आर्वीत तिकीट जाहीर झाली म्हंते रे बाप्पा

पेचातील कार्यकर्ते आता संभ्रमात

    दिनांक :17-Oct-2024
Total Views |
वर्धा,
Arvi Assembly Constituency खरे, तर हा काळ तसा ग्रहणाचा आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने आता तिकीटाचा पुकारा कधीही होऊ शकतो, हेही तेवढेच सत्य आहे. राज्यात कुठेही आजच्या तारखेत उमेदवारी निश्‍चित झालेली नाही. परंतु, आर्वी विधानसभा मतदार संघ या सर्व प्रक्रीयेच्या पार गेला असुन चक्क विद्यमान आमदारांना भाजपा महायुतीची तिकीट जाहीर झाल्याची पोस्ट आज सकाळपासुन समाज माध्यमांवर फिरत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. वर्धा जिल्ह्यात आर्वी विधानसभा मतदार संघ महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांसाठी आजच्या घटकेला डोकेदुखी ठरत आहे. तिकीट मागण्याचा हक्क प्रत्येकालाच आहे.
 
keche
 
तिकीट मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या ताकदीने प्रयत्न करतो. तिकीटासाठीचे जे काही निकष आहेत, त्यात बसण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आणि मतदारांच्या संपर्कात राहतो. सध्या सणासुदीच्या दिवसांची संधी साधून तिच रोजनिशी सुरू आहे. भारतीय जनता पार्टीने जिल्ह्यात कार्यकर्त्यांची मतं जाणून घेत लिफाफा बंद केला. तो लिफाफा फक्त प्रदेशाध्यक्षच उघडणार असल्याचे सांगितले जात आहे. Arvi Assembly Constituency अशीच उमेदवारीची प्रक्रीया नागपूरचे प्रवीण दटके यांच्या उपस्थितीत आर्वीतही पार पडली. यावेळी झालेल्या मतदानाच्या यादीवरूनही भाजपातील वाद चव्हाट्यावर आले. या मतदार संघात गेल्या पंचवार्षिकपासुन विधानसभा निवडणुका आल्या की वेगळाचा ड्रामा मतदारांचे मनोरंजन करणारा ठरतो. या मतदार संघात भाजपाने घेतलेल्या मतदान प्रक्रीयेत आ. दादाराव केचे, सुमित वानखेडे, मागोमाग गेल्या पंचवार्षिकमध्ये इच्छूक उमेदवार सुधीर दिवे आणि भाजपाच्या संघटनात्मक बांधणीत प्रदेशापर्यंत पोहोचलेल्या वर्धा जिपच्या माजी अध्यक्ष सरिता गाखरे यांच्या नावाला आलटून पालटून पसंती देण्यात आली.
 
 
त्यामुळे विद्यमान म्हणून आमदार दादाराव केचे यांनी आपला दावा ठोकलाच आहे. शिवाय, सुमित वानखेडे यांनीही उमेदवारीसाठी दावा केला आहे. Arvi Assembly Constituency मात्र, त्या मतदान प्रक्रीयेत पुन्हा दोन नावं आल्याने दिवे आणि गाखरे यांचीही नावं आल्याने सहाजिकच या दोघांनाही आर्वीची संधी नजरेत दिसु लागली. आ. केचे आणि वानखेडे या दोन नावांमध्ये पुन्हा दोन नावांची भर पडली असताना आज सकाळी अमोल पवार या कार्यकर्त्याने चक्क समाजमाध्यमावर पोष्ट टाकत आ. केचे यांच्या कट्टर समर्थकांसाठी आनंदाची बातमी असल्याचे सांगुन आ. दादाराव केचे यांना भाजपाची आर्वी विधानसभेसाठी उमेदवारी मिळाल्याचे जाहीर झाल्याचे स्पष्ट केले आहे. आधीच पेचात असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या संदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्यासोबत संपर्क साधला असता ते म्हणाले की हा कार्यकर्त्यांचा उताविळपणा आहे. यात काहीही तथ्य नाही. भाजपा श्रेष्ठी निर्णय घेतली त्यांच्यासाठी पक्ष म्हणून काम करावे लागणार आहे. आमच्यापर्यंत अधिकृत कोणाचेही नाव आले नसल्याचे गफाट यांनी सांगितले.