राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विनीत आखाडेला रजत पदक

    दिनांक :06-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
देवळी,
Vineet Akhade : दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत येथील विनीत आखाडे याने दौड स्पर्धेत भारतातून दुसरा क्रमांक प्राप्त करून रजत पदकावर आपले नाव कोरले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शहराचे नाव उंचावल्या बद्दल विनीतचे शहरात अभिनंदन केल्या जात आहे.
 
 

sdf
 
स्टेअर फॉउंडेशनतर्फ दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या क्रीडा स्पर्धेत भारतातील विविध राज्यातील संघ सहभागी होते. यात स्थानिक जनता जुनि. कॉलेजचा अकरावीचा विद्यार्थी विनीत आखाडे याने 200 मीटर धाव स्पर्धेत भारतातून दुसरा क्रमांक प्राप्त करून रजत पदक प्राप्त केले.
 
 
स्टेअर फाउंडेशनचे अधिकारी राजू बाणमारे, भगत व महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मेश झाडे यांनी विनीतचे अभिनंदन केले.