अग्रलेख
self independance आत्मनिर्भरता हा शब्द देशाला नवीन नाही. त्याचा अर्थ प्रत्येकास माहीत आहे. कोणत्याही भारतीय भाषेत त्या शब्दाचा अर्थही सारखाच आहे. स्वतःच्या पायावर उभे राहा, परकीय आधाराच्या कुबड्या फेका आणि स्वावलंबी बना, हा या शब्दाचा संदेश आहे. तसे पाहिले तर हा संदेशही नवा नाही. self independance गेल्या शतकभरापासून आपण तो ऐकत आलो आहोत आणि त्याआधीच्या इतिहासात तर आपण आत्मनिर्भर होतो, याचे दाखलेही सापडतात. त्यामुळे पुन्हा एकदा आत्मनिर्भर समाजनिर्मिती हा काही चमत्कार नाही. आत्मनिर्भर समाज, आत्मनिर्भर देश ही अशक्य कल्पना नाही, हेही सर्वांस माहीत आहे. सध्या चर्चेत असलेल्या आत्मनिर्भरता या शब्दासही तोच अर्थ अभिप्रेत आहे. self independance आता आपण पुरेसे स्वावलंबी व्हायला हवे. सर्व क्षेत्रांतील प्रगतीच्या, विकासाच्या नेमक्या वाटा देशाला कधीच्याच सापडल्या आहेत; आता त्या खुणावू लागल्या आहेत आणि त्या वाटेवर आपली पावले पडू लागली आहेत. self independanceतेव्हा त्या वाटेवरून चालताना तरी, देशापलीकडच्या जगाचे बोट धरायची अपेक्षादेखील ठेवू नका, ज्यासाठी आजवर जगाकडे हात पसरले, त्या गोष्टींची पूर्तता करण्याची क्षमता आणि त्यासाठी आवश्यक असलेली संसाधने आपल्याकडेदेखील असल्याने, आत्मविश्वासाने पावले टाका आणि एकमेकांना साथ देत आत्मनिर्भरतेच्या शिखरावर पोहोचा, असा नव्या दशकाच्या उंबरठ्यावरील या संकल्पनेचा संदेश आहे.
अशी एखादी, सर्वांस अगोदरपासूनच माहीत असलेलीच संकल्पना जेव्हा कोणा नेत्याच्या तोंडून संदेशाच्या रूपाने समोर येते, तेव्हा ती प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक मने, हात, यंत्रणा झटू लागतात आणि ती एक चळवळ होते. अशा चळवळी नेहमीच लगेचच यशस्वी होतात असे नाही, पण त्यासाठी आवश्यक असलेले लोकशिक्षण सुरू होते, जनजागृतीची प्रक्रियाही सुरू होते आणि तिचे महत्त्व मनामनात अधोरेखित होते. दिवसभर काबाडकष्ट करून, दिवस मावळल्यानंतरही रात्रपाळीचे काम संपवून घरी परतलेला एखादा श्रमजीवी कामगार शहरातल्या फूटपाथवरच्या आपल्या झोपडीबाहेरच्या खाटेवर अंग टाकतो आणि क्षणात त्याला गाढ झोप लागते. self independance सकाळ उजाडते, रस्त्यावर गजबज सुरू होते, वाहनांचा, गर्दीचा, फेरीवाल्यांचा गोंगाट सुरू होतो, तरीही त्याची झोपमोड होत नाही. आसपास कितीही कोलाहल असला तरी तो शांत झोपलेला असतो. उन्हं अंगावर येऊ लागतात आणि त्या कामगाराची आई, हलक्या आवाजात त्याला त्याच्या नावाने हाक मारते आणि त्या कोलाहलातही, त्या नाजूक, हलक्या आवाजातील हाकेने त्याला जाग येते. त्याचा नवा दिवस सुरू होतो.
