घरफोडी प्रकरणातील चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

बीपी-शुगरची मशिन, सिलिंडरचीही केली होती चोरी

    दिनांक :06-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुलगाव, 
Burglary case : घरी कोणीही नसताना 90 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेणार्‍या दोन चोरट्यांना पुलगाव पोलिसांनी अटक केली. यश उर्फ शेषकुमार इंगळे (21) आणि सुरेंद्र ऊर्फ मोटू ढेंगे (24) दोन्ही रा. गांधीनगर पुलगाव, अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
 
 
fjsad
 
 
पंचधारा मार्गावरील ड्रीम पार्क कॉलनी येथील विक्की अरोरा बाहेरगावी गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्याचांदीचे दागिने, रोख, बीपी आणि शुगरची मशिन, दोन सिलिंडर असा 90 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.
 
 
पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार सुधीर लडके यांनी चोरट्यांचा शोध घेत यश इंगळे आणि सुरेंद्र ढेंगे यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चांदीचे दागिने, सिलिंडर, बीपी व शुगरची मशिन आदी मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, सहायक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक राहुल सोनवणे यांच्या निर्देशाप्रमाणे सुधीर लडके, रितेश गुजर, ओमप्रकाश तल्लारी, विश्‍वजित वानखेडे यांनी केली.