‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!'

doctor tumhi sudha-Pune-Porsche हे सारे सरावाचे

    दिनांक :29-May-2024
Total Views |
अग्रलेख
 
 
doctor tumhi sudha-Pune-Porsche ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा...!' अनेक दशके मराठी रंगभूमी गाजविलेले नाटक. वैद्यक व्यवसायातील नैतिकतेसंबंधीची गुंतागुंत उलगडताना या व्यवसायावरच्या नाटकातून केलेले भाष्य अप्रतिम आहे. वैद्यकीय सेवा हा व्यवसाय (व्होकेशन) आहे की धंदा (बिझनेस) आहे, असा संघर्ष या नाटकातून उत्तमरीत्या चितारलेला आहे. doctor tumhi sudha-Pune-Porsche साधारण शंभरेक वर्षांपूर्वी अशाच विषयावरचे जॉर्ज बर्नार्ड शॉचे ‘डॉक्टर्स डिलेमा' नावाचे नाटक गाजले होते. वैद्यकीय व्यवसायावर, त्यातल्या नैतिक प्रश्नांवर आणि डॉक्टरांवर अनेक नाटके, चित्रपट आले. अपवाद वगळता बहुतांशी कलाकृतींमध्ये डॉक्टरांचे चित्रण सहृदय व्यावसायिकाच्या स्वरूपात केले गेले. doctor tumhi sudha-Pune-Porsche समाजात जसे डॉक्टर्स होते, तसे सिनेमात-नाटकात दिसायचे. जसे पोलिस-पत्रकार प्रत्यक्षात दिसतात, तसे सिनेमा-नाटकात असायचे. आता काळ बदलला. सिनेमाहून रंजक आणि धक्कादायक गोष्टी प्रत्यक्ष घडतात आणि आपल्याला अनेकांच्या बाबतीत प्रश्न पडत असतो- ‘तुम्हीसुद्धा...!' हेही वाचा : गेमिंग झोनच्या मालकाचाही आगीत होरपळून मृत्यू
 
 

doctor tumhi sudha-Pune-Porsche
 
 
 
doctor tumhi sudha-Pune-Porsche ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!' या नाटकाची आठवण येण्याचे कारण पुण्याच्या पुण्यवान डॉक्टर जोडीचा कारनामा. अल्पवयीन वाहन चालक मुलाने २०० किलोमीटरच्या वेगाने आलिशान पोर्शे चालविली आणि दोघांचा जीव घेतला. त्याला या अपराधातून मुक्त करण्यासाठी अग्रवाल कुटुंबाने काय काय केले, याच्या अनेक कथा आता बाहेर येत आहेत. पुण्यातील प्रसिद्ध ससून हॉस्पिटलमधील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि प्रथमोपचार विभागाचे प्रमुख डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांना, त्या मुलाचे ब्लड सॅम्पल बदलविण्यासाठी, तीन लाखांची लाच घेतल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. doctor tumhi sudha-Pune-Porsche आता डॉ. तावरे म्हणतात की, मी सगळ्यांची नावे घेणार आहे. या प्रकरणात एका मध्यस्थालाही अटक झालेली आहे. थोडक्यात सांगायचे तर याआधीही अशा घटना घडल्या असण्याची आणि अशा प्रकारच्या लपवाछपवीसाठी पैसा घेण्याची पद्धत बऱ्याच काळापासून अस्तित्वात असण्याची शक्यता आहे, असा काढता येतो. अल्पवयीन वाहन चालक मुलाचे प्रकरण भयंकर आहे. आपल्या समाजातील धनवंतांना आलेला पैशाचा माज, पैशाच्या इशाऱ्यावर नाचणारी सरकारी व्यवस्था, पोलिसांचा लोभीपणा हे सारे तसे सरावाचे होते.
 
