राेखठाेक
- दिनेश गुणे
Thackeray-Fadnavis-visit इतिहासाची पुनरावृत्ती हाेते असे म्हणतात. पण तसे नेहमीच हाेत नाही. काही इतिहास एकदाच लिहिले जातात आणि अल्पकाळानंतर ते इतिहासाच्या पानावरून पुसलेदेखील जातात. तरीही, पुनरावृत्तीच्या कल्पनेवर मात्र या इतिहासाची श्रद्धा असते. विशेषतः, राजकारणाच्या क्षेत्रात इतिहासाच्या पुनरावृत्तीच्या आशेवर अनेकजण आपल्या भविष्याकडे डाेळे लावून बसलेले असले, तरी सगळ्यांच्याच भूतकाळात घडून गेलेली काेणतीही गाेष्ट एकदा पुसली गेली की भविष्यात उमटत नाही. Thackeray-Fadnavis-visit म्हणूनच, शिवसेनेतील फुटीच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली, तरी शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले त्या इतिहासाची पाने फुटीनंतर पुसली गेली असल्याने त्याची पुनरावृत्ती हाेण्याची शक्यता मात्र पुसली गेली आहे. आता ताे घटनाक्रम हाच इतिहास झाला आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती हाेईल आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हाेतील असे त्यांच्या काही समर्थकांना वाटत हाेते, ताे काळही आता इतिहासजमा झाल्याने, तसे काही वाटण्याच्या इतिहासाची पुनरावृत्तीदेखील संभवत नाही हे त्यांना कळून चुकले आहे.
Thackeray-Fadnavis-visit शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली हा इतिहास झाला. आता त्याची पुनरावृत्ती हाेण्याची शक्यता नसली तरी शरद पवार पुन्हा एकदा सत्तावर्तुळाच्या केंद्रस्थानी येतील या आशेच्या इतिहासाची शक्यतादेखील मावळलीच आहे. अशा तऱ्हेने ठाकरे आणि पवार यांच्या राजकीय इतिहासाची पाने इतिहासजमा हाेऊ लागल्याने त्याच्या पुनरावृत्तीचा प्रश्नच मिटलेला असून, भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांना मात्र इतिहासाच्या पुनरावृत्तीचा प्रत्यय आल्याने, हा सिद्धांत राजकारणात नेहमीच खरा ठरत नाही या समजुतीवरच शिक्कामाेर्तब झाले आहे. ‘मी पुन्हा येईन’ या त्यांच्या वाक्यात इतिहासाच्या पुनरावृत्तीचाच विश्वास हाेता आणि नवा इतिहास घडविण्याची जिद्ददेखील हाेती. Thackeray-Fadnavis-visit त्या विश्वासाच्या बळावर त्यांनी इतिहास घडविण्याचे ध्येय उराशी बाळगले व ते सार्थदेखील करून दाखविले. अन्यथा, ‘करून दाखविले’ वगैरे काही वाक्ये केवळ घाेषणांपुरतीच राहिल्याने, त्या वाक्यावरचा लाेकांचा विश्वासदेखील संपतच चालला हाेता. तसे नसते, तर केवळ या एका घाेषणेच्या बळावर इतिहासाची पुनरावृत्ती करून दाखविण्याची किमया अनेकांना साधली असती. तसे झाले नाही, यावरूनच, नेहमीच इतिहास पुनरावृतीसाठी तयार असताे असे नाही हे सिद्ध हाेते.
Thackeray-Fadnavis-visit आता देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत आणि त्यांनी नव्याने काही करून दाखविण्याची तयारीही सुरू केली आहे. सत्तेची सूत्रे हाती घेताच त्यांनी केलेली एक घाेषणा केवळ कागदावर राहणार नसून त्यानुसार काही करून दाखविण्याची आणि नवा इतिहास घडविण्याची त्यांची इच्छाशक्ती आता उघड हाेऊ लागली आहे. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’, असे त्यांनी सत्ता हाती घेताच जाहीर केले हाेते. आता महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली आहे. नव्या महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या टीमचे काम सुरू झाले आहे आणि नव्या सत्ताकाळातील पहिल्या शंभर दिवसांत करावयाच्या कामांच्या पूर्वतयारीने वेग घेतला आहे. Thackeray-Fadnavis-visit गेल्या पाच वर्षांचा काळ हा महाराष्ट्राच्या संक्रमणाचा काळ हाेता. या काळात असंख्य आराेप, प्रत्याराेपांची राळ उडाली हाेती. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीने असा काळ याआधी अनुभवला नव्हता. 2019 ते 2024 या काळात देवेंद्र फडणवीस या व्यक्तीस आणि त्यांच्या कुटुंबास ज्या प्रकारे लक्ष्य करण्यात आले, तसे याआधी कधीच घडले नव्हते. असे आराेप करणाऱ्या सर्वांचे नव्या सरकारच्या स्थापनेनंतर नागपुरात झालेल्या पहिल्या विधिमंडळ अधिवेशनात आभार मानून देवेंद्र फडणवीस यांनी कामाला सुरुवात केली आहे.
