भारत बनला जगातील मानवतेचा सर्वात मोठा पुजारी!

लेबनॉनला 33 टन मदत सामग्री पाठवली

    दिनांक :18-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली,
Israel-Hezbollah War : इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धात सामान्य लेबनीज नागरिकही त्रस्त आहेत. हजारो लेबनीज नागरिक बेघर तसेच निराधार झाले आहेत. त्यांना औषध, अन्न तसेच कपड्यांसारख्या मदत सामग्रीची नितांत गरज आहे. त्यामुळे युद्धाच्या आगीत होरपळणाऱ्या जगातील मानवतेचा सर्वात मोठा पुजारी असलेल्या भारताने उदार हस्ते लेबनॉनला मदत साहित्य पाठवले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारताने लेबनॉनसाठी 33 टनांपेक्षा जास्त मदत सामग्री बेरूतला पाठवली आहे. हेही वाचा : मृत्यूच्या 11 मिनिटांनंतर स्वर्ग पाहून परतली महिला
 

WAR
 
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की एकूण 33 टन वैद्यकीय पुरवठा लेबनॉनला पाठवला जात आहे. यामध्ये पहिली खेप म्हणून 11 टन वैद्यकीय साहित्य पाठवण्यात आले. लेबनॉनच्या नागरिकांना भारताकडून ही मानवतावादी मदत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार भारताने लेबनॉनमधील निष्पाप नागरिकांच्या रोजीरोटीसाठी आणि त्यांना या दुःखात धीर देण्यासाठी ही मदत पाठवली आहे. हेही वाचा : छठपूजेपूर्वी यमुनेत पांढऱ्या फेसाचा जाड थर! पाहा व्हिडिओ
 
मदत सामग्रीमध्ये औषधांची सर्वात मोठी खेप
 
इस्त्रायली हल्ल्यांमुळे लेबनॉनमधील नागरिकही मोठ्या प्रमाणात जखमी आणि आजारी पडत आहेत. त्यामुळे वैद्यकीय साहित्य ही त्यांची यावेळी सर्वात मोठी गरज होती. म्हणून, भारताने पाठवलेल्या मदतीमध्ये, या खेपेमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी औषधे, NSAIDs (नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स), दाहक-विरोधी एजंट्स, प्रतिजैविक आणि ऍनेस्थेटिक्स यासह मोठ्या प्रमाणात फार्मास्युटिकल उत्पादनांचा समावेश आहे.