गॅरंटी विरुद्ध वॉरंटी !

INDI Alliance-elections कल्ला हो हल्लाखेरीज काही नाही

    दिनांक :05-Dec-2023
Total Views |
अग्रलेख
INDI Alliance-elections इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुजिव अलायन्स... इंडिया ! अर्थात - भारतीय राष्ट्रीय विकासात्मक समावेशी आघाडी. ही आघाडी म्हणे २८ पक्षांची. यातला प्रमुख पक्ष काँग्रेस. यात आप, डावे, तृणमूल काँग्रेस, जनता दल युनायटेड, द्रमुक, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय लोकदल, समाजवादी पार्टी इत्यादी पक्ष आहेत. INDI Alliance-elections पण, यातला कुणाचाही कुणाशी ताळमेळ नाही. काँग्रेस हा इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असला, तरी त्या पक्षाने या सर्वांना सोबत घेण्यासाठी बैठकांच्या पलीकडे काहीही केलेले नाही. परवा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आले. त्यात भाजपाने मिळविलेले यश विरोधकांच्या उरात धडकी भरवणारे आहे. INDI Alliance-elections राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड अशी तिन्ही महत्त्वाची राज्ये भाजपाने प्रचंड बहुमतांसह जिंकली. तेलंगणात काँग्रेसला कौल मिळाला. मिझोरममध्ये सत्तांतर झाले. हिंदी बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  प्रदेशांमधील भाजपाचा विजय इतर विकासात्मक मुद्यांसह ‘मोदी की गॅरंटी'च्या मुद्यावर झाला. INDI Alliance-elections पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे उत्तुंग नेतृत्व, अमित शाह, जे. पी. नड्डा यांच्यासारखे कसबी रणनीतिकार, भाजपाची भक्कम पक्ष संघटना, निष्ठावंत कार्यकर्ते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने गेल्या दशकभरात संपूर्ण देशात केलेली कामे या सर्वांचे पाठबळ या विजयाच्या मागे होतेच.
 
 
INDI Alliance-elections
 
इंडिया आघाडी या निवडणुकीत लढली नाही. INDI Alliance-elections त्यामुळे त्या आघाडीचा पराभव झाला, असे म्हणता येत नाही. पराभव झाला तो काँग्रेसचा आणि तिथल्या-तिथल्या प्रादेशिक पक्षांचा. तृणमूल काँग्रेसच्या नेत्री आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र, हा भाजपाचा विजय नसून काँग्रेसचा पराभव असल्याचे म्हटले आणि इंडिया आघाडीत हाय तौबाचे वातावरण निर्माण झाले. यंदाच्या जूनमध्ये इंडिया आघाडी आकाराला आली. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर संयुक्त पर्याय म्हणून इंडिया आघाडीची उभारणी केली जात असल्याचे आरंभी सांगितले गेले. पण, इंडिया आघाडीच्या घटक पक्षात संवाद आणि एकसूत्रता नाही, हे लगेच स्पष्ट झाले. INDI Alliance-elections तसे नसते तर या पाच राज्यांतील निवडणुका लढविताना त्यांच्यात कुठेतरी काहीतरी सामंजस्य दिसले असते. या निवडणुकीकडे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची मिनी ट्रायल अशा नजरेने पाहिले जात होते. पण, सामंजस्य नव्हते, जागा वाटप नव्हते, मैत्रीपूर्ण लढती नव्हत्या, एकमेकांना पाqठबा नव्हता. ज्या राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत आहे, तिथे तो पक्ष इंडियातील घटक पक्षांना विचारत नाही. जिथे इंडिया आघाडीतील घटक पक्षांची स्थिती चांगली आहे किंवा सत्ता आहे, तिथे तो पक्ष काँग्रेसला विचारत नाही. INDI Alliance-elections आता सर्वांना तोंड फुटले. ममता दीदींनी या पराभवाचे खापर काँग्रेसच्या नावाने फोडले.
 
 
आता इंडिया आघाडीची बैठक ठरतेय् तर कुणी नाराज तर कुणी आजारी असल्याने येणार नसल्याचे सांगितले जातेय्. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना या पराभवांच्या मालिकेतही काँग्रेसची लाट दिसते आणि शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना महाराष्ट्रात भाजपाचा पराभव होणार, असे ठामपणे म्हणता येते. INDI Alliance-elections हा इंडिया आघाडीएवढाच विनोदी प्रकार म्हटला पाहिजे. संजय राजाराम राऊत हे उद्धव ठाकरेंच्या शिल्लक शिवसेनेचे प्रवक्ते म्हणतात की, इंडिया आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढले असते तर चित्र वेगळे राहिले असते. ते इंडिया आघाडीच्या समन्वय समितीत आहेत आणि तरीही आपसात समन्वय नसल्याचे तेच जाहीरपणे सांगतात, हाही आणखी एक विनोद आहे. एकुणात, भारतात पुन्हा एकदा भाजपाच्या वाढत्या प्रभावाच्या पृष्ठभूमीवर राष्ट्रीय पक्षाचे महत्त्व वाढत असताना आणि प्रादेशिक पक्ष संदर्भहीन होत असल्याचे दिसू लागलेले असताना इंडिया आघाडीने प्रादेशिक पक्षांच्या भरवशावरच राजकारण करण्याचा मनसुबा ठेवावा, हे तसे अनाकलनीय आहे. INDI Alliance-elections कुणी काहीही म्हटले तरी भाजपाच्या नंतर देशाच्या राजकारणात काँग्रेसचाच विचार करावा लागतो. सव्वाशेहून अधिक वर्षे जुना असलेला हा पक्ष !
 
