नागपूर,
Morarji Textiles : पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र असलेल्या बुटीबोरीतील मोरारजी टेक्स्टाईल्स कंपनीतील 2 हजार कामगारांना 2 महिन्यापासून वेतन न मिळाल्याने बुधवारी विधान भवनासमोरील इंडियन बँकेसमोर एकत्रित येत बँकेच्या व्यवस्थापकाला निवेदन दिले. बँकेच्या व्यवस्थापकाने दोन दिवसात वेतन मिळेल, असे आश्वासन दिल्यानंतर सर्व कामगार कामावर परत गेले. मुख्यत: अशोक पिरामल ग्रुप यांच्याकडे मोरारजी टेक्स्टाईल्स कंपनीची जबाबदारी असून कंपणीव्दारे वेतनाचे पैसे इंडियन बँकेकडे जमा करण्यात आले आहे. तरी सुध्दा कंपणीच्या कामगारांचे वेतन जारी न केल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात एक निवेदन नागपूरचे जिल्हाधिकारी यांना देण्यात माहिती कंपणीचे सीओ किशोर ढगे यांनी दिली.
कामगारांनी संप पुकारला होता
मोरारजी टेक्सटाइल्स लि. Morarji Textiles या कंपणीत 100टक्के कॉटन शर्टिंग फॅब्रिक तयार केल्या जाते. हा संपूर्ण कारखाना बुटीबोरी येथे असून 6 महिन्यांहून अधिक काळ पर्यंत कंपणीतील कामगारांनी संप पुकारला होता. कंपणी व कामगार नेत्यांच्या चर्चेनंतर ऑक्टोबर - 2023 च्या शेवटच्या आठवड्यात कंपनीने पुन्हा काम सुरू केले आहे. मात्र कंपनीने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे सर्व कामगारांचे वेतन जवळपास 3 कोटी रुपये इंडियन बँक मुंबईकडे पुढील वितरणासाठी जमा केले. परंतू अद्यापपर्यंत बँकेकडे पाठपुरावा केल्यानंतरही कामगारांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने कामगारांनी संताप व्यक्त केला आहे.
वेतनासाठी घोषणाबाजी
कामगारांना दोन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने कामगारांची परिस्थिती बिकट झाली आहे. यापूर्वी शनिवार 30 डिसेंबर रोजी, सर्व कामगारांनी मुख्य प्रवेशव्दारासमोर वेतनासाठी आग्रह धरत घोषणाबाजी केली. यानंतर परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले होते. बँकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही, बँक अधिकार्यांनी आपली आडमुठेपणाची वृत्ती कायम ठेवली आहे. तर कंपनीने आधीच बँकेत जमा केलेले कामगारांचे वेतनाचे पैसे जारी केले नाही. गेल्या दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कामगारांची आर्थिक स्थिती कोलमडली असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. वेतन न मिळाल्याने परिस्थिती बिकट होत असल्याने Morarji Textiles मोरारजी टेक्सटाइल्स लि.कंपणीच्या कामगारांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याची माहिती कंपणीचे सीओ किशोर ढगे यांनी दिली.