पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर

    दिनांक :01-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली,   
Prime Minister Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या 90 वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आरबीआई गव्हर्नर शक्तीकांत दास देखील सहभागी होणार आहेत. सध्या पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत आहेत. तसेच ते सतत जाहीर सभा घेत असून, त्यांच्या सरकारने केलेल्या कामांची माहिती लोकांना देत आहेत. अन्...असदुद्दीन ओवेसी पोहचले मुख्तार अन्सारीच्या घरी!
  
Prime Minister Modi
 
वैभव सूर्यवंशीचे धुवाधार त्रिशतक...रोहितचा विक्रम मोडला  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआई) ची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 अंतर्गत करण्यात आली आणि 1 जानेवारी 1949 रोजी तिचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. बँक केंद्र सरकार, राज्य सरकारे, व्यापारी बँका, राज्य सहकारी बँकांसाठी बँकर म्हणून काम करते. Prime Minister Modi रुपयाच्या विनिमय मूल्याची स्थिरता राखण्यात आरबीआई महत्त्वाची भूमिका बजावते आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भारताच्या सदस्यत्वाच्या बाबतीत सरकारचे एजंट म्हणून काम करते. रिझव्र्ह बँक विविध प्रकारची विकासात्मक आणि प्रचारात्मक कामेही करते. याशिवाय, रिझर्व्ह बँक भारत सरकारचे कर्ज कार्यक्रम देखील हाताळते.