भीषण अपघात! प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत पडले

    दिनांक :15-Jun-2024
Total Views |
रुद्रप्रयाग, 
Alaknanda river accident उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातून एका मोठ्या अपघाताची बातमी आली आहे. येथे एक टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत पडला. त्यात 26 प्रवासी होते, त्यातले ७ जण जखमी तर, १२ जणांचा मृत्यू झाला आहे, असे सांगण्यात येत आहे. जखमींना हेलिकॉप्टरने उच्च केंद्रात नेण्यात येणार आहे. गुप्तकाशीहून हेलिकॉप्टर रुद्रप्रयागला पोहोचले आहे.  हेही वाचा : सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 8 नक्षलवादी ठार
 
Alaknanda river accident
 
हेही वाचा : मनी लॉन्ड्रिंग आणि बेकायदेशीर खाणकाम...कोण आहे हाजी इकबाल ज्याने उभे केले कोट्यवधींचे साम्राज्य ! आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, रुद्रप्रयाग शहरापासून पाच किलोमीटर पुढे बद्रीनाथ महामार्गावरील रायतोलीजवळ एक टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत पडला. Alaknanda river accident गाडीत 26 प्रवासी असल्याचा संशय आहे. माहिती मिळताच पोलीस प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, डीडीआरएफ आणि इतर पथक घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत. हेही वाचा : गाझियाबादमध्ये तीन कारखान्यांना भीषण आग, video
अपघाताच्या वृत्तावर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघाताची अत्यंत वेदनादायक बातमी मिळाली. स्थानिक प्रशासन आणि SDRP टीम मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.