VIDEO : काश्मीरला पाकिस्तान बनू देणार नाही

जम्मू-काश्मीर हल्ल्यावर फाहरुक अब्दुल्ला यांनी सोडले मौन

    दिनांक :21-Oct-2024
Total Views |
श्रीनगर, 
Fahrukh Abdullah जम्मू-काश्मीरमध्ये काल रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण खोरे हादरले होते. रात्रीपासून संपूर्ण देशात या हल्ल्याची चर्चा होत आहे. या भ्याड हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला. दरम्यान, खोऱ्यातील सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी मोठे वक्तव्य केले आहे. फारुख अब्दुल्ला म्हणतात की, काश्मीरला पाकिस्तान बनू देणार नाही. हेही वाचा : ...तर अर्धा भारत इस्लाम स्वीकारेल, VIDEO

Fahrukh Abdullah 
 
फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून पाकिस्तानला दहशतीचा खेळ थांबवण्याचा इशारा दिला आहे. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, पाकिस्तानला हे सर्व थांबवावे लागेल. आम्हाला नवी दिल्लीशी चांगले संबंध हवे आहेत. Fahrukh Abdullah आम्ही कोणत्याही परिस्थितीत काश्मीरचे पाकिस्तान होऊ देणार नाही. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, मला पाकिस्तानला सांगायचे आहे की, भारतासोबत चांगले संबंध ठेवायचे असतील तर त्यांना दहशतवादाचा घाणेरडा खेळ थांबवावा लागेल. काश्मीर पाकिस्तान होणार नाही. आपण शांततेत जगू या. जर पाकिस्तान थांबला नाही तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते. हेही वाचा : 2019 नंतर जम्मूमध्ये सर्वात मोठे टार्गेट किलिंग!