PM मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड

देवघर विमानतळावर थांबावे लागले

    दिनांक :15-Nov-2024
Total Views |
देवघर, 
pm modi aeroplane delayed in deoghar देवघर विमानतळावरच पंतप्रधान मोदींना काही काळ थांबावे लागले. विमानातील बिघाडामुळे त्यांना दिल्लीला परतण्यास थोडा विलंब झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना काही काळ देवघर विमानतळावर थांबावे लागले. विमानातील बिघाडामुळे त्यांना दिल्लीला परतण्यास थोडा विलंब झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंड-बिहार सीमेवर जमुईच्या दौऱ्यावर होते आणि देवघर विमानतळावरून त्यांना दिल्लीला परतायचे होते. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना काही काळ देवघर विमानतळावरच थांबावे लागले. हेही वाचा : VIDEO: झारखंडच्या गोड्डामध्ये अडकले राहुल गांधी!
 

narendra modi plane to wait 
 
 
pm modi aeroplane delayed in deoghar तत्पूर्वी, पीएम मोदी यांनी आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त बिहारमधील जमुई येथून 6,640 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. जमुई जिल्ह्यातील एका दुर्गम गावात “आदिवासी गौरव दिन” निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. सन 2021 पासून बिरसा मुंडा यांची जयंती "आदिवासी गौरव दिन" म्हणून साजरी केली जात आहे. त्यांनी मुंडा यांच्या सन्मानार्थ स्मृती नाणे आणि टपाल तिकिटाचे अनावरणही केले. हेही वाचा : ५०० वर्षांपूर्वी लंगरची परंपरा कशी सुरू झाली?