VIDEO : पीएम मोदींनी धरला खडगे यांचा हाथ, दोघेही बोलले आणि नंतर हसले

    दिनांक :06-Dec-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
PM Modi-Kharge पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे आमनेसामने आल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये विनोदी संवाद  पाहायला मिळाला. निमित्त होते संसद भवनाच्या लॉनमधील 69 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाचे, जिथे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी गेले होते. दरम्यान, पीएम मोदी आणि मल्लिकार्जुन खडगे एकमेकांशी बोलताना दिसले. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हेही तिथे उभे होते.
 
PM Modi-Kharge
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्यात चर्चा झाली. PM Modi-Kharge पंतप्रधान मोदींनी मल्लिकार्जुन खडगे यांचा एक हात पकडला. मल्लिकार्जुन खडगे काहीतरी बोलत होते, जे ऐकून पीएम मोदी हसायला लागले. पीएम मोदी आणि खडगे यांच्या जवळ उभे असलेले रामनाथ कोविंद आणि ओम बिर्ला यांनीही स्मितहास्य केले. उपराष्ट्रपती जगदीप धनखर हे पीएम मोदींच्या मागे उभे होते, त्यांच्या चेहऱ्यावर हलके हसूही दिसत होते.
सौजन्य : सोशल मीडिया 
बाबासाहेब आंबेडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात आदरांजली वाहिली. त्याआधी त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे- 'महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही संविधानाचे निर्माते आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. PM Modi-Kharge समता आणि मानवी प्रतिष्ठेसाठी आंबेडकरांचा अथक संघर्ष पिढ्यांना प्रेरणा देत राहील. आज जेव्हा आपण त्यांच्या योगदानाचे स्मरण करतो तेव्हा त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचाही पुनरुच्चार करतो. या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईतील चैत्यभूमीला माझ्या भेटीचा एक फोटोही शेअर करत आहे. जय भीम!'