गोंधळी खासदारांच्या निलंबनाची कारवाई योग्यच !

mimicry in parliament संसदीय आयुधांचा वापर कधी?

    दिनांक :20-Dec-2023
Total Views |
अग्रलेख
mimicry in parliament संसदेच्या इतिहासातील खासदारांच्या निलंबनाची सगळ्यात मोठी कारवाई यंदाच्या हिवाळी अधिवेशनात झाली आहे. कारवाई दुर्दैवी असली तरी लोकसभा सभापती आणि राज्यसभेच्या अध्यक्षांच्या दृष्टीने ती अपरिहार्य होती. संसदेत १३ डिसेंबरला जी घुसखोरी झाली, ती घटनाही दुर्दैवी, अनपेक्षित घडलेली आणि देश हादरवून टाकणारी होती. mimicry in parliament अशा वेळी संसदेतील सर्व खासदारांनी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवत एकत्र येणे गरजेचे असताना विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात संसदेत गदारोळ घातल्यानेच संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना या खासदारांच्या निलंबनाची शिफारस करावी लागली, याचा विसर पडता कामा नये. केंद्रीय गृहमंत्र्यांनीच निवेदन करावे, या मुद्यावर तातडीने चर्चा व्हावी, mimicry in parliament अशी भूमिका घेत विरोधी खासदारांनी सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केल्याने आणि संसदेच्या कामकाजात सातत्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याने एकाच अधिवेशनात एवढ्या मोठ्या संख्येत खासदारांचे निलंबन करण्यात आल्याची ही घटना साधारण नाही. संसदेतला गदारोळ आता नित्याचाच झाला आहे.
 
 
mimicry in parliament
 
सगळ्यात दुर्दैवी बाब म्हणजे निलंबित झालेले खासदार संसद भवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून ज्याप्रकारे निषेध करीत होते, तृणमूलचे कल्याण बॅनर्जी राज्यसभेच्या अध्यक्षांची नक्कल करीत होते आणि स्वकर्तृत्वाने पप्पू ही महान उपाधी प्राप्त करणारे राहुल गांधी नक्कल करतानाचे दृश्य स्वत:च्या मोबाईलमध्ये चित्रित करीत होते. mimicry in parliament कल्याण बॅनर्जी यांनी तर लाज सोडल्यागत कृती केली आणि राहुल गांधी यांनी आपण पप्पू असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. गेली कित्येक वर्षे संसदेत काम कमी आणि गोंधळच जास्त होत आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने गोंधळाचे तंत्र अवलंबत सरकारला त्रास देण्याचेच ठरविले आहे की काय, असे वाटावे एवढी नकारात्मक भूमिका घेऊन काँग्रेस वागत आहे. काँग्रेससोबतच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांचे सदस्यही गोंधळ घालूनच स्वत:चे अपयश झाकण्याचा आणि जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. mimicry in parliament सध्याच्या हिवाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये झालेला गोंधळ बरा नव्हता. भारतीय संसदीय परंपरेला शोभणारा तर अजिबातच नव्हता. संसदेत काँग्रेस, डावे, तृणमूल आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घातलेला गोंधळ सभ्यतेच्या सर्व मर्यादा पार करणारा होता.
 
 
जे काही घडले ते लोकशाहीच्या मंदिराचे पावित्र्य भंग करणारे होते. त्यासाठी गोंधळी खासदारांना माफ केले जाऊच शकत नाही. मोदी सरकारला विरोध करण्याच्या नावाखाली नुसता गोंधळ घालायचा आणि आपले अपयश झाकत नकारात्मक भूमिका घ्यायची आणि देशातील जनतेची दिशाभूल करायची, हा प्रकार बरा नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या खासदारांनी प्रचंड गोंधळ घातला. mimicry in parliament राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांनी तीव्र नाराजी आणि संतापही व्यक्त केला. अधिवेशनात अध्यक्षांनी कठोर कारवाई करण्याचे संकेतही दिले होते. पण, विरोधकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. एकूण गोंधळाची सगळी पृष्ठभूमी तपासली तर जी कारवाई धनकड आणि ओम बिर्ला यांनी केली, ती योग्यच मानली पाहिजे. विरोधकांनी राज्यसभेत जो गदारोळ केला, तो अशोभनीय, असंसदीयच होता. त्यामुळे विरोधी पक्षांच्या १४३ सदस्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याची कारवाई योग्यच म्हणावी लागेल. mimicry in parliament वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत देशासमोर असलेल्या विविध प्रश्नांवर चिंतन आणि मनन होणे आवश्यक आहे. पण, ते होण्याऐवजी ज्येष्ठांच्या या सभागृहात गोंधळच होणार असेल तर या सभागृहाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते.
 