 
एकेकाळी देशावर आणि सर्व राज्यांमध्ये सत्ता उपभोगलेला हा पक्ष... आणि आता इंडिया आघाडीसारख्या केविलवाण्या प्रयोगांमध्ये स्वतःचे अस्तित्व शोधणारा पक्ष ही घसरण कुणाच्याही लक्षात यावी. विशेष म्हणजे काँग्रेस म्हणा वा इंडिया आघाडी म्हणा, यातल्या कुणाकडेच एकमुखी मान्यता असलेला नेता नाही. इंडिया आघाडीचा नेता कोण, असा प्रश्न विचारला तर दहा-पंधरा चेहरे समोर येतात. लोकांनी पाहायचे कुणाकडे? INDI Alliance-elections लोकांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खडगे किंवा अखिलेश यादव हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतील, अशी कल्पना करायची की या पदासाठीचे जुने-पुराने उमेदवार शरद पवारांकडेच पुन्हा पाहायचे? नेत्याचे एका क्षणासाठी बाजूला ठेवू. आता इंडिया आघाडीचा कार्यक्रम विचारा. एका वाक्यात सांगायचे तर- भाजपाला पराभूत करायचे आहे- हा त्यांचा कार्यक्रम. ते कसे करणार, कोणत्या पद्धतीने करणार, त्यासाठी रणनीती काय, यातल्या कोणत्याही पक्षाचे उत्तर देण्याची इंडिया आघाडीची ताकद नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले ते बरोबरच आहे. इंडिया आघाडीच्या भूमिकेतच नकारात्मकता आहे आणि ती सोडल्याशिवाय ही आघाडी एक इंचही पुढे सरकण्याची शक्यता नाही. INDI Alliance-elections भारतात लोकशाही आहे आणि ती बहुपक्षीय आहे. ते आपल्या लोकतंत्राचे बलस्थान आहे. मात्र, अनेक स्वार्थांध प्रादेशिक पक्षांचे पेव गतकाळात फुटले आणि लोकतंत्राची वासलात लावली गेल्याचे सर्वांनी पाहिले. एक काळ होता की, प्रादेशिक पक्षांना केंद्रीय राजकारणात व सत्ताकारणात मोठे महत्त्व मिळत असे. आता ते दिवस राहिलेले नाहीत.
 
 
‘मोदी की गॅरंटी' हे सध्याच्या राजकारणातले खणखणीत नाणे आहे आणि ते वारंवार भाजपाला विजय मिळवून देते आहे. आणि तरीही वॉरंटी संपलेल्या प्रादेशिक पक्षांच्या भरवशावर काँग्रेसला भाजपाचा पराभव करण्याची स्वप्ने पडत असतील तर त्या पक्षाने राजकारणाचा सूर गमावला, असेच म्हणावे लागेल. भारताचे राजकारण पूर्वीसारखे राहिलेले नाही. काळासोबत मतदारांची मनेही बदलली. आता अमुक हटाव, तमुक बचावच्या नाऱ्यांनी निवडणुका जिंकता येत नाहीत. INDI Alliance-elections त्यासाठी काम करावे लागते. निर्णय घ्यावे लागतात. जनतेच्या आशा-आकांक्षांना प्रतिसाद द्यावा लागतो. विरोधक म्हणून आपण स्वत:ला समोर आणत असतो तेव्हा कार्यक्रम आणि विचार द्यावा लागतो. लोक आपल्याकडे पर्याय म्हणून पाहतील, अशी वातावरण निर्मिती करावी लागते. इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांना यातले काहीही करायचे नाही... त्यांना केवळ मोदींना हरवायचे आहे, असे कसे चालेल? आता लोकसभा निवडणुकीला केवळ तीन-चार महिन्यांचा काळ बाकी असताना इंडिया आघाडीतला हा कलगीतुरा संपलेला नाही. कितीही बैठका घेतल्या तरी तो यापुढच्या काळात अधिक कर्कश होत जाणार आहे. INDI Alliance-elections त्यामुळे या आघाडीकडून यापुढेही कल्ला-हो-हल्ला या खेरीज काहीही घडण्याची अपेक्षा करता येत नाही. कारण, या आघाडीत काहीही राम नाही, हे एकदा नव्हे वारंवार सिद्ध करण्यासाठी घटक पक्ष निरंतर भिडलेले आहेत. वॉरंटी संपलेल्यांवर डाव लावायला निघालेल्यांना गॅरंटीसह शुभेच्छा देणे एवढेच आपल्या हाती आहे.