दूध, दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणार्‍यांविरुद्ध कारवाही करा

अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

    दिनांक :26-Apr-2024
Total Views |
गोंदिया,
milk products देशपातळीवर एफएसएसआयने केलेल्या सर्वेक्षणानुसार 70 टक्के दुधाचे नमुने भेसळ आढळले. भारतातील दुधावर केलेल्या विविध चाचण्या अधिकृत मानकांशी जुळत नसल्याचे प्रयोगामध्ये आढळून आले आहे. काही नमुन्यांमध्ये स्किम मिल्क पावडर, ग्लुकोज, युरीया, डिटर्जंट, तेल, कॉस्टिक सोडा, बोरीक ऍसिड इत्यादींचा वापर करून सिंथेटिक आणि भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, ही बाब चिंतादायक व मानवी आरोग्यास नुकसानदायक असल्याने दूध, दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाही करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने 25 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
 

milk product 
 
निवेदनानुसार जिल्ह्यात अन्न तपासणी मोबाईल व्हॅन उपलब्ध करावी, दूध आणि खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधीचा समावेश करावा, जिल्ह्यात प्रत्येक तहसीलस्तरावर नमुने तपासण्यासाठी निःशुल्क ओपन टेस्टिंग सेंटर सुरू करावे, जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात अन्न निरीक्षकांची नियुक्ती करावी, प्रशासनाने केलेल्या तपासणीअंती दुधात भेसळीचे प्रमाण आढळून आल्यावर त्याची सोशल मीडिया, वृत्तपत्रे आदींद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी, भेसळयुक्त दुधाचा दीर्घकाळ वापर केल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. यामुळे पोट खराब होणे, उलट्या होणे, जुलाब, ऍलर्जी, किडनी, यकृत, हृदयाचे नुकसान, प्रतिकारशक्ती कमी होणे आणि कर्करोग यांसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात.milk products करिता दूध, दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणार्‍यांविरुद्ध या व्यवसायात गुंतलेल्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे शासनाला पाठविण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वरील मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांनी स्विकारले. यावेळी जिल्हा सचिव संजीव बापट, संघटन मंत्री योगेश्वर सोनुले, जिल्हा महिला प्रमुख मंजुश्री देशपांडे, कार्यकारिणी सदस्य विजयकुमार अग्रवाल, मोहन देशपांडे उपस्थित होते.