कापसाची शेती आणि समृद्धी

white gold-cotton शेतकऱ्यांची स्थिती कर्जामुळे वाईट

    दिनांक :26-Dec-2023
Total Views |
अग्रलेख
 
white gold-cotton विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यात अवघ्या दोन दिवसांत ५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. white gold-cotton २०२३ या एकाच वर्षात पश्चिम विदर्भातील साडे बाराशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आणि शेतमजुरांमध्येही आत्महत्यांचे लोण पसरत असल्याचा दावा शेतकरी आंदोलनातील नेते करीत आहेत. यात काही कमी-जास्त असेलही, पण आत्महत्या होत आहेत आणि त्या वाढत आहेत, हे खरे आहे. white gold-cotton या क्षेत्रातील अभ्यासक असे म्हणत आहेत की, या भागात दररोज सरासरी ५ शेतकरी आपले जीवन संपवीत आहेत. याचा अर्थ असा की, महिन्याकाठी दीडशे कुटुंबांवर आघात होतोय् आणि वर्षाकाठी हा आकडा दोन हजारांच्या आसपास जातो. १९९७ पासून विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या. तेव्हापासून एखाद्या संसर्गासारख्या या करुण घटना सातत्याने घडत आहेत. शेतकरी स्वावलंबन मिशन झाले, कर्जमाफी झाली. white gold-cotton पण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबलेल्या नाहीत. त्या पूर्णपणे थांबायच्या असतील तर आपले जुने दृष्टिकोन बाजूला ठेवून या समस्येकडे नव्या नजरेने पाहिले पाहिजे. त्या अनुषंगाने काही मूलभूत बाबींकडे यानिमित्ताने लक्ष वेधले पाहिजे.
 
 
white gold-cotton
 
विदर्भातील शेतकरी हे प्रामुख्याने अल्पभूधारक आहेत. कुटुंबामागे सरासरी दीड एकर, दोन एकराचा पट्टा हे भूधारणेचे प्रमाण. सिंचनाच्या सोयी पुरेशा नाहीत. पुरेशा नाहीत असे म्हणण्यापेक्षा त्या जवळजवळ नाहीतच. त्यामुळे मोसमी पावसावर आधारित वर्षभरातले एक पीक बहुतांशी शेतकरी घेतात. त्यात कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, कधी बोंडअळी तर कधी वन्यप्राण्यांचा उच्छाद. पतपुरवठ्याची खात्रीलायक व्यवस्था नाही. white gold-cotton बी-बियाणांचा व्यवस्थित पुरवठा नाही. खते-कीटकनाशके अतिशय महाग आहेत. हे सारे व्यवस्थित झाले तरी मार्केटमधील भावांची काहीच हमी नाही. तरीही शेतकरी शेती करतात. कारण त्यांच्याकडे दुसरा उपजीविकेचा मार्ग नाही. शेती हा तरी त्यांच्या उपजीविकेचा मार्ग आहे काय, या प्रश्नाचे उत्तरदेखील नकारार्थीच येते. कारण शेतीतून येणाऱ्या उत्पन्नातून फायदा तर सोडा, शेतकऱ्यांचे कुटुंब वर्षभर जगेल एवढा पैसा सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतीचे वर्णन-चित्रण साहित्य-सिनेमात फार चांगले येते. white gold-cotton वास्तव तसे नाही. इतर कोणत्याही उद्योगाच्या तुलनेत कृषी क्षेत्रात सर्वाधिक आत्महत्या घडल्या आणि घडत आहेत. महाराष्ट्रासह पंजाब, उत्तर प्रदेश, केरळ आणि कर्नाटकातही शेतकरी आत्महत्या झाल्या. यात कर्जबाजारीपणाखेरीज अन्य काही कारणे आढळली, हे खरे आहे. परंतु, प्रमुख कारण न परवडणारी शेती व त्यातून डोक्यावर येणारे भलेमोठे कर्ज हेच आहे, यात वाद नाही.
 
 
विदर्भातील नव्वद टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांची स्थिती कर्जामुळे वाईट झालेली आहे. त्यातही बहुतांश आत्महत्या प्रकरणे कापूस उत्पादक भागातील आहेत. white gold-cotton काही वर्षांपूर्वी एक अभ्यास झाला होता. त्यात ४० टक्के शेतकऱ्यांनी असे म्हटले होते की, आम्हाला उपजीविकेचा दुसरा पर्याय मिळाल्यास आम्ही शेती करणे सोडून देऊ. ४० टक्के हा फार मोठा आकडा आहे. याचा अर्थ समस्येची व्याप्ती मोठी आहे. दीर्घकालीन कर्जबाजारीपणा आणि वर्षानुवर्षे जमा झालेले व्याज भरण्यात असलेली असमर्थता आणि आर्थिक हलाखीमुळे कौटुंबिक वाद, नैराश्य अशा या दोन बाजू आहेत. अशा स्थितीत शेतकरी निराशेच्या गर्तेत जातो. त्याची मानसिकता कमकुवत होते आणि आत्महत्या घडतात. white gold-cotton या समस्येकडे एखाद्या आजाराच्या नजरेने पाहिले पाहिजे. आजार शेतकरी व शेतीत नाहीत. ते आपल्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक व्यवस्थेत दडलेले आहेत. गेल्या तीन दशकांत जीवनाच्या सर्व क्षेत्रांत बदल झाले. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणामुळे संरक्षित अर्थव्यवस्था संपुष्टात आली. मार्केट फोर्सेसचा परिणाम सर्वत्र झाला. कापूस एकाधिकार योजना त्यामुळेच निकालात निघाली. या परिवर्तनाला शेती अपवाद असू शकत नाही. इतर क्षेत्रांनी या बदलांशी जुळवून घेतले. white gold-cotton त्यांच्याकडे ती क्षमता होती. शेतकऱ्यांकडे ती क्षमता नाही. बदलांशी जुळवून घेण्यासाठी त्यांना पारंपरिक शेतीपासून थोडे दूर जाण्याची गरज आहे.
 
