धोनीने T20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला....

    दिनांक :01-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली,
Dhoni creates history भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने T20 क्रिकेटमध्ये आणखी एक विशेष कामगिरी केली आहे. IPL 2024 मध्ये दिल्ली विरुद्ध पृथ्वी शॉचा झेल घेत धोनीने T20 क्रिकेटमधली 300वी विकेट घेतली. विकेटच्या मागे 300 बाद घेणारा तो जगातील पहिला यष्टीरक्षक ठरला. आयपीएल 2024 च्या 13 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे सामने होत आहेत. विशाखापट्टणममध्ये दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. पुन्हा एकदा पाहायला मिळाली माहीची जादू...video
 
 
dhoni
 
पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर   डेव्हिड वॉर्नरला बाद करून मुस्तफिजूरने ही भागीदारी तोडली. पाथीरानाने वॉर्नरचा झेल घेतला. यामुळे जडेजाने पृथ्वी शॉला धोनीकरवी झेलबाद केले. Dhoni creates history पृथ्वीचा झेल घेताच धोनीने इतिहास रचला. T20 मध्ये 300 बाद घेणारा तो पहिला यष्टिरक्षक ठरला. या यादीत पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिनेश कार्तिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. महेंद्रसिंग धोनीने आयपीएल सुरू होण्यापूर्वीच सीएसकेच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी ऋतुराज गायकवाडला कर्णधारपद देण्यात आले आहे. अन्...असदुद्दीन ओवेसी पोहचले मुख्तार अन्सारीच्या घरी!
 
300 - एमएस धोनी*
274 - कामरान अकमल
274 - दिनेश कार्तिक
270 - क्विंटन डी कॉक
209 - जोस बटलर