 
 
हेही वाचा : ‘बंगालच्या वाघा'चे स्मरण! पण, डॉक्टरांनी थेट रक्ताचे नमुने बदलणे कमालीचे धक्कादायक आहे. हे लक्षात आले नसते तर हे प्रकरणच भलत्याच दिशेने गेले असते. पूर्वीच्या काळी काही चित्रपटांमध्ये दाखविले जायचे की, हिरो आणि त्याचा मित्र किंवा साथीदार चित्रपट पाहायला थेटरमध्ये जातात. मध्यंतराच्या आधी हळूच बाहेर पडतात. doctor tumhi sudha-Pune-Porsche व्हिलन किंवा त्याच्या साथीदाराची हत्या करतात... आणि पुन्हा चुपचाप थेटरमध्ये येऊन बसतात. त्यांना दोषी ठरवणे कठीण असते. कारण, ज्यावेळी हत्या झाली, त्यावेळी ते चित्रपट पाहत असतात. त्यांची चित्रपटाची तिकिटे हा त्यांचा बचाव असतो. ब्लड सॅम्पलच मॅच झाले नसते तर त्या मुलाला आरोपी ठरवणे आणि त्याच्यावर खटला चालविणे कठीण झाले असते. सुदैवाने ते वेळीच लक्षात आले आणि दोन डॉक्टरांचा कारनामा उघडकीस आला. सर्व व्यवसायांमध्ये असे वाईट लोक आहेत. doctor tumhi sudha-Pune-Porsche फरक एवढाच की, काही व्यवसायांमध्ये वाईट लोक असूच नयेत, अशी समाजाची अपेक्षा असते; किंबहुना या क्षेत्राला नाव ठेवायला जागा नाही, असा बहुतेकांचा भाबडा समज असतो. ते क्षेत्र वैद्यकीय व्यवसायाचे आहे. डॉक्टरांना आजही लोक देवच मानतात.
 
 
 
दुसऱ्या कोणत्याही व्यवसायाला असे देवपण आलेले नाही. त्याचे कारण असे की, डॉक्टर माणसांचे प्राण वाचवितो, त्यांना आजारातून बरे करतो. इतर व्यवसायांप्रमाणेच याही व्यवसायात धंदेवाईकपणा आलेला आहे, हे खरेच आहे. पण, तो रक्ताचे सॅम्पल बदलण्यापर्यंत खालच्या स्तरावर जाणे धक्कादायक आहे. शिवाय, पैसे खाण्याचे किती मार्ग आणखी असतील याचाही अंदाज त्यातून येण्याजोगा आहे. doctor tumhi sudha-Pune-Porsche ही घटना केवळ वैयक्तिक पातळीवरील नैतिक घसरणीशी संबंधित नाही. आरोग्य सेवा क्षेत्रात निर्माण झालेल्या मोठ्या समस्येचे हे एक लक्षण आहे. वैद्यकीय व्यवसायाला फार पूर्वीपासून उदात्त मानले जाते. मेडिकल इथिक्स किंवा वैद्यकीय नैतिकता हा म्हणून प्राचीन काळापासून विद्वत्जनांच्या चर्चेत राहिलेला विषय. इसवी सनापूर्वी ४०० च्या आसपास होऊन गेलेला ग्रीक चिकित्सक किंवा डॉक्टर होता हिप्पोक्रेटस. त्याच्या नावाने जगभरातील डॉक्टर्स शपथ घेतात (हिपोक्रॅटिक ओथ) आणि त्याच्याच नावाने व्यवसाय करतात. शपथ घेण्यासाठी एखादा आद्य पुरुष अस्तित्वात असलेला आणि शपथेवर केला जात असलेला ‘डॉक्टरकी' हा एकमेव व्यवसाय असावा.
 
 
 
doctor tumhi sudha-Pune-Porsche आपल्या हातून कुणाचीही हानी होऊ नये आणि रुग्णाच्या हितासाठी मी सर्वोत्तम काम करणार, अशा आशयाची ती शपथ असते. ही तत्त्वे या व्यवसायात शतकानुशतके टिकून आहेत आणि वैद्यकीय व्यवसायाचा ती आधारस्तंभ आहेत. मध्ययुगीन काळात, वैद्यकशास्त्रीय नैतिकतेच्या संदर्भात धार्मिक आणि तात्त्विक मुद्यांचा खूप प्रभाव होता. डॉक्टरांनी करुणा, नम्रता आणि निःस्वार्थता यासारख्या गुणांचे मूर्त रूप बनणे अपेक्षित होते. प्रबोधनाच्या युगाने वैद्यकशास्त्राला अधिक वैज्ञानिक व प्रगतिशील दृष्टिकोन दिला. परंतु, वैद्यकीय व्यवसायाचे नैतिक अधिष्ठान हिप्पोक्रॅटिक परंपरेत रुजलेले राहिले. समाजातील डॉक्टरांची भूमिका आजारांवर उपचार करण्याच्या पलीकडे असते. doctor tumhi sudha-Pune-Porsche त्यांना व्यावसायिक नैतिकतेचे उदाहरण म्हणून पाहिले जाते. जगाच्या कानाकोपऱ्यात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांकडे आदराने, कुतूहलाने पाहिले जाते. डॉक्टरांचा आदर केला जातो. इतर कोणत्याही बाबीपेक्षा डॉक्टर रुग्णांच्या कल्याणाला प्राधान्य देतात, या विश्वासावर हा आदर आधारित आहे. पुण्याच्या प्रकरणात एका रुग्णाच्या कल्याणाहून मोठा म्हणजे सामाजिक न्यायाचा विषय आहे. त्यातील शुचितेला या डॉक्टर जोडीने नख लावले आहे.
 
