कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

    दिनांक :10-Jun-2024
Total Views |
नवी दिल्ली,  
Indian origin student shot dead पंजाबमधील लुधियाना येथून कॅनडामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याची तेथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तो 2019 मध्ये स्टुडंट व्हिसावर कॅनडाला आला होता, त्याला सध्या कॅनडाचा कायम रहिवासी दर्जा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय युवराज सेल्स एक्झिक्युटिव्ह होता. त्याचे वडील राजेश गोयल लाकडाचा व्यवसाय करतात, तर आई शकुन गृहिणी आहे. युवराजचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही किंवा त्याचे कोणाशीही वैर नाही. कॅनडाचे पोलीस या हत्येचा तपास करत आहेत. 

Indian origin student shot dead
7 जून रोजी सकाळी 8:46 वाजता, पोलिसांना 164व्या स्ट्रीटच्या 900व्या ब्लॉकमध्ये गोळीबार झाल्याचा कॉल आला. पोलिस तेथे पोहोचले असता त्यांना युवराज मृत झाल्याचे समजले. मात्र, पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.  Indian origin student shot dead ज्यामध्ये 23 वर्षीय मनवीर बसराम, 20 वर्षीय साहिब बसरा, 23 वर्षीय हरकिरत आणि ओंटारियो येथील काइलॉन फ्रँकोइस यांना अटक करण्यात आली. त्याच्यावर फर्स्ट डिग्री हत्येचा आरोप आहे.