कोण आहेत कीर्तीवर्धन सिंह... ज्यांनी हरवले होते ब्रिजभूषण शरण ना !

    दिनांक :10-Jun-2024
Total Views |
नवी दिल्ली,
कीर्तिवर्धन सिंह हेmodi cabinet पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय मानले जातात. कीर्तिवर्धन यांचे वडील आनंद सिंह हे देखील गोंडा येथून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. आधी ते काँग्रेसमध्ये होते, पण नंतर त्यांनी सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. कीर्ती वर्धन यांनीही सपामधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि यावेळी त्यांनी गोंडातून विजयाची हॅट्ट्रिक साधली.
 

kirtiwardhan  
 
 
ब्रिजभूषण शरण सिंह यांचा केला पराभव 
उत्तर प्रदेशातील गोंडाmodi cabinet मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले कीर्तीवर्धन सिंह यांचा मोदी सरकार 3.0 मध्ये समावेश करण्यात आला आहे. एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात राज्यमंत्री बनलेल्या कीर्ती वर्धन यांनी 1998 मध्ये समाजवादी पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. भाजपचे उमेदवार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा पराभव करून  पहिल्यांदाच संसदेत पोहोचले. कीर्तिवर्धन सिंह हे पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय मानले जातात. कीर्तिवर्धन यांचे वडील आनंद सिंह हे देखील गोंडा येथून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी 1971 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. यानंतर आनंद सिंह यांनी 1980, 1984 आणि 1989 मध्ये झालेल्या निवडणुकीतही विजय मिळवला. मात्र, 1991 मध्ये आनंद सिंह भाजपच्या ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याकडून निवडणूक हरले. यानंतर, 1996 मध्ये त्यांनी सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली, परंतु यावेळीही त्यांना यश मिळाले नाही आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या पत्नी केतकी देवी सिंह यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. सलग दोन निवडणुका हरल्यानंतर आनंद सिंग यांनी त्यांचा राजकीय वारसा मुलगा कीर्तिवर्धन सिंह यांच्याकडे सोपवला. कीर्ती वर्धन यांनी 1998 मध्ये SP च्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि भाजप उमेदवार ब्रिजभूषण शरण यांचा पराभव केला. मात्र, १९९९ मध्ये ब्रिजभूषण येथून विजयी झाले. त्यानंतर 2004 मध्येही कीर्तीवर्धन खासदार म्हणून निवडून आले होते. 2009 मध्ये बेनी प्रसाद वर्मा यांनी गोंडा येथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर कीर्तीवर्धन सिंह 2014 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले आणि येथून भाजपच्या तिकिटावर विजयी झाले. त्यानंतर कीर्तिवर्धन सिंहने सलग तीन वेळा विजयाची हॅट्ट्रिक साधली.
 
 वडिलांचा विक्रम मोडला
गोंडा  modi cabinet  लोकसभा जागेवर आतापर्यंत 17 निवडणुका झाल्या आहेत. या जागेवरून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम आता कीर्तीवर्धन सिंह यांच्या नावावर होता, पण हा विक्रम त्यांच्याच मुलाने कीर्तीवर्धन सिंहने मोडला. कीर्तिवर्धन सिंह पाचव्यांदा या जागेवरून खासदार म्हणून निवडून आले. ब्रिजभूषण शरण सिंह या जागेवर दोनदा विजयी झाले आहेत, तर त्यांची पत्नी केतकी देवी सिंह एकदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.