अलक्ष्मीः नाशयाम्यहम्

Rupees-Culture-Lakshmi कमंडलूत टाकून द्यावे?

    दिनांक :07-Jun-2024
Total Views |
जीवन जिज्ञासा
 
 
 
- प्राचार्य प्रमोद डोरले
Rupees-Culture-Lakshmi प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज हे श्री दत्तसंप्रदायातील एक अधिकारी साक्षात्कारी पुरुषच नव्हे तर साक्षात श्री गुरूंचा कर्मावतार म्हणून समजल्या जातात. Rupees-Culture-Lakshmi त्यांच्या जीवनात घडलेली एक घटना आहे. गुजरातमधील एक धनाढ्य कुटुंबातील एका विधवा स्त्रीने खूप पैसा खर्च करून एक दत्त मंदिर बांधले. त्या मंदिरात गुरुदत्तात्रेयांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पू. श्री वासुदेवानंद सरस्वतींच्या हातून व्हावी, ही त्या बाईंची इच्छा होती. तशी त्यांनी महाराजांच्या चरणी प्रार्थना केली. Rupees-Culture-Lakshmi त्याप्रमाणे पू. श्री महाराजांनी त्या सोहळ्यात सहभागी होऊन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. सहस्रावधी लोकांना अन्नदान झाले. सगळा आनंदीआनंद झाला. या सोहळ्यासाठी त्या घराण्यातील पारंपरिक असलेली चांदीची पूजेची उपकरणी बाहेर काढण्यात आली. Rupees-Culture-Lakshmi त्या विविध पूजेच्या उपकरणांमुळे श्री गुरूंची शोडषोपचार पूजा, अभिषेकादी क्रिया अतिशय उत्तमरीतीने संपन्न झाल्यात. पू. श्री महाराजांना आपल्या सद्गुरूंच्या अर्चनाभक्तीचा निखळ आनंद झाला. Rupees-Culture-Lakshmi पण या सर्व प्रकरणात एक अतिशय सूक्ष्म असलेली घटना घडली. जी ‘मानसिक' होती. ‘वासनेच्या' स्तरावर होती. ज्यामुळे पू. श्री महाराज हे सैरभैर झाले, अस्वस्थ झाले. आजच्या आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत तर त्या घटनेला काहीच महत्त्व नाही, अशी ती घटना कोणती होती?
 
 

Rupees-Culture-Lakshmi 
 
 
Rupees-Culture-Lakshmi त्याचे असे झाले की देवप्रतिष्ठेसाठी त्या घराण्यातील पारंपरिक देवपूजेची उपकरणी होती. ती अतिशय सुंदर, सुबक, शुद्ध चांदीची आणि मनाला आकर्षित करणारी होती. त्यातील आरतीसाठी तयार केलेले निरांजन तर अतिशय सुबक, ठशठशीत, बारीक कोरीव काम केलेले नक्षीदार असे होते. पू. श्री महाराजांच्या मनात एक क्षणभर असा विचार तरळून गेला की, ‘चूपचाप, कोणाचे लक्ष नाही हे पाहून हे निरांजन आपल्या कमंडलूत टाकून द्यावे.' कुणाला काय कळणार नाही? हा विचार क्षणात आला आणि लुप्तही झाला. यांच्या येण्या-जाण्याचे ‘साक्षी' फक्त महाराजच होते. विचार आला आणि क्षणात निघूनही गेला. कृतीमध्ये येण्याचा प्रश्नच नव्हता. Rupees-Culture-Lakshmi तरी देखील त्या रात्री पू. श्री महाराजांना झोप आली नाही. रात्रभर त्यांना एकच विचार संत्रस्त करीत होता की, ‘आपल्या मनात सूक्ष्म स्तरावर का होईना दुसऱ्याच्या वस्तुंबाबतची अभिलाषा, वासना, मोह इतकेच नव्हे तर सर्वांची नजर चुकवून ती आपल्या कमंडलूमध्ये टाकण्याची एका अर्थाने चौर्यकर्म करण्याची ‘वासना' का निर्माण झाली? या प्रश्नाचे उत्तर आपण श्री गुरूंनाच विचारावे म्हणून त्यांनी श्री दत्त गुरूंनाच विचारणा केली. भगवान श्रीरामकृष्ण परमहंस जसे आईशी बोलायचे तसे पू. श्री स्वामी श्री दत्तांशी बोलायचे. त्याप्रमाणे त्यांनी देवांशी संवाद केला. त्या संवादातून भारतीय जीवन धारणेतील अर्थशुचितेवर व त्याच्या गूढ असलेल्या अनाकलीय सत्याचे विदारक दर्शन घडते.
 