 
मार्केटमध्ये ज्याची मागणी आहे, त्याचे उत्पादन घेतले पाहिजे. आता नव्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांची चळवळ सुरू झालेली आहे. दीड एकर शेती एकट्याने करण्यापेक्षा प्रत्येकी दीड एकर शेती असलेले शंभर शेतकरी एकत्र येऊन अशी कंपनी स्थापन करू शकतात. त्यांच्या सामूहिक शेतीचा आकार दीडशे एकर होतो. white gold-cotton त्यांना सरकारकडून मदत, मार्गदर्शन मिळू शकते. पश्चिम महाराष्ट्रात अशा संघटना शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन निर्माण केल्या. उदाहरणच सांगायचे तर बटाट्याचे चिप्स निर्माण करणाऱ्या कंपन्यांशी त्यांनी करार केला. त्या कंपन्या शेतात येऊन रोखीने मोबदला देतात आणि बटाटे घेऊन जातात. हे असे अनेक पिकांच्या संदर्भात घडले आहे. ते विदर्भातही घडले पाहिजे. आणि ते तसे घडायचे असेल तर विदर्भातील कापूस पट्ट्याचा इतिहास बाजूला ठेवून नव्या दृष्टीने या समस्येकडे पाहिले पाहिजे. कर्जमाफी सोडा, स्वावलंबन मिशन जाऊ द्या मागे. सध्याचे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत मार्केट आणि महाराष्ट्र-विदर्भ-स्थानिक संदर्भात कापसाची शेती या अंगाने हा विषय तपासला गेला पाहिजे. white gold-cotton शेतकऱ्यांसाठी सरकारने तयार केलेल्या योजनांचा लाभ योग्य, पात्र व गरजूंपर्यंत पोहोचतोय् की नाही, हेही तपासले पाहिजे. केंद्र सरकारतर्फे वर्षाकाठी सन्मान निधीचा भाग म्हणून शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले जातात. हा निधी गरजूंपर्यंतच जातोय् की संपन्न शेतकऱ्यांनाही मिळतोय्, हेही तपासले पाहिजे. कापसाची शेती हा विषयच अतिशय गुंतागुंतीचा आहे, हे खरे !
 
 
पण, जगभरात वस्त्रोद्योगात तेजी असताना कापसाचीच शेती तोट्यात राहत असेल तर धोरणात्मक पातळीवर काही तरी चुकत असल्याची कबुली कोणत्या तरी टप्प्यावर प्रांजळपणे दिली पाहिजे. कापसाच्या शेतीचा स्वतंत्र व वेगळा विचार करून त्या क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी पूर्णपणे नवीन योजना आखली पाहिजे. white gold-cotton कापूस ते कापड हे आपल्या एकाधिकार योजनेचे स्वप्न होते. त्यासाठी शेतकऱ्यांच्या चुकाऱ्यातून भांडवल उभारणी निधी घेतला गेला. पण, त्या प्रमाणात सूत गिरण्या किंवा अन्य वस्त्रोद्योग उभे राहिले नाहीत. आणि वस्त्रोद्योग निर्माण झाले तरी ते अशा भागात, जिथे कापूस होत नाही. विदर्भातही खाजगी वस्त्रोद्योग व्यवस्थित चालत असल्याची उदाहरणे दिसतात. मग कापूस पिकवणारा शेतकरी निराशेत का जगतो, त्याचेच कुटुंब हलाखीत का असते, अशाच कुटुंबांमध्ये आत्महत्या का घडतात, याचा कधी तरी कापसाच्या अर्थकारणाच्या अंगाने विचार केला पाहिजे.white gold-cotton
 
 
कापसाच्या शेतीचा इनपुट आणि आऊटपुट यांच्या संतुलनातही लक्ष घातले पाहिजे. सरकारकडून अनेक उद्योगांना सवलती दिल्या जातात. कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नका. त्यांना सवलत देऊ नका. त्यांना अशी सर्वसमावेशक योजना द्या की, शेतकऱ्यांना कापसाची शेती करणे परवडेल. white gold-cotton त्यासाठी जमिनीची प्रत तपासणे, ती सुधारणे, नव्या जातींशी शेतकऱ्यांचा परिचय करून देणे, दर्जेदार बी-बियाणे, खते-कीटकनाशके यांचा पुरवठा होणे, कापूस प्रक्रिया उद्योगांशी शेतकऱ्यांना थेट जोडून देणे आणि अंतिमतः शेतकऱ्याच्या पदरात त्याचे योग्य माप टाकणे व त्याच्या कुटुंबाचे जीवन सुखकर होईल, यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था करणे ही यातली मूलभूत दृष्टी असली पाहिजे. आपण समृद्धी महामार्ग बांधला. तो आरंभी ज्या पट्ट्यातून जातो, त्याच पट्ट्यात या आत्महत्या घडत आहेत. त्या महामार्गावरून कापसाच्या शेतीपर्यंत समृद्धी नेता येते का, हेही एकदा विचारात घ्या ना!white gold-cotton