जैसलमेर,
Plane Crash : जैसलमेरजवळ विमान कोसळल्याची बातमी आहे. जैसलमेरपासून 25 किमी अंतरावर असलेल्या पिठाळा गावाजवळ हा अपघात झाला. येथे दूरवर मलबा पसरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जैसलमेरच्या सिपला ग्रामपंचायतीच्या बाल की धानीजवळ आज सकाळी भारतीय हवाई दलाच्या एका टोही विमानाला अपघात झाला. मात्र, हे विमान निर्जन भागात कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
एका भारतीयमुळे पाकिस्तानी मुलीला मिळाले जीवनदान
या घटनेची माहिती मिळताच खुझरी पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. हवाई दलाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे.
एमएस धोनी खेळणार T20 वर्ल्डकप?
अपघातानंतर हवाई दलाच्या टोही विमानाला आग लागली. काही वेळातच हे विमान पूर्णपणे जळून राख झाले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
भारतीय हवाई दलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरही अपघाताची माहिती दिली आहे. हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान हे रिमोट कंट्रोल्ड विमान होते. जैसलमेरजवळ आज नियमित प्रशिक्षण उड्डाण सुरू असताना ते कोसळले. या अपघातात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्यात आली आहे.
पाकिस्तानला एकाच वेळी बसले दोन धक्के