विशेष संपादकीय
BharatRatn-Adwani सांस्कृतिक राष्ट्रवादाचे खंदे पुरस्कर्ते, अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या चळवळीत महत्त्वाचे योगदानकर्ते, भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणारे देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मान देण्याचे जाहीर करून भारत सरकारने योग्य वेळी योग्य व्यक्तीला पुरस्कार देण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. BharatRatn-Adwani अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर निर्माण झाले आहे. देशात रामराज्य आणण्याचा पाया रचला गेला आहे. हा पाया रचण्यात लालकृष्ण अडवाणी यांचेही मोठे योगदान आहे. १९९० च्या दशकात सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढून मंदिर निर्माणाच्या चळवळीत आणि देशाच्या विकासात बहुमोल योगदान दिल्याबद्दल अडवाणींचा त्यांच्या हयातीत सन्मान केला जात आहे, यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट असू शकत नाही. BharatRatn-Adwani भारतरत्न मिळाल्याबद्दल आधी लालजींचे आणि नंतर त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेणाऱ्या भारत सरकारचे, विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन केले पाहिजे. BharatRatn-Adwani भारतरत्न देऊन अडवाणींचा सन्मान केला जाणार असल्याची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शनिवारी सकाळी स्वत: समाज माध्यमाद्वारे दिली आणि संघ, भाजपाच्या देशभरातील कार्यकर्त्यांना तसेच राम मंदिर आंदोलनातील कारसेवकांना कमालीचा आनंद झाला.
वयाच्या चौदाव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत दाखल झालेल्या अडवाणी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. BharatRatn-Adwani आधी संघ, मग जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्या हातून जे राष्ट्रकार्य, रामकार्य घडले त्याची फलश्रुती म्हणजे भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान होय. भारतीय जनता पार्टीची पाळेमुळे जनमानसात रुजविण्यासाठी ज्या ज्या नेत्यांनी अथक परिश्रम घेतले, त्यात अडवाणींचे स्थान महत्त्वाचे आहे. १९८० ते ९० या दशकात भारतीय जनता पार्टीला राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख मिळवून देताना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या अन्य नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना अडवाणी यांनी भरपूर परिश्रम घेतले. BharatRatn-Adwani ज्या काळात भाजपाचा उपहास केला जायचा, प्रवासाची आधुनिक साधने नव्हती, सक्षम अशी यंत्रणा नव्हती, आर्थिक सुबत्ता नव्हती, आजच्यासारखी समाजमाध्यमं नव्हती, त्या अतिशय कठीण काळात ज्या नेत्यांनी पक्षवाढीसाठी सर्वस्व पणाला लावले, त्यात लालजींचा समावेश होता आणि केवळ या कारणासाठी नव्हे, तर भारतीय जनता पार्टीचे तीन वेळा राष्ट्रीय अध्यक्ष, संसदेचे सदस्य, त्याचप्रमाणे देशाचे उपपंतप्रधान म्हणून राष्ट्राच्या विकासयात्रेत त्यांनी जे अनमोल योगदान दिले, त्यासाठी त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्याचा सरकारने घेतलेला निर्णय समयोचित ठरतो.BharatRatn-Adwani
ही बातमी नक्की वाचा ...
१९८४ साली भारतीय जनता पार्टीला लोकसभेच्या निवडणुकीत अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या. पण, अटलजींसोबत अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे यांच्यासारखे समर्पित नेते असल्याने पक्षाने पराभवाची कधी खंत बाळगली नव्हती. BharatRatn-Adwani सत्ता हे साध्य नसून साधन आहे, ही शिकवण संघाकडून आणि जनसंघाकडून मिळालेल्या या नेत्यांनी कधीही सत्तेसाठी राजकारण केले नाही. त्यामुळे निवडणुकांमध्ये पराभव झाला तरी ही मंडळी कधी खचली नाही. आपल्याला अखंड भारताची निर्मिती करायची आहे, एक विकसित राष्ट्र निर्माण करायचे आहे, या ध्येयाने प्रेरित होऊन काम करत करत अटलजी आणि अडवाणी यांनी लाखो कार्यकत्र्यांच्या परिश्रमाच्या आधारे एक दिवस पक्षाला केंद्रातल्या सत्तेत स्थान मिळवून दिले. १९८४ साली दोन जागा जिंकणाऱ्या भाजपाने नंतरच्या निवडणुकीत म्हणजे १९९१ च्या निवडणुकीत १२१, १९९६ मध्ये १६१ जागा जिंकल्या होत्या. BharatRatn-Adwani एकामागोमाग निवडणुकांमध्ये जागांची संख्या वाढवत पक्षाने अटलजी आणि अडवाणींच्या नेतृत्वात स्वत:चे स्थान मजबूत केले. सत्तेच्या माध्यमातून राष्ट्रसेवा असा जयघोष करणाऱ्या भाजपाने पुढल्या काळात अटलजींच्या नेतृत्वात केंद्रात सरकारही स्थापन केले. अटलजींच्या रूपाने संघाचा स्वयंसेवक पंतप्रधान झाला. अडवाणींच्या रूपाने आणखी एक स्वयंसेवक उपपंतप्रधान झाला. संघाच्या लाखो स्वयंसेवकांचे स्वप्न साकार झाले.
