शंका नाही...बारामती दादांचीच!

    दिनांक :21-Oct-2024
Total Views |
मुंबई,
Baramati Ajit Pawar लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पवार विरुद्ध पवार असा आखाडा रंगला आहे.  विधानसभेत बारामतीतून कोण लढणार याचाकडे सर्वांचं लक्ष लागले असताना भाजपची पहिल्या यादीत 99 उमेदवाऱ्यांची नावं जाहीर करण्यात आली. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही ठरलं आल्याचे दिसत आहे.  विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीतून न लढण्याचे संकेत देत असतानाच त्यांनी अखेर आपण कुठून उभे राहणार आहोत हे स्पष्ट केल आहे. येत्या सोमवारी 28 ऑक्टोबरला दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसुबारसच्या मुहूर्तावर ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढावी यासाठी कार्यकर्तेही आग्रह दिसून आलेत. त्यामुळे आता बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि मित्र पक्षप्रणित महायुतीचे उमेदवार म्हणून अजित पवार हेच उमेदवार असतील, हे आता स्पष्ट झाले आहे.

baramati
 
अजित पवार यांनी एका मुलाखतीत मान्य केलं होतं की, सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभं करुन आपण चूक केली होती. त्यानंतर अजित पवार हे आता बारामती लढणार नाहीत अशा चर्चाही रंगल्या, तसंच त्यांच्याकडूनही हे सांगण्यात आलं. मात्र काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी हे जाहीर केलं की बारामतीतून अजित पवारच ( Ajit Pawar ) लढतील. आता त्यांनी 28 ऑक्टोबरला बारामतीतून अर्ज भरणार Baramati Ajit Pawar असल्याच स्पष्ट केले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पहाटेचा शपथविधी झाला अन् राजकीय भूकंप पाहायला मिळाला. पण अजित पवार पुन्हा शरद पवारांसोबत गेले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येत सरकार स्थापन झाले.