 
लोकसभेत बहुमत मिळविणाऱ्या पक्षाला सत्ता मिळते. पण, राज्यसभेतील पाशवी बहुमताच्या बळावर जर विरोधी पक्षांचे सदस्य गोंधळ घालणार असतील आणि कामकाज होऊच देणार नसतील तर जनतेमधून बहुमताने निवडून आलेले सरकार कधीच जनहिताची कामे करू शकणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. काँग्रेसला गोंधळाविषयी टोकले असता, काँग्रेसकडून भाजपाकडे बोट दाखविले जाते. आम्ही जेव्हा सत्तेत होतो, तेव्हा भाजपाचे लोक गोंधळ घालून कामकाज हाणून पाडत होते, याची आठवण करून देत आपण घालत असलेल्या गोंधळाचे काँग्रेसकडून निर्लज्जपणे समर्थन केले जाते. mimicry in parliament भाजपाने गोंधळ केला म्हणून आम्हीही गोंधळ करू, ही काँग्रेसची भूमिका मान्य केलीही, तरी काँग्रेसने आतापर्यंत भाजपापेक्षा दुप्पट गोंधळ घातला आहे. त्यामुळे गोंधळ घालण्याचा काँग्रेसचा कोटा कधीच संपला आहे. देशातला सगळ्यात जुना म्हणविला जाणारा काँग्रेस पक्ष भाजपाशी तुलना करीत गोंधळच घालण्याचा पोरकटपणा करणार असेल तर राहुल गांधी यांनी कितीही आवेश आणून न तुटलेला भारत जोडण्याचे नाटक केले तरी ते कार्यकर्त्यांमध्ये  चैतन्य निर्माण करू शकणार नाहीत. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये दारुण पराभवाचे तोंड पाहावे लागले असताना त्यातून बोध घेत स्वत:मध्ये सुधारणा करायची सोडून गोंधळ घालत लोकशाहीच्या मंदिराचे पावित्र्य भंग करणार असेल तर २०२४ च्या निवडणुकीत मतदार या पक्षाची काय गत करतील, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
 
 
mimicry in parliament या पक्षाला कुठल्याही निवडणुकांमध्ये यश मिळेलच, याची खात्री देता येत नाही. लोकसभेत सरकारचे बहुमत असतानाही केवळ गोंधळामुळे कुठलेही कामकाज होऊ शकत नाही. संसदेच्या अधिवेशनावर प्रचंड पैसा खर्च होत असताना कामकाज होणार नसेल, जनतेच्या हिताचे निर्णय होणार नसतील तर एक दिवस असा येईल की, जनता गोंधळ्यांना शंभर टक्के घरी बसवेल. जे काही सुरू आहे, ते अतिशय qचताजनक आहे. केवळ संसदेतच नव्हे, तर राज्यांच्या विधानसभांमध्येही गोंधळाचे प्रमाण वाढले आहे. अनेक राज्यांच्या विधानसभांमध्ये तर हाणामाऱ्याही होऊ लागल्या आहेत. लोकांनी अतिशय विश्वासाने निवडून दिलेले प्रतिनिधी जर असे एकमेकांना मारणार असतील आणि विधानसभांचा आखाडा बनविणार असतील, तर देशात लोकशाही नव्हे, ठोकशाही काम करीत आहे, असेच म्हणावे लागेल. आमदार-खासदार हे मारहाण करायला काय रस्त्यावरचे गुंड आहेत काय? mimicry in parliament जनतेने मोठ्या अपेक्षांनी आपल्याला निवडून दिले आहे याचा विसर या मंडळींना पडतोच कसा? आपल्याला जनतेच्या हिताची कामे करायची आहेत, सभागृहांत आपण जनहिताचे प्रश्न मांडले पाहिजेत, सत्ताधाऱ्यांच्या मागे लागून जनतेच्या समस्या मार्गी लावल्या पाहिजेत, सतत पाठपुरावा करून सरकारला सळो की पळा करून सोडले पाहिजे, संसदीय आयुधांचा वापर करून सरकारला धाकात ठेवले पाहिजे.
 
 
हे सगळे करायचे सोडून जर सन्माननीय सदस्य हाणामाऱ्या करणार असतील, चावडीवर होतो तसला गोंधळ घालणार असतील तर संसद आणि विधिमंडळांची प्रतिष्ठा धोक्यात येईलच; जगातली सगळ्यात मोठी लोकशाहीसुद्धा अपयशी ठरल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या अभिमानाने आम्ही सांगत असतो की, भारतात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही नांदते आहे. विविध धर्म, पंथ, भाषा, प्रांत असलेला आणि विविधतेने नटलेला आमचा भारत देश लोकशाही मार्गाने विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे, हे सांगताना यापुढे आमची जीभ अडखळायला नको म्हणजे झाले. mimicry in parliament ब्रिटन, अमेरिका आणि आयर्लंड या देशांच्या मदतीने आम्ही आपल्या देशाची सगळ्यात मोठी लिखित घटना तयार केली आहे. त्या घटनेत जे नियम आहेत, ज्या तरतुदी आहेत, त्यानुसार आमचे वर्तन का असू शकत नाही, हा फार गंभीर प्रश्न आहे. केवळ काँग्रेसच नाही, तृणमूल काँग्रेस, डावे आणि आता या सगळ्यांच्या रांगेत उबाठा सेनाही जाऊन बसली आहे. अत्यल्प संख्याबळ असलेल्या उबाठा आणि शरद पवार गटाने अंगापेक्षा बोंगा मोठा होईल, असे धाडस करू नये, एवढेच यानिमित्ताने सुचवावेसे वाटते.