‘बंगालच्या वाघा'चे स्मरण!

Ashutosh Mukherjee-West Bengal वकिलीचे धडे

    दिनांक :29-May-2024
Total Views |
प्रासंगिक 
 
 
- राहुल गोखले
Ashutosh Mukherjee-West Bengal श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे वडील ही आशुतोष मुखर्जी यांची ओळख नाही; तशीच आशुतोष मुखर्जी यांचे पुत्र ही श्यामाप्रसाद यांची ओळख नव्हे. वडील-मुलगा हे त्यांचे नाते होते; परंतु कर्तृत्वाच्या बाबतीत ते दोघेही स्वयंभू होते. आशुतोष मुखर्जी यांचा जन्म २९ जून १८६४ रोजीचा; तर त्यांचे देहावसान झाले ते २५ मे १९२४ रोजी. परवाच्या २५ मे रोजी त्यांचा शंभरावा स्मृतिदिन होता. Ashutosh Mukherjee-West Bengal त्यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या अनोख्या पैलूंना उजाळा देणे औचित्याचे ठरेल. एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे जीवन किती बहुपेडी असावे, हे पाहायचे असेल तर आशुतोष मुखर्जी यांच्या जीवनाकडे पाहावे लागेल. ते गणितज्ञ होते, असा त्यांचा गौरव करावा तर कोणी ते कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू होते, याकडे लक्ष वेधेल. Ashutosh Mukherjee-West Bengal  कोणी मुखर्जी हे नामांकित वकील आणि न्यायाधीश होते, याचा दाखला देईल तर अन्य कोणी ते शिक्षणतज्ज्ञ असल्याचे स्मरण करून देईल.
 
 
 
Ashutosh Mukherjee-West Bengal
 
 
 
 
आशुतोष मुखर्जी यांचे वडील डॉक्टर होते. तेव्हा शिक्षणाची पृष्ठभूमी कुटुंबातच होती. आशुतोष मुखर्जी यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर तत्कालीन प्रेसिडेन्सी कॉलेजात प्रवेश परीक्षा दिली. Ashutosh Mukherjee-West Bengal तीत ते दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. साहजिकच त्या प्रतिष्ठित महाविद्यालयात त्यांचा प्रवेश पक्का झाला. तेथे नरेंद्रनाथ दत्त हे त्यांचे सहाध्यायी होते. तेच पुढे जाऊन ‘स्वामी विवेकानंद' म्हणून लौकिक पावले. मुखर्जी यांनी गणित आणि पदार्थविज्ञान या दोन्ही शाखांत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. किंबहुना एकापेक्षा अधिक विषयांत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणारे कलकत्ता विद्यापीठाचे ते पहिलेच स्नातक होते. ‘जॉमेट्री ऑफ कोनिक्स' हे मुखर्जी यांचे पुस्तक १८९३ साली इंग्लंड येथून प्रकाशित झाले. Ashutosh Mukherjee-West Bengal इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचे संस्थापक डॉ. महेंद्र लाल सरकार यांनी मुखर्जी यांना वैज्ञानिक विषयांवर व्याख्याने देण्यासाठी आवर्जून निमंत्रित केले. त्या व्याख्यानांचा लाभ पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना होत असे. गणितात मुखर्जी यांना रस होता तसाच तो कायद्यातदेखील होता.
 
 
 
