सुधा मूर्ती राजकारणात, खुद्द पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

    दिनांक :08-Mar-2024
Total Views |
नवी दिल्ली,   
Sudha Murthy in politics राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही माहिती दिली आहे. सुधा मूर्ती यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांची उपस्थिती ही आपल्या स्त्री शक्तीची सशक्त साक्ष आहे.

Sudha Murthy in politics
 
कोण आहेत सुधा मूर्ती? ज्या होत्या टेल्कोमधील पहिली महिला इंजीनियर... पंतप्रधान म्हणाले की, सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आणि प्रेरणादायी आहे. पंतप्रधान मोदींनी सुधा मूर्ती यांना यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाल्या की, राज्यसभेतील त्यांची  उपस्थिती ही महिला शक्तीची एक शक्तिशाली साक्ष आहे, जी आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिलांच्या सामर्थ्याचे आणि क्षमतेचे उदाहरण देते. Sudha Murthy in politics सुधा मूर्ती या इन्फोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि मूर्ती ट्रस्टच्या अध्यक्षा आहेत. त्या लेखिका, समाजसेविका आहेत. त्यांनी आजवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 73 वर्षीय सुधा मूर्ती यांचे नामांकन आले आहे. भारत सरकारने सुधा मूर्ती यांना 2006 मध्ये पद्मश्री आणि 2023 मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित केले.