मोठी बातमी ! शहांच्या उपस्थिती 'सिंह' मुख्यमंत्री !

    दिनांक :16-Oct-2024
Total Views |
 चंदीगड,
हरियाणामध्ये नायब सिंह सैनी  Nayab Singh Saini यांची पुन्हा एकदा भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. ते उद्या पंचकुलामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हेही वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये आजपासून 'ओमर सरकार'...कोण-कोण आहेत मंत्री ?
 
 

nayabsingh saini 
 
नायब सिंह सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री Nayab Singh Saini  होणार आहेत. आज भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नायबसिंह सैनी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. ते उद्या पंचकुलामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी आज झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनिल विज आणि मनोहर लाल खट्टर यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदी नायब सिंह सैनी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ज्याला सर्व आमदारांनी पाठिंबा दिला होता.
 
मात्र, आज विधीमंडळ पक्षाच्या  Nayab Singh Saini बैठकीपूर्वीच नायबसिंह यांच्या नावाला मंजुरी देण्याची जोरदार चर्चा सुरू होती. भारतीय जनता पक्षाने वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात प्रसिद्ध केली होती ज्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि नायब सिंह सैनी यांचे छायाचित्र होते आणि लोकांना उद्या पंचकुलामध्ये होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.