 
 
केले एकाने किंवा दोघांनी, पण आता या पराक्रमाचे परिणाम या डॉक्टरांच्या समव्यावसायिकांना भोगावे लागणार आहेत. यापुढे डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल्स बदलले तर नसतील, हे नमुने भलत्याच कुणाच्या रक्ताचे तर नाहीत ना, डॉक्टरांनी हा रिपोर्ट पैसे घेऊन तर लिहिला नसेल, अशा अनेक शंका-कुशंकांना त्यांना तोंड द्यावे लागणार आहे. doctor tumhi sudha-Pune-Porsche अशा घटना अविश्वासाची व्याप्ती वाढवण्यास हातभार लावत असतात. वैद्यकीय व्यवसाय हा सर्वोच्च नैतिक मानकांचा. त्यात असा भ्रष्टाचार होत असेल तर इतर कोणत्याही व्यवसायात तो याहून कितीतरी पटींनी होत असेल, असा सरधोपट निष्कर्ष लोक काढू शकतात. पुण्याचे प्रकरण अनेक अर्थांनी आपल्या व्यवस्थेतील अनेक यंत्रणांचे वस्त्रहरण करणारे आहे. तेथील आमदार रवींद्र धंगेकर यांनी पब्जमधून पोलिस कसे हप्ते वसूल करतात, याची यादीच सादर केली आहे. काही पोलिस कर्मचाèयांची नावेही त्यांनी सांगितली. सुरुवातीला नंबर नसलेली पोर्शे पुण्यात फिरताना पोलिसांना दिसली नाही आणि तिने अपघात केल्यावर अपराध्याला वाचवण्यासाठी पोलिसांनी निष्काळजीपणाचा कळस केला, हेही लोकांनी पाहिले.
 
 
 
doctor tumhi sudha-Pune-Porsche आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहन नोंदणीच्या संदर्भात केलेली दिरंगाईदेखील आपण पाहिली. या साऱ्यांत एकच आशास्थान उरले होते आणि ते होते वैद्यकीय व्यवसायाचे. तिथले म्होरके भ्रष्ट निघणे म्हणजे मंदिराच्या पुजाऱ्याने देव्हाऱ्यात पाप कर्म करण्याएवढे गंभीर आहे. ही घटना म्हणजे अशा एखाद-दुसऱ्या व्यक्तीचे स्खलन नव्हे, तो समाजाचा विश्वासघातही आहे. साऱ्या समाजाचे स्खलन होत असतानाही काहीतरी आशास्थाने शिल्लक राहायला हवीत. doctor tumhi sudha-Pune-Porsche त्यातले वैद्यकीय व्यवसाय हे एक महत्त्वाचे आशास्थान आहे. तेथे ही घटना घडली आहे. त्यामुळे त्याबद्दल अधिक चिंता वाटणे स्वाभाविक म्हटले पाहिजे. आरोग्य सेवेचे कितीही व्यापारीकरण झाले म्हटले तरी त्याच्याएवढे पुण्य कर्म दुसरे कोणतेही नाही. त्यामुळेच ईश्वराची तुलना लोक डॉक्टरांशी करतात. तावरे आणि हाळनोर या डॉक्टरांनी सामाजिक विश्वासाला तडा दिलेला आहे. न्याय प्रक्रियेशी खेळ केलेला आहे. सर्व यंत्रणा धनदांडग्यांकडून विकत घेतल्या जाऊ शकतात, या समाजाने बळकटीदेखील दिलेली आहे. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या सर्व पाठीराख्यांना आता कायद्याचा बडगा दाखविला पाहिजे.