Thackeray-Fadnavis-visit फडणवीस यांना सातत्याने लक्ष्य करून त्यांनी बिघडविलेल्या वातावरणामुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सहानुभूती निर्माण झाली. याआधीच्या काळात महाराष्ट्रासाठी आणि राज्याच्या जनतेच्या हितासाठी जे काम फडणवीस सरकारने केले हाेते, त्याची पाेचपावती या निवडणुकीतून जनतेने दिली. ज्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना जनतेने झिडकारले. जवळपास पन्नास टक्के मतदारांनी महायुतीला पसंतीची पावती दिली. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या इतिहासात हे पान नव्याने लिहिले गेले आहे. असा भरघाेस जनाधार याआधी काेणत्याच राजकीय पक्षाला, आघाडीला मिळाला नव्हता. Thackeray-Fadnavis-visit नव्याने लिहिल्या गेलेल्या या इतिहासाची पुनरावृत्ती झालीच, तरी फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत आराेपाची, टीकेची आणि असभ्य कुचेष्टेची राळ उठविणाऱ्यांना त्याचा फायदा मिळणार नाही याची खबरदारी इतिहासच घेईल, हे आता हळूहळू स्पष्ट हाेऊ लागले आहे. म्हणूनच, निवडणुकी आधीच्या काळात महाराष्ट्राचे वातावरण गढूळ करण्यात पुढाकार घेणाऱ्यांचा सूर आता मवाळ हाेताना दिसत आहे. अधिवेशनकाळात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे जाऊन फडणवीस यांची भेट घेतली, त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले, त्यांच्या नेतृत्वावर जनतेने उमटविलेली मान्यतेची माेहर स्वीकारली, याचा हा पुरावा आहे.
Thackeray-Fadnavis-visit त्या भेटीत नेमके काय घडले ते स्पष्ट झालेले नाही. पण, उद्धव ठाकरे यांनी याआधी फडणवीस यांच्यावर केलेल्या आराेपांचा, टीकेचा आणि टाेमण्यांचा पश्चात्ताप त्यांना झाला असावा, असे त्या भेटीनंतरच्या काही बातम्यांवरून स्पष्ट झाले. कदाचित त्या भेटीदरम्यानच्या त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव वाचून तशा बातम्यांचा जन्म झाला असावा. त्यामुळे आता फडणवीस यांच्यावरील आराेप, टीका आणि टाेमणे हा इतिहास झाला आहे आणि त्याची पुनरावृत्ती हाेणार नाही, यावर एकर्ती शिक्कामाेर्तबही झाले आहे. याच निवडणुकीच्या निकालनंतर आणखी एका मुद्याने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा उचल खाल्ली हाेती. जेव्हा जेव्हा भाजपा आघाडीच्या विराेधातील आघाड्यांना निवडणुकीत पराभव पाहावा लागला, तेव्हा तेव्हा मतदान यंत्रांच्या नावाने खडे फोडणे हा गेल्या दहा वर्षांतील निवडणुकाेत्तर काळाचा इतिहास झाला आहे. Thackeray-Fadnavis-visit त्याच इतिहासाची निकालानंतर पुनरावृत्ती झालेली महाराष्ट्रात पाहावयास मिळाली. ईव्हीएमच्या कार्यशैलीवर निराधार प्रश्नचिन्हे उमटवून संशयाचे वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न विराेधकांनी करून पाहिला. शरद पवार यांनी उमटविलेल्या प्रश्नचिन्हावर सावधगिरीचा मुलामा हाेता, तर ठाकरे गटाने आक्रमकपणे प्रश्नचिन्हे उमटविण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसने तर या निकालाचे भांडवल करून पराभवाचे संपूर्ण खापर ईव्हीएमच्या माथ्यावर मारण्याची जाेरदार कसरत केली. याआधीही, अनेक निवडणुकांत हेच झाले हाेते. Thackeray-Fadnavis-visit देशातील ज्या ज्या राज्यांतील वेगवेग निवडणुकांत भाजपाविराेधी पक्षांना पराभव चाखावा लागला, त्या त्या राज्यांत ईव्हीएमवर शंका उपस्थित करावयाचे तंत्र या वेळी काँग्रेसने महाराष्ट्रातही वापरले आणि ठाकरे-पवार यांच्या युतीने त्यास पाठिंबा देत शंकेचे सूर आळविले. आता मात्र, ताे सूरही मवाळ झाला आहे. पवार यांच्या गटाने ईव्हीएमच्या वादावर पडदा टाकण्याची तयारी सुरू केली आहे. शरद पवार यांच्या कन्येने, खासदार सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएमला एक प्रकारे क्लीन चिट दिल्याने पवार गटातून आता या वादाच्या इतिहासाची पुनरावृत्ती हाेणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, अशी चिन्हे आहेत. Thackeray-Fadnavis-visit याच ईव्हीएमद्वारे घेतल्या गेलेल्या निवडणुकीत मी चार वेळा विजयी झाले असल्याने व ईव्हीएमच्या कार्यशैलीवर शंका घेण्याएवढे काेणतेही ठाेस पुरावे हाती नसल्याने, या निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणे याेग्य नाही, असा सूर सुप्रिया सुळे यांनी लावला आणि विराेधकांच्या आक्रमक पवित्र्यातील हवाच निघून गेली. विराेधकांच्या आराेपास उत्तर देताना महाविकास आघाडीचे नेतेदेखील याच मुद्यावर भर देत हाेते.
Thackeray-Fadnavis-visit जेव्हा विजय हाेताे, तेव्हा ईव्हीएमविराेधात तक्रार नसते आणि पराभव हाेताच ओरड सुरू हाेते, हा कांगावा टिकणार नाही, हे दिसू लागले. साहजिकच, महाविकास आघाडीतील ईव्हीएमविराेधी सूर आता मावळत चालल्याने ठाकरे गटाच्या ईव्हीएमविराेधी आवाजातील हवादेखील निघून जाईल. इतिहासाची अल्पकाळ झालेली एक पुनरावृत्ती आता पुसली गेली आहे आणि ईव्हीएमच्या नावाने वादळ निर्माण करून फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीला आराेपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे प्रयत्न पुरते फसले आहेत. एका वादळाचे ढग विरल्याने, महाराष्ट्राच्या वाटचालीतील पुढच्या पावलांचा प्रकाश स्वच्छ झाला आहे. विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनातील आपल्या पहिल्याच भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील 14 काेटी जनतेचे आभार मानले. Thackeray-Fadnavis-visit महायुतीला घवघवीत यश देऊन 237 आमदार सत्तापक्षाच्या बाजूने निवडून आणले आणि महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्रितपणे केलेल्या कामास विजयाचे श्रेय बहाल केले. गेल्या पाच वर्षांत विराेधकांनी फडणवीस यांना चक्रव्यूहात फसविण्याचे अनेक प्रयत्न केले. पण असे चक्रव्यूह भेदण्याची कला आपल्याला अवगत आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गदेखील आपणास माहीत आहे, असे देवेंद्र \डणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत म्हटले हाेते.
Thackeray-Fadnavis-visit ‘मी पुन्हा येईन’ या त्यांच्या विश्वासाची तेव्हा खिल्ली उडविणाऱ्यांनी त्याच काळात फडणवीस यांचे ते वक्तव्यदेखील फार गांभीर्याने घेतले नव्हते. त्यामुळे, इतिहासाची पुनरावृत्ती हाेईल असे त्यांना वाटलेदेखील नव्हते. आता फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आणि आपण आधुनिक अभिमन्यू आहाेत हे सिद्ध केले. एक प्रकारे इतिहासाचीच नव्हे, तर पुराणाचीही पुनरावृत्ती इथे झालेली दिसते. इतिहासाच्या पुनरावृत्तीच्या इतिहासातही असे क्वचितच घडलेले दिसते. अर्थात, या यशाचे श्रेय फडणवीस यांनी पक्षाला, साेबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना आणि राज्यातील जनतेला दिले. Thackeray-Fadnavis-visit ‘आंधियाें में भी, जाे जलता हुआ मिल जायेगा, वाे दिये से पूछना, मेरा पता मिल जायेगा’ हे त्यांचे उद्गार, भविष्यातही इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या आत्मविश्वासाची साक्ष देणारे ठरले आहेत. म्हणूनच, महाराष्ट्र आता थांबणार नाही, या त्यांच्या घाेषणेची आता खिल्ली न उडविता, महाराष्ट्राच्या नव्या वाटचालीत साथ देण्यासाठी तयारी करण्याचा माेठेपणा विराेधकांना दाखवावा लागेल. विधानसभा निवडणुका जिंकण्याकरिता विराेधकांनी केलेल्या राजकारणाची सभागृहातच सडेताेड चिराड करून फडणवीस यांनी विराेधकांच्या राजकीय संस्कृतीला आरसा दाखविला आहे.