‘दि बंगाली न्यूजपेपर' हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सुरू केलेले वृत्तपत्र. कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नॉरीस यांनी दिलेल्या एका निकालाच्या विरोधात बॅनर्जी यांनी अत्यंत तिखट शब्दांत अग्रलेख लिहीत नॉरीस आपल्या पदाला लायक नाहीत, अशी टीका केली. ही घटना १८८३ सालची. Ashutosh Mukherjee-West Bengal न्यायालयाच्या अवमान प्रकरणी बॅनर्जी यांना अटक करण्यात आली तेव्हा त्याविरोधात निदर्शने करण्यात मुखर्जी आघाडीवर होते. मुखर्जी वकिलीकडे वळले. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी नंतर म्हटले होते की, बंगालला एक नामांकित न्यायाधीश आणि कुलगुरू लाभला; पण बंगालने एक गणितज्ञ गमावला. मुखर्जी यांनी गणितात संशोधन सुरूच ठेवले असते तर जागतिक स्तरावर आघाडीच्या गणितज्ञांमध्ये त्यांचे स्थान असते, असा त्यांचा गौरव रँग्लर परांजपे यांनीही केला होता. रासबिहारी घोष हे काँग्रेसच्या अव्वल नेत्यांपैकी एक आणि नामांकित वकील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुखर्जी यांनी वकिलीचे धडे गिरविले.
 
 
 
Ashutosh Mukherjee-West Bengal कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची धुरा सांभाळण्यासाठी चक्क लॉर्ड कर्झनने मुखर्जी यांना निमंत्रित केले होते; तेव्हा आपल्या मातोश्रींची अनुमती असेल तरच हे पद आपण ग्रहण करू, असे उत्तर मुखर्जी यांनी दिले होते. मातोश्रींनी परवानगी दिल्यानंतर १९०४ साली मुखर्जी यांनी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारला. १९२३ सालापर्यंत म्हणजेच जवळपास वीसेक वर्षे त्या पदावर ते होते. या सर्व काळात मुखर्जी यांनी निकाली काढलेल्या खटल्यांची संख्या दोन ते अडीच हजार इतकी असेल. त्यातील अनेक निकालांचा संदर्भ अद्याप देण्यात येतो. सार्वजनिक शिक्षण संचालनालयाचे प्रमुख सर आल्फ्रेड क्रॉफ्ट यांनी मुखर्जी यांना प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये अध्यापन करण्यासाठी निमंत्रित केले होते. Ashutosh Mukherjee-West Bengal मात्र, आपल्याला युरोपियन प्राध्यापकांना मिळणारा दर्जा आणि वेतन मिळाले तरच आपण रुजू होऊ, अशी अट मुखर्जी यांनी घेतली. ती मंजूर झाली नाही तेव्हा मुखर्जी यांनी ती नोकरी स्वीकारण्यास नकार दिला. १९०६ साली मुखर्जी यांची नियुक्ती कलकत्ता विद्यापीठाच्या कुलगुरुपदी करण्यात आली.
 
 
 
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतानाच विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम करण्याचा अनोखा मान मुखर्जी यांना मिळाला. विद्यापीठ म्हणजे केवळ परीक्षा घेणारे केंद्र नसून संशोधन-अध्ययन यांचे श्रेष्ठ केंद्र असावे, अशी मुखर्जी यांची धारणा होती. मुखर्जी कुलगुरू असल्याने विद्यापीठाची सूत्रे योग्य व्यक्तीच्या हातात आहेत, या विश्वासातून रासबिहारी घोष, तारकनाथ पलीत यांसारख्या नामांकित बॅरिस्टरसहित अनेक दिग्गज व्यक्तींनी सढळ हाताने विद्यापीठाला देणग्या दिल्या. Ashutosh Mukherjee-West Bengal या देणग्यांचा उपयोग करून देशभरातील प्रख्यात अध्यापकांना मुखर्जी यांनी कलकत्ता विद्यापीठात निमंत्रित केले; मग ते सी. व्ही. रमण असोत, सर्वपल्ली राधाकृष्णन असोत किंवा पी. सी. रे असोत; विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षक लाभले पाहिजेत आणि ज्ञानार्जनाची ऊर्मी त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे, हा त्यांचा ध्यास होता. अनेक परदेशस्थ व्यक्तिमत्त्वांना मुखर्जी यांनी व्याख्याने देण्यासाठी निमंत्रित केले होते. पलीत अध्यासनावर रमण यांची नियुक्ती पदार्थविज्ञान शाखेचे प्राध्यापक म्हणून मुखर्जी यांनी केली.
 
