सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 8 नक्षलवादी ठार

    दिनांक :15-Jun-2024
Total Views |
नारायणपूर, 
Naxalites killed in narayanpur छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अबुझमदच्या जंगलात झालेल्या चकमकीत सहा ते आठ नक्षलवादी ठार झाले आहेत. या चकमकीत एक जवान जखमी झाल्याचेही वृत्त आहे. मात्र, अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अजूनही चकमक सुरूच आहे.

Naxalites killed in narayanpur
अबुझमदच्या जंगलात नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरूच आहे. नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी सीमावर्ती जिल्ह्यांसह संयुक्त कारवाई केली. Naxalites killed in narayanpur अबुझमदच्या कुतुल फरसाबेदा कोडामेटा भागात सैनिकांची संयुक्त कारवाई सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नारायणपूर जिल्ह्यातील माडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. नारायणपूर-कोंडागाव-कांकेर-दंतेवाडा डीआरजी, एसटीएफ आणि आईटीबीपी 53 व्या बटालियनचे सैन्य या संयुक्त कारवाईत सहभागी आहेत.