विटभट्टींवरील कारवाईने संताप, नंतर कारवाईला 20 मे पर्यंत स्थगिती !

Amravati-bricks-Police सहा महिन्यपूर्वी दिली नोटीस

    दिनांक :08-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
 
 
अमरावती, 
 
 
Amravati-bricks-Police शहरालगतच्या नवीन बायपास ते कोंडेश्वर मंदिर मार्गावर असणार्‍या शासकीय जमिनवरील जवळपास 61 विटभट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी बुधवारी सकाळी महसुल विभागाचे, मनपाचे पथक, पोलिसांचा ताफा पोहचला. ही कारवाई सुरू होताच भट्टी चालक व कामगार अस्वस्थ झाले. Amravati-bricks-Police त्यांनी टाहो फोडला. वातावरण तापले होते. कोंडेश्वर मंदिर मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून बर्‍याच दूर अंतरापर्यंत वीटभट्ट्या आहेत. या परिसरात प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. या भागात अनेक अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत.Amravati-bricks-Police
 
 

Amravati-bricks-Police 
 
 
 मतदानापासून वंचित कर्मचार्‍यांची संख्याच कळेना  याच भागात जिल्हा ग्रामीण पोलिस दलातील कर्मचार्‍यांच्या आठशे कुटुंबांसाठी नवी वसाहत निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी लवकरच पोलिसांचे कुटुंब राहायला येणार आहेत. Amravati-bricks-Police अशा परिस्थितीत या भागात शासनाच्या जमिनीवर अनधिकृतपणे वसलेल्या या वीटभट्ट्या त्वरित हटविण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्यावतीने सहा महिन्यांपूर्वीच या भागातील सर्व वीटभट्ट्या चालकांना नोटीस बजावण्यात आली होती. प्रशासनाच्यावतीने जागा सोडण्याचा इशारा देण्यात आला असताना देखील या भागातील एकही वीटभट्टी चालक येथून हलला नाही. Amravati-bricks-Police अखेर आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास वीटभट्ट्या उध्वस्त करण्यासाठी महसूल विभागाचा ताफा परिसरात दाखल झाला.
 
 
 
रस्त्याला लागून असणार्‍या सुधाकर खोब्रागडे यांची वीटभट्टी सर्वांत आधी उध्वस्त करण्यात आली. एका वीटभट्टी चालकाने एका महसूल अधिकार्‍याच्या कानशिलात लगावल्यामुळे वातावरण चिघळले. पोलिसांनी अधिकार्‍याला मारहाण करणार्‍या व्यक्तीला ताब्यात घेतले. एकूण चार भट्ट्या हटविण्यात आल्या. Amravati-bricks-Police दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी वीटभट्ट्या चालकांना 20 मे पर्यंत आपल्या भट्ट्या शासकीय जागेवरून हटवाव्या, अशी अखेरची सूट दिली आहे. भट्ट्यांवर मेळघाटातील दोन हजाराच्यावर आदिवासी मजूर आहेत. Amravati-bricks-Police आजच्या कारवाईने मजुरांच्या झोपड्या उध्वस्त करण्यात आल्या. यामुळे अनेक आदिवासींचे कुटुंब उघड्यावर आलेत.