 
 
रमण त्यावेळी डॉक्टरेट नव्हते. त्यामुळे काही जणांनी मुखर्जी यांच्या निर्णयावर आक्षेप नोंदविला. मात्र, हा तरुण एके दिवशी परदेशात जाईल; मात्र शिकायला नव्हे तर शिकवायला, असा विश्वास मुखर्जी यांनी व्यक्त केला होता. काही वर्षांनी रमण यांना नोबेल पारितोषिक मिळाले तेव्हा मुखर्जी यांच्या द्रष्टेपणाची प्रचीती आली. Ashutosh Mukherjee-West Bengal विद्यार्थी असणारे सुभाषचंद्र बोस यांनी प्राध्यापक ओटेन यांच्यावर केलेल्या हल्ल्याची १९१६ साली घटना घडली. ओटेन हे वर्णभेद मानणारे आहेत, असा आरोप करीत बोस आणि त्यांच्या काही मित्रांनी ओटेन यांच्यावर हल्ला करून त्यांना जिन्यावरून खाली ढकलून दिले होते. तेव्हा बोस यांना महाविद्यालयातून काढून टाकावे म्हणून मुखर्जी यांच्यावर बराच दबाव होता. तथापि, बोस यांच्यासारख्या बुद्धिमान विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मुखर्जी यांनी कुलगुरू या नात्याने बोस यांची केवळ दुसऱ्या महाविद्यालयात रवानगी करण्यापुरतीच शिक्षा मर्यादित ठेवली. Ashutosh Mukherjee-West Bengal भारतीय विज्ञान काँग्रेसच्या १९९४ साली झालेल्या पहिल्यावहिल्या अधिवेशनाचे मुखर्जी अध्यक्ष होते. तत्पूर्वीच १९११ साली ब्रिटिश सरकारने त्यांना ‘नाईटहूड' किताबाने सन्मानित केले होते. ‘ज्ञानलालसा' हा मुखर्जी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा लोभस पैलू होता.
 
 
 
त्यांच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात सुमारे ८६ हजार ग्रंथ-पुस्तके होती. १९४९ साली मुखर्जी यांच्या पुत्रांनी हा ग्रंथसंग्रह कलकत्याच्या नॅशनल लायब्ररीकडे सुपूर्द केला. या संग्रहात मानवशास्त्र, खगोल, अर्थशास्त्र, कायदा, साहित्य, धर्म, शरीरशास्त्र अशा विविध विषयांतील ग्रंथ आहेत. मुखर्जी यांना अनंत विषयांमध्ये रस होता त्याचे हे द्योतक. १७ व्या शतकातील ‘इसापनीती' पुस्तकाची प्रत, जर्मन लेखक गटे लिखित ‘फॉस्ट' या नाटकाची छापील प्रत, भारतीय कलांमध्ये स्वदेशी मूल्य जपण्याच्या चळवळीतील अग्रणी अवनींद्रनाथ टागोर यांची चित्रे असणारे ओमर खय्याम यांच्या ‘रुबायांचे पुस्तक' अशा दुर्मिळ ग्रंथांचा यात समावेश आहे.Ashutosh Mukherjee-West Bengal या ग्रंथसंग्रहाचे जतन करण्याच्या दृष्टीने नॅशनल लायब्ररीने दोनच वर्षांपूर्वी पुढाकार घेतला होता. १९२३ साली मुखर्जी कुलगुरू पदावरून पायउतार होणार होते. आपले अखेरचे भाषण त्यांनी पदवीदान समारंभात केले. त्याच वर्षी त्यांच्या कन्येचा मृत्यू झाला. तो धक्का ते पचवू शकले नाहीत आणि पुढच्याच वर्षी म्हणजे २५ मे १९२४ रोजी त्यांचे पाटण्यात देहावसान झाले. बंगालच्या या वाघाचा मृत्यू होऊन शतक उलटले असले, तरी त्यांचा वारसा विस्मरणात जाणारा नाही!
९८२२८२८८१९