लोकशाहीच्या उत्सवाचा पहिला टप्पा मोठ्या उत्साहात

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
 
mj 
 नागपूर,
democracy लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा महोत्सव आहे. आज शुक्रवार दि. १९ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. कारण आजची निवडणूक शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, आदिवासी व महिलाचा हक्क व हि आपल्या अधिकाराची निवडणूक आहे. ही निवडणूक पुढील भविष्यातील युवती व युवकांना रोजगार आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. आज आपल्याला पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी खासदार निवडायचा आहे.  तसेच आपल्या आजूबाजूला सर्वांना सांगून मतदान करावे हे गरजेचे आहे. मतदान करणे हा आपला पहिला अधिकार आहे. आपण सर्व आपल्या परिवारांना तसेच नातेवाईकांना आणि आजारी, पाजारी, शेजारी, यांना घेऊन व आपल्या महाराष्ट्रातील व विदर्भातील तसेच नागपूरकरांसाठी उत्साहाने या लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हावेत. असे आवाहन भारतीय नागरिकांनी केले आहे. लोकशाहीचा सोहळा...नागपुर, चंद्रपूर, गोंदियात दिग्गजांनी केले मतदान
सौजन्य: देवराव प्रधान,संपर्क मित्र