एवढ्या गलबलाटातही, गर्दीने गजबजलेल्या परिसरातही, त्या हाकेने त्याला जाग येते. ही त्याच्या नावाची किमया. समाजाचे, माणसांच्या समूहांचेही तसेच असते. त्याला त्याच्या नावाने आवाहन केले, की तो भानावर येतो आणि त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होते. आत्मनिर्भरता चळवळीमागचे सूत्र हेच आहे. ज्या राजकीय परिस्थितीतून या शब्दाला चळवळीचे वजन प्राप्त झाले, त्या राजकारणात या शब्दाचे अस्तित्व काय आहे, हा मात्र मोठा गमतीदार चर्चेचा विषय आहे. कोणाच्याही आधाराशिवाय, स्वतःच्या ताकदीवर, म्हणजे राजकारणाच्या भाषेत, स्वबळावर आपले अस्तित्व उभे करण्याची ‘आत्मनिर्भर' कल्पना राजकारणाने मात्र, गेल्या साडेचार दशकांत काहीशी बासनात गुंडाळून ठेवली, असेच म्हणावे लागेल. गेल्या काही दशकांतील राजकीय परिस्थिती हेच त्याचे कारण! self independance अन्य समविचारी किंवा प्रसंगी, विरोधी विचार असलेल्याही पक्षांची मोट बांधल्याखेरीज कोणताही राजकीय पक्ष अलिकडच्या सत्ताकारणात टिकाव धरू शकत नाही, हा एक वेगळाच संकेत या काळात रूढ झाला. स्वबळावर किंवा युती-आघाडी केल्याखेरीज राजकारण रंगत नाही, सत्ताकारणात स्थिरावता येत नाही, हे राजकारणात अधोरेखित झाले. आणिबाणीनंतरची परिस्थिती यास काहीशी कारणीभूत ठरली.
एका प्रबळ राजकीय पक्षाच्या विरोधातील नकारात्मक जनमताचे ध्रुवीकरण गरजेचे ठरले. जनमत एकवटण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एका प्रबळ पक्षाशी मुकाबला करून त्याच्याकडून सत्ता हिसकावून घेणे ही सत्तेच्या राजकारणाची गरज ठरली आणि जनता पार्टी नावाची एक राजकीय आघाडी आणिबाणीनंतर जन्माला आली. self independance भिन्न विचारसरणी, भिन्न राजकीय तत्त्वप्रणाली आणि भिन्न कारकीर्द असलेले काही राजकीय पक्ष एकत्र आले आणि राजकीय गरज म्हणून आत्मसन्मानाचे काही मुद्देही सत्ताकारणासाठी तात्पुरते बाजूला ठेवण्याच्या अटीवर, किमान समान कार्यक्रम नावाच्या परस्पर समझोत्याचा मुखवटा चढवून आघाडीच्या नावाने एका प्रबळ राजकीय पक्षाच्या विरोधातील पर्याय म्हणून उभे ठाकले. कडबोळे, खिचडी असे शब्द राजकारणात रूढ होण्याचा काळ येथे सुरू झाला. तडजोडीच्या राजकारणाची खिल्ली उडविण्याची सुरुवात झाली, तरी राजकीय पक्षांनी त्याला दाद दिली नाही. हे आघाडीचे राजकारण पुढे देशाच्या लोकशाहीत पुरेपूर मुरले आणि कायमचे स्थिरावले. मतदाराच्या विखुरलेल्या नकारात्मक मतांची मोट बांधून सत्ताकारणासाठी एकत्र आलेल्या आघाडीतील कोणताही एक पक्ष, स्वबळावर, आत्मनिर्भरतेच्या विश्वासाने हा सामना करू शकणार नाही, याची त्या आघाडीतील प्रत्येक पक्षास जाणीव होती.
त्यामुळे आघाडीच्या राजकारणास कोणत्या तरी तात्त्विक मुद्याचा मुलामा देत, मतदारांना त्याची भुरळ घालत, एका राजकीय पक्षाच्या विरोधातील आपली आपली मते एकत्र करून त्या पक्षास पराभूत करण्यासाठी आत्मनिर्भरतेऐवजी, परस्परांच्या आधाराने सारे राजकीय पक्ष अशा आघाड्यांच्या छत्रीखाली एकत्र येऊ लागले आणि राजकारणात मात्र, स्वबळ किंवा आत्मनिर्भरता कामाची नाही, या वास्तवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर आजतागायत देशात, केंद्रात किंवा राज्याराज्यांत, आघाडी किंवा युतीचे प्रयोग जवळपास अपरिहार्यच झाले आहेत. self independance कोणताही एक राजकीय पक्ष आत्मनिर्भरपणे स्वबळावर सत्तेचे राजकारण करू शकत नाही, हे स्पष्ट झाले आणि आघाडी किंवा युतीच्या राजकारणाने राजकीय पक्षाच्या स्वबळाच्या किंवा आत्मनिर्भरतेच्या कल्पनेस जवळपास तिलांजली दिली. युती किंवा आघाडी करून, मतदारांच्या परस्पर विरोधी मतांची निवडणूकपूर्व किंवा निवडणुकीनंतरची गोळाबेरीज करून सत्ता प्राप्त करून घेणे हा त्यानंतरच्या काळातील लोकशाहीसंमत मार्ग झाल्यामुळे, राजकीय पक्षांना यापुढेही स्वबळ वाढवून आत्मनिर्भर होण्याची गरज भासेलच, असे चित्र राजकारणात कधी अवतरेल असे दिसत नाही.
