मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

DharmaraoBaba Atram बॅकपेनमुळे बेडरेस्ट

    दिनांक :06-May-2024
Total Views |
गडचिरोली,
 
 
DharmaraoBaba Atram राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना पाठ व कंबर दुखापतीच्या आजारामुळे डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहे. DharmaraoBaba Atram त्यांनी विश्रांती न घेतल्यास त्यांच्यावर शस्रक्रिया करावी लागू शकते, असा ईशाराही डॉक्टरांनी दिला आहे. सविस्तर असे की, मंत्री आत्राम यांना पाठ व कंबरदुखीचा आजार काही महिन्यापासून सुरू होता. DharmaraoBaba Atram
 
 
 
DharmaraoBaba Atram
 
 
मात्र, त्यांनी या दुखापतीकडे दुर्लक्ष करून लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले होते. DharmaraoBaba Atram कंबरेला पट्टा बांधून ते संपूर्ण लोकसभा क्षेत्रात प्रचारासाठी फिरले. तब्येतीकडे त्यांचे झालेले दुर्लक्षच आता त्यांच्या दुखापतीसाठी कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी आता त्यांना विश्रांती घेण्यासाठी सांगीतले आहे. DharmaraoBaba Atram आज ते मुंबईहून गडचिरोलीला परत येणार होते. मात्र त्यांना प्रवास करण्यासाठी सुद्धा डॉक्टरांनी मनाई केल्याचे सांगीतल्या जात आहे. त्यांनी विश्रांती घेतल्यास ते लवकर बरे होतील असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.