 
 
Rupees-Culture-Lakshmi पू. श्री स्वामींनी श्री गुरुदत्तांना त्याबाबत विचारणा केल्यावर मंदमिस्त करून श्री गुरुदेव त्यांना म्हणाले, ‘तू असे कर, उद्याच त्या बाईंची भेट घे आणि त्यांच्या घराण्यात हा धनसंचय कशाप्रकारे झाला आहे, याबाबत चौकशी कर. तुला तुझ्या समस्येच उत्तर मिळून जाईल.' श्री गुरूंच्या आदेशाप्रमाणे श्री स्वामी महाराजांनी तशी भेट घेतली आणि विचारणा केली असता उत्तरादाखल त्या बार्इंनी पुढील वृत्त कथन केले, ते असे- त्या म्हणाल्या, ‘महाराज! तुमच्यासारख्या संतांशी काय खोटे बोलायचे? आमच्या घराण्यातील जुन्या अनेक पिढ्यांनी ही चांदी-सोने, जवाहीर, दाग-दागिने ही संपत्ती त्या काळातील डाकू लोकांच्या ज्या अनेक टोळ्या होत्या त्यांच्याकडून अल्प किमतीत घेतली आहे. त्यामुळे ही अमाप संपत्ती आमच्याजवळ आहे. गेल्या तीन पिढ्या या तामशी संपत्तीचा परिणाम आम्ही भोगत आहोत. आमच्या घराण्यातील कर्ता पुरुष हा अल्पवयातच मृत्यू पावतो. विधवा म्हणून जगणारी माझी तिसरी पिढी आहे. मला एकच मुलगा आणि मुलगी आहे. तुमच्यासारख्या एका महापुरुषाने संपत्तीचा दोष निवारण्यासाठी, श्री दत्तमंदिर बांधून तुमच्यासारख्या सत्पुरुषाच्या हातून दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यास पितृदोषाचे क्षालन होईल, असे सांगितले. म्हणून मी हे मंदिर बांधले. आपला आशीर्वाद मला मिळाला, हे मी माझे भाग्य समजते. तिने श्री स्वामींना नमस्कार केला आणि निवेदन संपविले.
 
 
 
 
Rupees-Culture-Lakshmi तो कुळवृत्तांत ऐकल्यावर पू. स्वामींच्या सर्व प्रकरण लक्षात आले. पुढे आपल्या शिष्यांशी चर्चा करताना त्यांनी याबाबत मार्गदर्शन करताना त्यातील ‘साहचर्यभावाचे' (अ लॉ ऑफ असोसिएशन) विवेचन करताना म्हटले की, प्रत्येक वस्तुमात्राचा एक साहचर्यभाव असतो. तो सूक्ष्मपणे त्या वस्तुशी निगडीत असतो. तो दिसत नाही. पण त्याचे अस्तित्व, वलय (आजच्या परिभाषेत ‘ऑरा') त्या सोबत असतेच. त्या वस्तूशी आपला संबंध आला की, आपल्या नकळत त्याचा परिणाम आपल्यावर होतोच होतो. तो सूक्ष्म व मानसिक (सटल अँड सायकिक) असतो. त्यामुळे त्या प्रकारच्या भावना आपल्या मनात निर्माण होतात. चोरी, डकैती, लूट, वेळप्रसंगी खून अशा तामसिक क्रियांनी व वृत्तीने पिढ्यान्पिढ्या प्राप्त केलेल्या त्या वस्तूंवर देवाची उपकरणी असली तरी ते तामसी चौर्यकर्माची स्पंदने कायम होतीच त्यामुळे ती मानसिक स्पंदने (व्हायब्रेशन्स) क्षणकाल माझ्या मनात उमटून गेलीच. हे गूढतम विवेचन केल्यावर त्यांनी उपासना विज्ञानाशी याचा कसा संबंध आहे त्याचे विवेचन केले. ते म्हणतात- ‘आपण कोणतेही अनुष्ठान, पुरश्चरण साधना, उपासना करताना भूमिशुद्धी, आसनशुद्धी, द्रव्यशुद्धि (म्हणजे जमवलेली साधने) करून घेतो. त्याचे विशिष्ट मंत्र म्हणून जलप्रोक्षण करतो. त्याने त्या सर्व वस्तु-द्रव्यांशी निगडीत तामसी संस्कार हळूहळू नष्ट होऊन ते आपल्याशी सुसंवादी होतात आणि कोणत्याही प्रकारचा व्यत्यय त्यांत येत नाही.' (श्री थोरले महाराज चरित्र- खण्ड ३ मधून)
 
 
 
 
Rupees-Culture-Lakshmi श्री थोरले महाराज हे साक्षात् दत्तावत्तार समजल्या जातात. त्यांच्याद्वारा केलेले वरील विवेचनाची विश्वासार्हता मानावीच लागते. भारतीय जीवन धारणेत धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ वैदिक काळापासून मान्यच केले आहे. त्यामुळे पैसा, अर्थप्रधानता हे मानवी जीवनाच्या सर्वांगपरिपूर्णतेसाठी एक अत्यावश्यक आणि महत्त्वाचे साधन म्हणून त्याला महत्त्व आहेच. विवेक, वैराग्य, परमेश्वराच्या भक्तीचा आग्रह धरणाऱ्या संतांनीही त्याला महत्त्व दिलेच आहे. श्री समर्थांनी तर प्रपंची पाहिजे सुवर्ण (म्हणजे धन) । परमार्थी पंचीकरण (म्हणजे सूक्ष्मज्ञान) । अशी घोषणाच केली आहे. श्री संत तुकोबारायांनीही प्रापंचिकांनी ‘जोडोनिया धन । उत्तम व्यवहारे ।' त्याचा मुलाबाळांचा सुखी आणि आनंदमय संसार करण्यासाठी विनियोग करावा, असा आग्रहच केला आहे. पैशाशिवाय आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजाही नीट भागू शकत नाही, याचे व्यावहारिक ज्ञान पूर्वसूरींना होते. Rupees-Culture-Lakshmi त्यामुळे त्यांनी ‘अभ्युदया'ची शास्ज्ञशुद्ध कल्पनेचा आग्रह धरला आणि त्याला निःश्रेयसाची जोड दिली. निःश्रेयस सिद्धीसाठी सर्व अर्थार्जनाचा खटाटोप. परमार्थ साधनेसाठी समृद्ध प्रपंचाचा अट्टाहास! पण तो संयमित, संतुलित असा! पण आधुनिक भौतिक वादाच्या झंझावातात हा आमचा संतुलित, संयमित भावच नष्ट झाला आहे. पैसा, पैसा आणि फक्त पैसा आणि तो कशाही भ्रष्टाचारी, दूराचारी, व्यभिचारी, मार्गाने मिळवायचा म्हणजे मिळवायचा आणि वापरायचा. त्यासाठी सारी नीतिमत्ता पणाला लावायची. ‘कमरेच सोडून डोक्याला बांधायचे. जनाची नाही तर मनाचीही लाज सोडून असंयमित, अनिर्बंध जीवन जगायचे.
 
 
 
Rupees-Culture-Lakshmi दिवसेंदिवस दुर्गतीला जायचे आणि त्याच पैशाच्या, तामसिक अदृश्य संस्कारांना बळी पडून भरल्या जीवनातून उठून चालू लागायचे. परमेश्वराने सुखासाठी, आनंदासाठी दिलेले मानवीजीवन आपणच नष्टभ्रष्ट करायचे. मध्यंतरी पुणे येथे एका अल्पवयीन असलेल्या मुलाच्या बेधुंद कार चालविण्यामुळे दोन जीवांना प्राणाला मुकावे लागले. एका प्रचंड पैशाचा, धनी त्याचे पिताश्री, जो पैसा आजच्या ‘गिव्ह अँड टेक' या भ्रष्टाचारी यंत्रणेला हाताशी धरून, त्यांना प्राप्त झालेला, सोबत आपापले ‘अदृश्य तामसी' संस्कार घेऊन आलेला. त्या संस्कारांना प्रकट होण्याची संधी मिळताच दारूच्या नशेत, पबमधून परततांना निमित्त झाले आणि पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले. जीवनाच्या भरल्या ताटावरून उठले... ते वाचत असताना सहजपणे आलेल्या अंतर्मुखतेतून, त्यातून घडलेल्या चिंतनातून पू. श्री थोरले महाराजांच्या जीवनातील वरील घटना मला आठवली. भारतीय उपासना तंत्रात आपण ‘धन लक्ष्मीची' उपासना करतो. Rupees-Culture-Lakshmi तिची दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करतो. श्रीसूक्ताचा अभिषेक करतो. त्यात तिला प्रार्थना करतो- ‘हे माते, तुझे ‘लक्ष्मी' आणि ‘अलक्ष्मी' अशी दोन रुपे आहेत. दुराचारी, वामाचारी, भ्रष्टाचारी मार्गाने प्राप्त झालेली धनसंपदा ही ‘अलक्ष्मीरुप' ‘अवदसारुप' आहे. तिचा तू नाश कर... ‘अलक्ष्मी नाशयाम्यहम्!'