किम जोंग यांनी रशियाच्या मदतीसाठी पाठवले हजारो सैनिक!

दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांनी घेतली तातडीची बैठक

    दिनांक :18-Oct-2024
Total Views |
मॉस्को,
russia ukraine war : रशिया आणि युक्रेनमध्ये दोन वर्षांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत कोणत्याही देशाला निर्णायक आघाडी घेता आलेली नाही. एकीकडे पाश्चिमात्य देश युक्रेनला सातत्याने शस्त्रे पुरवत आहेत. त्यामुळे आता रशियाचीही युद्धात मोठी मदत झाली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांनी युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाला मदत करण्यासाठी हजारो सैनिक पाठवल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि किम जोंग यांची भेट झाली होती आणि दोन्ही देशांनी अनेक मोठे करार केले होते.

WAR
 
किती सैनिक पाठवले?
युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाला मदत करण्यासाठी उत्तर कोरियाने 12,000 सैनिक पाठवले आहेत, असे दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियाच्या योनहाप न्यूज एजन्सीने शुक्रवारी ही माहिती दिली आहे. वृत्तसंस्थेने नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिस (NIS) च्या इनपुटचा हवाला देऊन म्हटले आहे की उत्तर कोरियाचे सैन्य रशियाला मदत करण्यासाठी आधीच रवाना झाले आहे. मात्र, NIS ने या वृत्ताला लगेच दुजोरा दिलेला नाही.
 
दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांची बैठक झाली
उत्तर कोरियाने रशियाला मदत करण्यासाठी सैन्य पाठवल्याच्या मुद्द्यावर दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी तातडीची बैठक घेतली आहे. राष्ट्रपती युन सुक येओल यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की राष्ट्रपतींनी आपत्कालीन बैठकीचे अध्यक्षस्थान केले आहे. उत्तर कोरियाने सैन्य पाठवण्याचे वृत्त खरे मानले आहे की नाही याची अद्याप सरकारने पुष्टी केलेली नाही.