Thackeray-Fadnavis-visit नव्या वाटचालीत ही संस्कृती बासनात बांधून राज्याच्या हितासाठी सरकारसाेबत काम करण्यातच हित आहे, हे विराेधकांनी ओळखले, तर संस्कृतीच्या इतिहासाची पुनरावृत्ती हाेईल. महाराष्ट्रात महायुती सरकारने दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले जाईल, ज्या कल्याणकारी याेजना सुरू केल्या आहेत, त्यापैकी एकही याेजना बंद हाेणार नाही आणि याेजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर केल्या जातील अशी ग्वाही देऊन फडणवीस सरकारने नव्या महाराष्ट्राच्या नव्या वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे. विराेधकांनी नव्याने सुरू केलेली फेक नॅरेटिव्हची नवी फॅक्टरी उद्ध्वस्त करण्याचा निर्धार करून फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने नवी वाटचाल सुरू केली आहे. Thackeray-Fadnavis-visit याच फॅक्टरीमधील मारकडवाडीचा डाव फडणवीस यांनी उघड केला. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने या काळात ईव्हीएमच्या सेटिंगवर प्रश्नचिन्हे उभी करण्याचा प्रयत्न केल्याबद्द्ल त्यांनी खंत व्यक्त केली. आता सुप्रिया सुळे यांनी समंजस भूमिका घेतल्याने, शंकेचे ढग विरले आहेत आणि ईव्हीएमचा वादही संपल्यात जमा आहे. आता महाराष्ट्र थांबणार नाही, या \डणवीस यांच्या विश्वासाची या नव्या वाटचालीला साथ लाभली आहे.
Thackeray-Fadnavis-visit जनतेने दिलेला काैल विराेधकांनी खुल्या मनाने स्वीकारला नसला, तरी आता नव्या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सुरू झालेली नव्या सरकारची वाटचाल निर्विघ्नपणे सुरू राहील आणि नवा इतिहास निर्माण हाेईल, असे वातावरण निर्माण हाेऊ लागले आहे. महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीसाठी केलेल्या कामांना गती येणार आहे. गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारने राज्यातील 167 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली, त्यामुळे 25.21 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. हा नवा इतिहास आहे. गेल्या तीन-चार दशकांपासून राज्यात नदीजाेड प्रकल्पांवर केवळ चर्चा हाेत हाेती. शाश्वत पाणीपुरवठ्याचा हा हमखास स्राेत असल्याची भूमिका दहा वर्षांपूर्वीच मांडली गेली हाेती. Thackeray-Fadnavis-visit आंतरराज्य प्रकल्पांचा वाद त्या त्या राज्यांनी चर्चा करून साेडवावा व मार्ग काढावा असा केंद्र सरकारचा स्पष्ट निर्देश आहे. पण आंतरराज्य प्रकल्पांसाठी केंद्राच्या मदतीची गरजच नसल्याने काेणावरही अवलंबून न राहता असे प्रकल्प राज्यात राबविण्याचे धाेरण राज्य सरकारने स्वीकारले आणि त्यानुसार महाराष्ट्रात पाच वर्षांपूर्वी पहिल्यांदा महाराष्ट्राचा जल आराखडा तयार करण्यात आला.
गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारने राज्यातील चार प्रमुख नदीजाेड प्रकल्पांना मान्यता दिली आणि त्याच्या निविदाही जारी झाल्या आहेत. Thackeray-Fadnavis-visit राज्यात मेट्राे रेल्वेच्या कामांना वेग आला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे 374 किलाेमीटरचे मेट्राे रेल्वेचे जाळे उभारण्याचा संकल्प राज्य सरकारने साेडला आहे, त्यापैकी सुमारे 95 किलाेमीटरचे जाळे कार्यान्वित हाेऊन मुंबईला नवी जीवनरेखा प्राप्त हाेणार आहे. पुणे, नागपूर मेट्राेच्या कामालाही गती मिळाली आहे, हादेखील एक नवा इतिहास आहे. ‘समृद्धीचा वेग आता कुणी राेखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही’, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. विधिमंडळात त्यांच्या या विश्वासाच्या सुरात सभागृहाचे सूर मिसळले, तेव्हाच नव्या इतिहासाची नांदी गायिली गेली आहे.