ही बातमी नक्की वाचा ...
BharatRatn-Adwani आधीचा जनसंघ आणि नंतरच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे चीज झाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून केंद्रात सातत्याने काँग्रेसचीच सत्ता होती. काँग्रेसच्या सरकारांकडून अल्पसंख्यकांच्या तुष्टीकरणाची नीती अवलंबली गेली आणि संघ-जनसंघ-भाजपाचे खच्चीकरण सुरू होते. १९७५ सालच्या आणिबाणीमध्ये तर संघ आणि जनसंघाला संपविण्याचा प्रयत्न झाला. पण, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाचा मंत्र घेऊन पुढे निघालेले जनसंघाचे कार्यकर्ते कधी निराश झाले नाहीत, खचले नाहीत आणि मागेही हटले नाहीत. BharatRatn-Adwani स्वर्णिम भारताच्या निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून ही मंडळी काम करीत राहिली. या सगळ्या वाटचालीत लालकृष्ण अडवाणी यांचे जे योगदान आहे, ते कधीही विसरता यायचे नाही. अटलजी-अडवाणी यांच्या मार्गदर्शनात भाजपाची ताकद वाढत असताना काँग्रेसची क्षमता कमी कमी होत गेली आणि हा पक्ष केंद्रातील सत्तेबाहेर जाण्याची चिन्हे असतानाच २००४ साली भाजपाची सत्ता जाऊन पुढली दहा वर्षे पुन्हा देशात काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआची राजवट आली. तरीही भाजपाचे लोक नाउमेद झाले नाहीत. BharatRatn-Adwani कारण, मार्गदर्शन करायला त्यांच्यासोबत लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे ज्येष्ठ, अनुभवी नेते खंबीरपणे उभे होते. जिथे सत्ता हे साध्य नसून समाजसेवेचे साधन आहे, अशी शिकवण दिली जाते, त्या संघ-भाजपासारख्या संघटनांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनाला सत्तेचा लोभ स्पर्श करूच शकत नाही.
संघाच्या मुशीत तयार झालेल्या अडवाणी यांच्यावर जेव्हा जैन हवाला प्रकरणात आरोप झाला होता, तेव्हा आरोपमुक्त होईपर्यंत राजकारणात कुठलेही पद न घेण्याचा त्यांचा निर्णय आदर्श असाच होता. राजकारणात शुचितेचे पालन करून अडवाणी यांच्यासारख्या तपस्वी राजकारण्याने नव्या पिढीसमोर आदर्श प्रस्थापित केला होता. BharatRatn-Adwani अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या नेत्याला २०१५ साली पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले होते. आज त्यांना भारतरत्न पुरस्कार घोषित झाला, तोही त्यांचे शिष्य असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून, यालाही वेगळे महत्त्व आहे. गुरू-शिष्य परंपरेला शोभेल असा निर्णय झाल्याने कोट्यवधी चाहते आनंदात आहेत. अयोध्येत राम मंदिराचे निर्माण झाल्याने समस्त भारतवासी आनंदात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न घोषित केल्याने कारसेवक-रामसेवक, भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. BharatRatn-Adwani अयोध्येतील जन्मस्थळावर समस्त हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर झाले पाहिजे, असे स्वप्न उराशी बाळगून १९८० च्या सुरुवातीला विश्व हिंदू परिषदेने आंदोलन सुरू केले होते. त्याचवेळी लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वातील आंदोलन भाजपाचा चेहरा बनले होते.
मंदिर आंदोलनाच्या माध्यमातून भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे मोठे काम अडवाणींच्या हातून घडत होते. पक्षात जिवंतपणा येऊ लागला होता. आंदोलनाला मवाळ मानल्या जाणाऱ्या अटलजींचा मजबूत पाठींबा होताच. २५ सप्टेंबर १९९० रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी लालजी रामरथावर आरूढ झाले आणि सोमनाथ ते अयोध्या अशी त्यांची रामरथयात्रा सुरू झाली. BharatRatn-Adwani संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले. या यात्रेने इतिहास घडविला. भारतीय राजकारणात सत्तेची पाळेमुळे घट्ट करून बसलेल्या प्रस्थापित काँग्रेसला हादरे बसले. राम मंदिराच्या मार्गात अडथळे आणणाऱ्यांना कडक संदेश मिळाला. विश्व हिंदू परिषदेचे अथक परिश्रम, त्याग, समर्पण याला अडवाणींच्या आंदोलनाची जोड मिळाली आणि राम मंदिर निर्माण चळवळही गतिमान झाली. आज पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी हेही संघाचे स्वयंसेवक आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वात अयोध्येत श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाही झाली आहे. BharatRatn-Adwani एकूण, सगळी पृष्ठभूमी लक्षात घेता मोदी यांनी अडवाणींच्या हयातीत त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्याचा घेतलेला निर्णय लालजींच्या कार्यकर्तृत्वाची, त्यांनी या राष्ट्राच्या उन्नतीसाठी केलेल्या समर्पणाची पावतीच होय!