‘अहंकार’ : स्त्री शक्ती व सामाजिक समानता जपणारा चित्रपट

    दिनांक :05-Apr-2024
Total Views |
- अ‍ॅड. क्रांती राऊत यांनी पत्रपरिषदेत दिली माहिती

यवतमाळ, 
स्त्री शक्ती व सामाजिक समानता जपणारा आपल्या विदर्भ भूमीत तयार झालेला मराठी चित्रपट ‘'Ahankar': अहंकार’ असून, या चित्रपटातून स्त्री शक्तीवर भाष्य करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. क्रांती धोटे राऊत यांनी पत्रपरिषदेत दिली. पुढे बोलताना अ‍ॅड. राऊत म्हणाल्या, हा चित्रपट यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश गावात चित्रीकरण झालेला आहे. खटेश्वर, जांब, चौसाळा, यवतमाळ शहरातील नेताजी चौक, दर्डा नाका, बस स्थानक, वाघापूर तसेच शिर्डी, पालघर या ठिकाणी या चित्रपटाची छायाचित्रण करण्यात आले आहे.
 
 
y5Apr-Ahankaar
 
'Ahankar': चित्रपटातून समाजातील युवक-युवतींना प्रबोधन करण्याचा हेतू आहे. या चित्रपटाचे निर्माते एस. जी. अनुपमा, डी. ठाकरे, दिग्दर्शक प्रवीण भगत, सहदिग्दर्शक अश्विनी बन्सोड, नृत्यदिग्दर्शक प्रिन्स कुमार, रेश्मा, सहनृत्यदिग्दर्शक केयूर, अभिषेक, कॅमेरा सेटअप जय धोदी, जयाद, जयश. मेकअप दीपाली ठाकरे आहेत. या चित्रपटात सेविका व राजकीय क्षेत्रात ठसा असलेल्या अ‍ॅड. क्रांती धोटे राऊत यांची प्रमुख भूमिका आहे. तसेच सोबत नायक नितेश ललित, बी. दिव्या, सरला इंगळे, श्रद्धा रंगारी, मारुती नाईक, शाहिस्ता खान, चारुलता पावसेकर, दिलीप इंगळे, प्रतिभा पवार, करण देवकर, चंचल पाठपासे, भूमिका ठाकरे, अनुष्का बन्सोड, ऋतिक मांदेवार, संस्कृती गोटे, संजय माटे, संदीप मिसळे, जुईली परचाके, कृतिका पाटील, छाया रंगारी, प्रा. दुर्वे, प्रा. देशमुख, प्रा. शेंडे, प्रा. तिवारी, प्रा. संजय यादव यांनी काम केले आहे. या पत्रपरिषदेला लाला राऊत, योगेश धानोरकर, विवेक देशमुख, आशिष मोघे, अमन चौधरी, प्रमोद शिंदे, मुक्तरंग सोनटक्के, राजा भगत उपस्थित होते.