जैशच्या नावे पत्र...उज्जैनचे महाकाल मंदिर उडविणार!

    दिनांक :02-Oct-2024
Total Views |
उज्जैन,
Mahakal Temple blown up राजस्थानमधील हनुमानगढ रेल्वे स्थानकावर एक पत्र प्राप्त झाले, ज्यामध्ये उज्जैनमधील महाकाल मंदिरासह अनेक रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव लिहिले आहे. या घटनेनंतर पोलीस सतर्क झाले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राजस्थानमधील हनुमानगड रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्टरला मंगळवारी एक पत्र मिळाले होते. ज्यामध्ये उज्जैनचे महाकाल मंदिर 2 नोव्हेंबर रोजी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यासोबतच जयपूर, उदयपूर, बुंदी, कोटा, बिकानेर, जोधपूर, हनुमानगड आणि गंगानगर रेल्वे स्थानकांना 30 ऑक्टोबर रोजी बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. हेही वाचा : आता video call करताना बदलू शकता बॅकग्राऊंड ...
 
 
MAHAKAL
 
हनुमानगड स्टेशन मास्टरला पाठवलेल्या पत्रात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या नावाचा उल्लेख आहे. हे पत्र पोस्टाने पाठवण्यात आले आहे. स्टेशन मास्तरांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी स्टेशन गाठून पत्राची तपासणी केली आणि सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली. Mahakal Temple blown up पत्र मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. बॉम्बशोधक पथक दररोज उज्जैनच्या महाकाल मंदिराची तपासणी करते. यासोबतच मंदिराच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टरही लावण्यात आले आहेत. धमकीचे पत्र पाठवणाऱ्याने स्वत:ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा एरिया कमांडर असल्याचे सांगितले आहे. महाकाल मंदिरासोबतच त्यांनी राजस्थानच्या धार्मिक स्थळांनाही लक्ष्य केल्याची चर्चा आहे.