उद्यापासून महाराष्ट्रात जोरदार बरसणार...

    दिनांक :07-Jun-2024
Total Views |
मुंबई,
rain in Maharashtra मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्राला आता उन्हापासून दिलासा मिळणार आहे. राज्यात शनिवारपासून जोरदार पाऊस सुरु होणार असल्याची शक्यता असून मॉन्सूनच्या वाटचालीसाठी राज्यात पोषक स्थिती निर्माण झाली आहे.सध्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे. आज (६ जून) तळकोकणात मान्सून दाखल झाला आहे. तर शनिवारपासून पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये दोन दिवस आधीच पाऊस दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या १० जूनपर्यंत मान्सून मुंबई आणि महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. हेही वाचा : आता अजितदादांचं काय होणार? राज्यात भूकंप?
 
rain
हेही वाचा : क्रिकेटमध्येही नितीश कुमार 'किंगमेकर' ठरला मान्सून दाखल होण्याच्या आधी राज्यात प्री मान्सून पाऊसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह काही भागात हा प्री मान्सून पाऊस पडू लागला आहे. rain in Maharashtra पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनीही ट्वीट करत मान्सूनबद्दल माहिती दिली आहे. तसंच, हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाचा जोर राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम सोलापूर, अहमदनगर आणि मराठवाड्यातील काही भागात येत्या तीन ते चार तासांत विजांच्या गडगडाटांसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसंच यावेळी वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे.
 
 
 
या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
IMD नुसार, आज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये गडगडाटी वादळासह पाऊस होण्याची शक्यता आहे. केरळ, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, कर्नाटकात गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ईशान्येकडील राज्यांना अजूनही उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. rain in Maharashtra या राज्यांमध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. IMD ने सांगितले की ८ ते ९ जून दरम्यान उत्तर भारतात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे.