वाठोड्यात 'हिट अँड रन'...नऊ जणांना चिरडले

    दिनांक :17-Jun-2024
Total Views |
नागपूर,
Hit and run in Wathoda उपराजधानीत  पुन्हा एकदा हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाठोडा परिसरात एका वेगवान कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. त्यात दोघांचा दुर्दुवी मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. हि घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या दिघोरी चौकाजवळ घडली. पुढे आलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास फुटपाथवर लोक झोपले होते. दरम्यान उमरेड मार्गाकडे जाणाऱ्या भरधाव कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले व कार थेट फुटपाथवर गेली.या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे. हेही  वाचा : नागपुरात जवानांच्या ऑटोचा भीषण अपघात, 2 जवान शहीद
 
samya
 
हेही वाचा : मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेला अन् सापडला मृत!  ही घटना रविवारच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ घडली आहे.  घटनास्थळी असलेल्या लोकांनी सांगितले की, पीडित हे रस्त्यावर खेळणे विकून उदरनिर्वाह करणारे होते. यात महिला-मुलांचादेखील समावेश होता. Hit and run in Wathoda  दरम्यान अपघातग्रस्त कारमध्ये भूषण लांजेवार, सौरभ कंडुकर, वंश झाडे, सन्मय पात्रेकर, अथर्व बानाईत, अथर्व मोघरे, आणि ऋषिकेष चौबे हे सात मित्र होते. हे सात हि मात्र वंश झाडे यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला नागपूरच्या शेरे पंजाब धाब्यावर पार्टी करायला गेले. दरम्यान, कार हि सौरभ कडुकरच्या मालकीची असून पार्टी केल्यानंतर कार भूषण लांजेवारने चालवायला घेतली. हे सर्व 20 ते 22 वयोगटातील तरुण असून वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सर्व मित्र मद्यधुंद अवस्थेत असतांनाही त्यांनी नागपूरच्या आऊटर रिंग रोड फिरायचा बेत आखला आणि गाडी दिघोरी रोड मार्गे जायचे ठरवले. रविवारच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास अपघातग्रस्त भागात एक विवाह सोहळा सुरु होता. त्यामुळे तेथे थोडी गर्दी आणि वाहनांची रेलचेल होती.
 
आरोपींना कठोर शिक्षा होईल- उपमुख्यमंत्री फडणवीस
 
परिणामी या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा होईल, हे सुनिश्चित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. रात्रीची गस्त वाढवून 'ड्रंक अँड ड्राईव्ह'ची मोहीम अधिक तीव्र करावी, असेही देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला सांगितले आहे. या घटणेमुळे शहरात मात्र प्रचंड खळबळ उडाली असून आता फुटपाथ देखील सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे. हेही वाचा : तुम्हाला माहिती आहे Shrimp Squat चॅलेंज, सोशल मीडियावर होत आहे ट्रेंड