जीएमबी शाळेत बाल आनंद मेळावा

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
अर्जुनी मोर, 
GMB School स्थानिक सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेन्ट व जीएमबी हायस्कूल येथे 15 दिवसीय बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 25 एप्रिल रोजी बाल आनंद मेळाव्याचा समारोप विविध उपक्रमाने झाला. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. ब‘भदास भुतडा, लालितादेवी भुतडा, सीमा दिनेश भुतडा, अध्यक्ष जयप्रकाश भैय्या, सचिव सर्वेश भूतडा, भावेश भुतडा, समन्वयक भगीरथ गांधी, प्राचार्य जे. डी. पठाण, प्राचार्या शैव्या जैन, उपप्राचार्या छाया घाटे, पर्यवेक्षक महेश पालीवाल, प्रा. टोपेशकुमार बिसेन उपस्थित होते.
 

GMB School 
 
दोन आठवडे चाललेल्या शिबिरात चित्रकला, आर्ट अँड क्राफ्ट, मेहंदी, पेंटिंग, घरातील शोभेच्या वस्तू बनविणे आदींचे प्रदर्शन लावण्यात आले होते. नृत्य शिकून त्याचे सादरीकरण करण्यात आले. मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेत चाळीस स्टॉल लावले. त्यामधे विविध प्रकारचे खाण्याचे पदार्थांचा समावेश होता.GMB School पदार्थांची विक्री  करून व्यावहारिक ज्ञान आत्मसात केले. यावेळी पालकांनीही उपस्थित दर्शविली. कार्यक‘माचे संचालन व आभार प्रदर्शन कांचन भेंडारकर यांनी केले.