- भाजपा पाच, काँग्रेस झिरो
अमरावती,
Amravati constituency: जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाचे पाच उमेदवार विजयी झाले आहे. भाजपासोबत महायुतीत असलेल्या अजित पवार युवा स्वाभिमान पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाल्यामुळे महायुतीने सात जागा पटकावत जिल्ह्यात सरशी केली आहे. उबाठाला एक जागा मिळाल्याने महाविकास आघाडीचे अस्तित्व दिसले.
Amravati constituency जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ येतात. आतापर्यंत काँग्रेसचेच जिल्ह्यात वर्चस्व राहिले आहे. यंदा पहिल्यादा भाजपाने रणनीतीत बदल करत निवडणूक लढविली. परिणाम स्वरूप धामणगाव मतदारसंघातून प्रताप अडसड सलग दुसऱ्यांदा तर मोर्शी मतदारसंघातून उमेश यावलकर, तिवसा येथून राजेश वानखडे, अचलपूर येथून प्रवीण तायडे, मेळघाट मतदारसंघातून केवलराम काळे हे भाजपाचे चार नवीन चेहरे विजयी झाले. यातले केवलराम काळे यापूर्वी काँग्रेसचे आमदार राहिले आहे. भाजपात ते नवीन आहेत. हिंदुत्व आणि जनसामान्यांसाठी सुरु केलेल्या योजनांच्या आधारावर भाजपाने प्रचार केला. सोबतच लोकसभा निवडणुकीत जे खोटे मुद्दे प्रभावी ठरले होते, ते पूर्णपणे खोडून काढण्यात भाजपाला यश आले.
Amravati constituency जिल्ह्यातील जी दर्यापूरची एकमेव जागा माविआच्या उबाठाला मिळाली, ती देखील योग्य ताळमेळ ठेवला असता तर महायुतीला मिळाली असती. निकालाने जिल्ह्यात काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष देखील जमा झाला आहे. दर्यापूरचे विजयी उमेदवार गजानन लवटे यांच्यामुळे उबाठा थोडी शिल्लक राहिली आहे. पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत महायुतीला आजचे निकाल फायद्याचे ठरणार आहे.
खा. अनिल बोंडे रणनीतीकार
Amravati constituency जिल्ह्यात पाच मतदारसंघात कमळ फुलविण्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष खा. अनिल बोंडे यांची रणनीती कामात आली आहे. कडवे हिंदुत्ववादी असलेल्या खा. बोंडे यांनी उत्तमपणे प्रचाराची आखनी केली. ज्या मतदारसंघात जे मुद्दे प्रभावी ठरवू शकतात, त्याची त्यांनी विविध सभामधून चांगली मांडणी केली. उमेदवारांना योग्य मार्गदर्शन करून ते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. भाजपाचा उमेदवार प्रचारात भरकटणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली. त्यांची मेहनत फळाला आली आहे.