मेट्रोचा जास्तीत जास्त उपयोग करावा ! (बघा व्हिडीओ)

ajit pawar-mahametro उपमुख्यमंत्री पवारांचे नागपूरकरांना आवाहन

    दिनांक :16-Dec-2023
Total Views |
नागपूर,
 
ajit pawar-mahametro आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिताबर्डी इतरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन पर्यंत नागपूर मेट्रोची सफारी करून प्रवाशांशी संवाद साधला. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नागपूरकरांना केले. ajit pawar-mahametro ते म्हणाले की, आज सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन पर्यंत असा मेट्रोचा प्रवास केला, माझे नागपूरकरांना आवाहन आहे की, आपण मेट्रोचा अधिकाधिक वापर करावा. राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करते हे नागरिकांना सुविधा देण्यासाठीच !अजून पुढे बुटीबोरीपर्यंत जाण्याचा मानस आहे. ajit pawar-mahametro त्यामध्ये एयरपोर्ट असून त्यांना जाण्यायेण्याच्या दृष्टिकोनातून काही व्यवस्था करण्याचे महामेट्रोने ठरविले आहे, असेही पवार यांनी नमूद केले. 
 
 
ajit pawar-mahametro
 
ते पुढे म्हणाले की, मी प्रवास करतांना प्रवाश्यांशी बोललो आणि ते समाधानी आहेत. त्यांच्या वेळेची बचत होते. ajit pawar-mahametro रोजचा प्रवास करण्याकरिता विद्यार्थी-विद्यार्थिनी मेट्रोचा प्रवास केला तर रस्त्यावरची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. संपूर्ण कॉरिडोरमध्ये मेट्रो सेवा सुरु होऊन एक वर्ष झाले असून त्यामध्ये बऱ्याच अंशी माहिती होण्याच्या दृष्टीने महामेट्रोने कार्य केले असल्याचा उल्लेख त्यांनी केला. ajit pawar-mahametro नागपूर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मेट्रोने प्रवास केला आहे. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, संचालक अनिल कोकाटे व राजीव त्यागी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. ajit pawar-mahametro