मोदी मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक

    दिनांक :10-Jun-2024
Total Views |
नवी दिल्ली,  
Modi Cabinet meeting पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी सोमवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. ही बैठक संध्याकाळी पाच वाजता होऊ शकते. सूत्रांनी सांगितले की, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोदी सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात समाविष्ट लोकांसाठी डिनरचे आयोजन केले आहे.
हेही वाचा : पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रोहितने रचला इतिहास पंतप्रधान मोदींनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात विकासाला नवी गती देण्यासाठी अनुभवी नेते आणि मंत्र्यांवर विश्वास व्यक्त केला आहे. 72 सदस्यीय मंत्रिमंडळातील निम्म्याहून अधिक मंत्री यापूर्वी केंद्रात मंत्री आणि तीन किंवा त्याहून अधिक वेळा खासदार राहिले आहेत. त्याचप्रमाणे मंत्रिपरिषदेत सर्व प्रदेश, वर्ग आणि समुदायांना स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 47 मंत्री ओबीसी, एससी, एसटी आणि अल्पसंख्याक समाजाचे आहेत. Modi Cabinet meeting मोदी 3.0 मध्ये 72 पैकी 43 मंत्री आहेत जे तीन किंवा अधिक वेळा खासदार झाले आहेत. तर 39 मंत्र्यांना यापूर्वी केंद्रात मंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. एवढेच नाही तर मंत्र्यांमध्ये सर्बानंद सोनेवाल, मनोहर लाल, शिवराज सिंह चौहान, एचडी कुमारस्वामी आणि जीतन राम मांझी यांसारखे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले अनुभवी चेहरेही आहेत. तसेच, पंतप्रधान मोदींनी रविवारी त्यांच्या नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या सर्व मंत्र्यांना विनम्र राहण्याचा सल्ला दिला, कारण सामान्य लोकांना हे आवडते. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेशी कधीही तडजोड करू नका, असा सल्लाही मोदींनी दिला.