते इस्लामी हिद भविष्यात भारतात, कोणीही भुकेला
नसावा, सर्वांना सारखा न्याय मिळावा, कोणतीही स्त्री वेश्या व्यवसाय करू नये,
कोणताही बालक कुपोषणग्रस्त नसावा, प्रवाश्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध
असाव्या याकरिता अहोरात्र प्रयत्न करीत आहोत. कार्यक्रमाला आमदार विजय
खडसे, माजी नप अध्यक्ष राजू जयस्वाल, प्रमोद रन्डे, नगरसेवक इनायत उल्लाखान
आदींसह शेकडोंची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेचे स्थानिक
अध्यक्ष काजी जहिरोद्दीन यांनी आभारप्रदर्शन केले.
तौफीक खान बोलताना
विवाहपूर्व संबंध
अस्वीकार्ह
: तौफीक असलम खान
सोमवार, १ एप्रिल २०१३
 »  ई पेपर बद्दल थोडेसे..  «
बातमी वाचण्याकरीता (झूम करण्याकरता) कृपया बातमी वर क्लिक करा.

<Escape Key> बातमी ची विंडो (खिडकी) बंद करेल.


 »  मुख्य बातम्या  «
» जिप शाळेत पालक मेळावा
» मुरझडीच्या विकासाआड कुणीही आल्यास गय नाही इंदिरा आडेंचा इशारा
» आर्णी नप शाळेत शिक्षण महोत्सव नवीन सत्रापासून सेमी इंग्रजी
» आरोग्य सभापतींनी कर्मचारयांना धरले धारेवर
» पानतळे तयार करून केली होळी साजरी
» पाटबंधारे पतसंस्थेची कल्याण निधी योजना अपघात विमा वारसांना लाभ
» बलिदान दिवस साजरा हिंदू जनजागृती समिती आणि यंग ब्रिगेड यांची श्रद्धांजली
» नागरी हक्क संरक्षण प्रचार-प्रसार शिबिर
» डॉ. अनंता सूर यांच्या समीक्षा ग्रंथाला साहित्य पुरस्कार
» वणी येथे उद्यापासून ‘आमदार चषक' क्रिकेट स्पर्धा
» विवाहपूर्व संबंध अस्वीकार्ह
Content
आसमंत
पृष्ठ 1
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
पृष्ठ ५
पृष्ठ ६
पृष्ठ ७
पृष्ठ ८
फुल ऑन
पृष्ठ 1
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
पृष्ठ ५
पृष्ठ ६
छोटे उस्ताद
पृष्ठ 1
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
पृष्ठ ५
पृष्ठ ६
पृष्ठ ७
पृष्ठ ८
आकांक्षा
पृष्ठ 1
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
पृष्ठ ५
पृष्ठ ६
अभिष्टचिंतन
पृष्ठ 1
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
पृष्ठ ५
पृष्ठ ६
 
Content
<%----%>
मुख्य अंक
पृष्ठ 1
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
पृष्ठ ५
पृष्ठ ६
पृष्ठ ७
पृष्ठ ८
आपलं नागपुर
पृष्ठ 1
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
पृष्ठ ५
पृष्ठ ६
पृष्ठ ७
पृष्ठ ८
 
आपलं नागपुर - २
पृष्ठ ९
पृष्ठ १०
पृष्ठ ११
पृष्ठ १२
पृष्ठ १३
पृष्ठ १४
पृष्ठ १५
पृष्ठ १६
Content
अमरावती-यवतमाळ
पृष्ठ 1
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
# अकोला-वाशीम-खामगाव-बुलढाणा
पृष्ठ 1
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
वर्धा
पृष्ठ १
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
भंडारा / गोंदिया
पृष्ठ १
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४
चंद्रपुर-गडचिरोली
पृष्ठ १
पृष्ठ २
पृष्ठ ३
पृष्ठ ४