मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत संत्रा उत्पादकांना नुकसानभरपाई मंजूर

आर्वी, कारंजा, आष्टी तालुक्यातील 5 हजार 933 शेतकर्‍यांना मिळणार लाभ

    दिनांक :16-Dec-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Compensation for orange growers जिल्ह्यातील आर्वी, कारंजा आणि आष्टी तालुक्यात सत्रा उत्पादक शेतकर्‍यांची मोठी संख्या आहे. ऑगस्ट महिन्यात ढगाळी वातावरणामुळे संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. संत्रा उत्पादकांना नुकसानभरपाई मिळावी, याकरिता आ. सुमीत वानखेडे यांनी सतत पाठपुरावा केला. अखेर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत तीन तालुक्यातील संत्रा उत्पादकांना 10 कोटी 84 लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

Compensation for orange growers 
 
ऑगस्ट 2024 महिन्यात आलेल्या ढगाळी वातावरणाचा परिणाम संत्रा पिकावर झाला होता. जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्याने ते हवालदिल झाले होते. शेतकर्‍यांची अडचण लक्षात घेऊन आमदार सुमीत वानखेडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना नुकसानभरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तसा प्रस्ताव शासनाच्या महसुल व पुनर्वसन विभागाकडे सादर केला. तथापि, हा प्रस्ताव शासनाच्या निकषात बसत नसल्याने आमदार वानखेडे यांनी मंत्रिमडंळापुढे सादर केला होता. Compensation for orange growers मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत रविवार 15 रोजी संत्रा उत्पादकांना 10 कोटी 84 लाख रुपयांची मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयानुसार कारंजा तालुक्यातील 3 हजार 1, आष्टी तालुक्यातील 2 हजार 684 आणि आर्वी तालुक्यातील 248, अशा 5 हजार 933 शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. माझ्या निवडणूक प्रचारादरम्यान नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळवून देईलच, असा शब्द मी दिला होता. त्यानुसार मी सर्व संबंधीत यंत्रणेशी सातत्याने पाठपुरावा करुन पहिल्याच मंत्रिमडंळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला व या निर्णयामुळे शब्दपूर्ती करण्यात आली. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल, असे भावनिक उद्गार आमदार सुमीत वानखेडे यांनी व्यक्त केले. हेही वाचा : नेपाळमध्ये ५ वर्षातून एकदा गढीमाई जत्रा भरते, लाखो प्राण्यांचा बळी