उष्माघातासाठी मेयो,मेडिकलमध्ये विशेष खबरदारी

-‘शीत कक्ष" सज्ज

    दिनांक :06-May-2024
Total Views |
नागपूर, 
Heatstroke : उष्मा वाढत असल्याने मेयो, मेडिकल रुग्णालयात विशेष खबरदारी घेतली जात असून ‘शीत कक्ष' सज्ज झाला आहे. मात्र, नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी उष्माघात व इतर आजार टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी नागरिकांनी घेण्याची अत्यंत गरज आहे.
 
 
SjkfC
 
तापमानात वाढ झाल्याने उष्माघाताचे रुग्ण मेडिकलमध्ये येऊ लागले आहेत. रोज ओपीडीमध्ये सुमारे साडेतीन हजार रुग्णांपैकी उष्माघाचे शंभराहून अधिक असतात. मात्र, दाखल करुन घेण्यासारखे गंभीर अद्यापही नाहीत. दरवर्षी साधारण एप्रिल ते जून महिन्यात उष्माघात रुग्णांची संख्या सरासरी १० ते १५ टक्केपर्यंत वाढते. हे लक्षात घेता मेडिकल रुग्णालयात विशेष खबरदारी घेतली जात आहे.
 
 
उष्माघाताची लक्षणे असलेला रुग्णावर तातडीने व प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश तेथील डॉक्टर्स व प्रशासनाला आहेत. सुरक्षा रक्षक वा कर्मचाèयांना रुग्णालय परिसरात कुणी बेवारस रुग्ण आढळल्यास त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सूचित करण्यास सांगण्यात आले आहे. तेथे वार्ड २३ हा स्वतंत्र वार्ड सज्ज असून कूलर, शॉवर, शीतखडे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. मेयोतही वार्ड ३६ राखीव असून त्यात १५ बेड्स आहेत.
 
 
उष्माघात, अन्न विषबाधा, त्वचाविकार, टायफॉइड, गोवर, कांजण्या, डिहायड्रेशन, कावीळ आदींचा उन्हाळ्यात धोका असतो. तीव्र सूर्यप्रकाशाचा दीर्घकाळ संपर्क, उष्ण तापमानाचा संपर्क, पाण्याचे कमी प्रमाण यामुळे उष्माघात होतो. अशा रुग्णाला डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मुच्र्छा अशी लक्षणे असतात.
 
 
जिवाणू आणि विषाणूंचा प्रादुर्भाव या ऋतूत जास्त असतो. दूषित अन्न खाण्यात आल्याने विषबाधेचा धोका असतो. त्यामुळे मळमळ, जुलाब, ताप, अंगदुखी, पोटदुखी, अतिसार, उलट्या होतात.
 
 
दूषित पाण्यामुळे टायफॉईड होतो. जास्त ताप, भूक न लागणे, पोटदुखी, अशक्तपणा ही त्यांची लक्षणे आहेत. गोवर, कांजण्यांचा धोकाही उन्हाळ्यात वाढतो. तो विषाणूंद्वारे पसरतो. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होते. या दिवसांत घामाने शरीरातील पाणी बाहेर पडते. परिणामी शरीराची कार्यक्षमता कमी होते. दूषित पाणी व अन्नामुळे काविळीचा धोकाही उन्हाळ्यात जास्त असतो. कावीळमध्ये रुग्णाचे डोळे व नखे पिवळी पडतात. लघवीचा रंग पिवळा होतो.
 
खबरदारी गरजेची
 

SjkfCDr.-Avinash-Gavande 
 
रिकाम्या पोटी उन्हाळ्यात बाहेर पडू नका. भरपूर पाणी प्या. डोके, चेहरा, डोळे संरक्षित ठेवा. अन्न ताजे खा. जेवण साधे घ्या. बाहेरचे खाऊ नका. स्वच्छता ठेवा. आजारी, संक्रमितांपासून दूर रहा.- डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल