'मला मारून इस्रायल देईल मला खास भेट', मृत्यूनंतर सिनवारचा VIDEO व्हायरल

    दिनांक :20-Oct-2024
Total Views |
बेरूत, 
Sinwar viral VIDEO इस्रायली सैन्याने मारले गेलेले हमास प्रमुख याह्या सिनवार यांचा व्हिडिओ त्यांच्या मृत्यूनंतर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की सिनवारने आधीच इस्रायली सैन्याच्या हातून आपला मृत्यू आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट मानली आहे. हा व्हिडिओ मृत्यूपूर्वीचा आहे. या व्हिडीओमध्ये सिनवार म्हणत आहे की, इस्रायली सैन्याकडून त्यांची हत्या ही त्यांना इस्रायलने दिलेली सर्वात मोठी भेट असेल. हेही वाचा : VIDEO : समुद्रात उभ्या असलेल्या बोटीवर आभाळातून मृत्यूचा वर्षाव
 
Sinwar viral VIDEO
 
गुरुवारी इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सिनवार यांच्या मृत्यूची पुष्टी केली. इस्रायली लोकांच्या सामुहिक हत्याकांडाला जबाबदार असलेल्या याह्या सिनवारला आज इस्रायली सैन्याने मारले आहे, असे ते म्हणाले होते. सिनवार यांच्या मृत्यूवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले होते की, गेल्या वर्षी झालेल्या इस्रायली लोकांच्या हत्याकांडाचा आम्ही बदला घेतला आहे. Sinwar viral VIDEO इस्रायली सैन्याने माझी हत्या ही ज्यू सरकारने मला दिलेली सर्वात मोठी भेट असेल, असे सिनवार या व्हिडिओमध्ये सांगत आहेत. २०२१ च्या या व्हिडिओमध्ये सिनवार म्हणतो की, आमचा शत्रू इस्रायल, जो आमच्या जमिनीवर कब्जा करत आहे, ज्या दिवशी ते मला मारतील, ती मला दिलेली सर्वात मोठी भेट असेल कारण तेव्हा मी शहीदाप्रमाणे अल्लाहकडे जाईन.
सौजन्य : सोशल मीडिया 
हृदयविकाराच्या झटक्याने किंवा अपघातात मृत्यू होण्यापेक्षा क्षेपणास्त्र हल्ल्यात मरण पावेल, असे सिनवार म्हणाले होते. सिनवार म्हणतात की मी आज ५९ वर्षांचा झालो आहे. Sinwar viral VIDEO एखादी व्यक्ती वयाच्या ६० व्या वर्षी नैसर्गिक कारणांमुळे मरण्याच्या जवळ येते. असा कोणताही अर्थ नसताना मरण्यापेक्षा मी शहीद होऊन मरणे पसंत करेन.