self independance उलट, मतदारांनी नाकारल्यानंतरही, एकत्र येऊन, प्रसंगी जनादेश गुंडाळून, गरजेनुसार, गरजेपुरता आणि गरज असेपर्यंत एकमेकांचा आधार घ्यावा, सत्ताकारण करावे आणि गरजेनंतरच्या नव्या समीकरणांची मांडणी साधता आली, म्हणजे जुन्या युती, आघाड्यांना तिलांजली देऊन नव्या कुबड्यांचा आधार घेत नवे सत्ताकारण सुरू करावे, हे आता देशाच्या लोकशाहीने मूकपणे स्वीकारलेले राजकारण आहे. राजकारणात हे घडताना दिसत असूनही, मतदार मात्र हतबलतेने निवडणूक नावाच्या परंपरेतून आपण सरकार निवडून देतो या भाबड्या समजुतीतून मतदान करीत असतो. त्याचा राजकीय पक्षांच्या आत्मनिर्भरतेशी संबंध नाही आणि हा राजकीय फॉम्र्युला सर्वसंमत झाल्यामुळे, आपला पक्ष स्वबळाच्या हिमतीवर किंवा आत्मनिर्भरतेने सत्ताकारणात उभा राहिला पाहिजे असा विचारही कालबाह्य किंवा दुबळा होऊ लागला आहे. self independance असे असूनही युती, आघाडीच्या राजकारणाने आत्मनिर्भरता या शब्दास राजकारणात एक वेगळाच, सोयीचा अर्थ प्राप्त झाल्यासारखे दिसू लागले आहे. मते कोणास द्यावीत, कोणास निवडावे, कोणास नाकारावे याबद्दल मतदारांनी स्वमतानुसार काहीही ठरवावे आणि मतदान करावे, पण मतदानानंतरच्या सत्ताकारणाच्या प्रक्रियेत मात्र सत्तेचे राजकारण कोण करणार, याचा निर्णय राजकीय पक्षच घेऊ शकतात, हाही नवा पायंडा पाहावयास मिळू लागला आहे.
मतदाराच्या मताचा, जनादेश नावाच्या गोंडस शब्दाचा आधार न घेतादेखील सत्ताकारण करता येते, याचे धडे राजकारणास मिळू लागले असतील, तर मात्र वेगळ्या अर्थाने त्यालाच राजकीय आत्मनिर्भरता म्हणता येईल. किमान समान कार्यक्रम ही भिन्न विचारधारांच्या राजकीय पक्षांच्या सोयीची रूढ झालेली एक आत्मनिर्भर संकल्पना हे या राजकारणाचे मूळ आहे. self independance किमान समान कार्यक्रमामुळे सत्ताकारणातील महत्त्वाच्या मुद्यांवरील आपापली धोरणे तात्पुरती वजा करून, सत्ता राबविणे हेच एक समान ध्येय राबविले की आत्मनिर्भर सत्ताकारण शक्य होते, हे या संकल्पनेने सिद्ध केले आहे. ही संकल्पना समाजाने स्वीकारली किंवा नाही याच्याशी राजकारणाचा काही संबंध नसतो. समाजाची त्याला मान्यता असलीच पाहिजे, हे तत्त्व या संकल्पनेच्या आड येऊ शकत नाही. self independance त्यामुळे निवडणुकींच्या काळात मतदारास राजाचा मान मिळतही राहील. पण मतदानाचे काम संपले की, पुढच्या सत्तेच्या राजकारणात तो कोठे असेल, यावर मात्र आज कोणीच छातीठोक भाष्य करू शकणार नाही. त्यामुळेच राजकारणाकडे गांभीर्याने पाहण्याच्या दृष्टीचा अभाव बळावत चालला असावा.