नवी दिल्ली,
hamas-drugs-captgon ७ ऑक्टोबर २०२३ हा दिवस इसरायलचे नागरिक कधीच विसरू शकणार नाहीत. हमास या दहशतवादी संघटनेने केलेल्या क्रूर आणि निर्दयी हल्ल्यात १४०० पेक्षा जास्त इसरायली नागरिकांचा मृत्यू झाला. हमासच्या दहशतवाद्यांनी इसरायलींना केवळ क्रूरतेने मारलेच नाही तर त्यांच्या मृतदेहांवरही अत्याचार केले. hamas-drugs-captgon लहान बाळांना जिवंत जाळणे, गर्भवतीला मारून तिच्या पोटातील गर्भालाही मारणे, मुलांच्या समोर आईवडीलांना शून्य अंतरावरून गोळ्या घालणे आणि हे सगळं कमी म्हणून महिलांवर बलात्कार करण्याचे कृत्य हमासने केले. द्वेष कितीही असला तरी हे सगळे एका सामान्य माणसाने करणे, जवळपास अशक्य आहे. hamas-drugs-captgon ताज्या खुलाशानुसार, इसरायलवर हल्ला करतेवेळी हमासचे दहशतवादी पूर्णत: नशेच्या अंमलात होते.
![hamas-drugs-captgon hamas-drugs-captgon](https://www.tarunbharat.net/Encyc/2023/10/21/hamas-drus_202310211112333243_H@@IGHT_400_W@@IDTH_600.jpg)
द यरूशलेम पोस्टच्या अहवालानुसार, हमासच्या दहशतवाद्यांनी कॅप्टागन नावाच्या नशेच्या गोळ्या खाऊन हल्ला केला होता. कॅप्टागन हे एक प्रकारचे सिंथेटीक ड्रग असून, गाझा पट्टीत सर्वत्र ते सहज आणि स्वस्तात उपलब्ध आहे. hamas-drugs-captgon याला गरीबांचे कोकेनही म्हटले जाते. या गोळ्या खाल्ल्याने हमास दहशतवाद्यांना दीर्घकाळ भूक लागली नाही आणि लोकांना मारण्याचे काम ते एकाग्रतेने करत राहीले. hamas-drugs-captgon कॅप्टागन या गोळ्या २०१५ पासूनच चर्चेत आहेत कारण इस्लामिक स्टेट अर्थात आयएसचे दहशतवादीदेखील याच गोळ्या घेऊन हिंसाचार करीत असल्याचे उघड झाले होते. गाझा ही या गोळ्यांची सर्वात मोठी बाजारपेठ असून, स्थानिक युवकांमध्ये कॅप्टागनच्या गोळ्या लोकप्रिय आहेत.
दरम्यान, अहवालानुसार लेबनान आणि सीरीयाने या गोळ्यांचे उत्पादन आणि वितरण वेगात वाढविले आहे. नार्कोलेप्सी आणि डिप्रेशनसाठी या गोळ्या दिल्या जातात. hamas-drugs-captgon या गोळ्यांची सवय लागते आणि त्यामुळे सायकोटीक रिअॅक्शनही येतात. या गोळ्यांनी झोप आणि भूक दोन्हींची जाणीव होत नाही. इटलीसह, जॉर्डन, मलेशिया, ग्रीस आणि इजिप्तमध्येही या गोळ्या लोकप्रिय आहेत आणि शालेय विद्यार्थीही त्याचे भरपूर सेवन करतात. hamas-drugs-captgon इस्रायली सैनिकांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या हमासच्या दहशतवाद्यांच्या मृतदेहांजवळून या गोळ्या सापडल्या आहेत.