सेऊल,
South Korea plane crash दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचा मोठा अपघात झाला आहे. येथे उतरताना जेजू एअरलाइन्सच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात 47 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले आणि विमानतळाच्या कुंपणाला धडकले, असे सांगण्यात येत आहे. या विमान अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो हृदय पिळवटून टाकणारा आहे.
हेही वाचा : VIDEO : दक्षिण कोरियात धावपट्टीवर उतरताना विमान भिंतीला आदळले, 47 जणांचा मृत्यू
या व्हिडिओमध्ये जेजू एअरलाइन्सचे विमान विमानतळावर रेंगाळत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विमान रेंगाळले आणि विमानतळाच्या कुंपणाला आदळले आणि आगीत भडकले. हा अपघात खूपच भयानक होता. संपूर्ण विमानतळ परिसर आग आणि काळ्या धुराने भरून गेला होता. South Korea plane crash प्राथमिक माहितीनुसार, लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला. या विमानात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्ससह एकूण 181 लोक होते.
सौजन्य : सोशल मीडिया