साप्ताहिक राशिभविष्य

रविवार, दि. 14 जुलै 2024 ते शनिवार, 20 जुलै 2024

    दिनांक :14-Jul-2024
Total Views |
साप्ताहिक राशिभविष्य 
 
 
saptahik rashi bhavishya
 
मेष (Aries Zodiac): वास्तववादी व्यवहार असावा
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या षष्ठ या कर्म स्थानातून सुरू होत आहे. हा योग आपल्या कर्मस्थानास व अर्थत्रिकोणास मजबुती देणारा आहे. त्यामुळे दीर्घकालीन फायद्यासाठी या सप्ताहात गुंतवणूक करणे लाभकारी ठरेल. शेअर बाजार, म्युच्युअल फंड वगैरे पर्यायांचा विचार करता येईल. आपल्या संपूर्ण व्यवहारात वास्तववादी राहण्याचा प्रयत्न करावयास हवा. खाजगी व गोपनीय महिती किंवा आपल्या योजना उघड करू नका. कुटुंबात आनंदी व सहकार्याचे वातावरण राहील. काही कौटुंबिक कार्यक्रम ठरविले जाऊन आपला सहभाग राहील.
शुभ दिनांक - 16, 17, 18, 20.
 
 
वृषभ (Taurus Zodiac) : कामातील कौशल्याचे कौतुक
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील पंचम या शुभ स्थानातून सुरू होत आहे. भाग्य, लाभ, उपासना व व्यक्तिमत्त्वाला उजाळा देण्यासाठी हे स्थान महत्त्वाचे ठरते. या सप्ताहात आपले काम आणि दृष्टिकोण प्रामाणिक व साफ ठेवा. पारदर्शक व्यवहार ठेवा. आपल्या या भूमिकेचे कौतुकच होईल. त्यामुळे आपली पत सुधारेल. कार्यक्षेत्रात रुबाब निर्माण होईल. कार्यालयीन कामातील आपले कौशल्य वाखाणले जाईल. काही कायदेशीर गुंता निर्माण झाल्यास वकिलांचा सल्ला घेणे उत्तम. कुटुंबात जरा गोडी-गुलाबीचे धोरण स्वीकारावे लागेल. जोडीदाराचे मन राखण्याचा प्रयास हवा. उत्तम पाठबळ मिळेल.
शुभ दिनांक - 15, 18, 19, 20.
 
 
मिथुन (Gemini Zodiac):  निर्भय राहण्याची गरज
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील सुख स्थानातून सुरू होत आहे. ही स्थिती आपल्या कर्मस्थानालाही बळकटी देणारी आहे. काही व्यावसायिक शुभयोग लाभतील. याचमुळे आपल्या कार्यक्षेत्रात सध्या अधिक चौकस आणि निर्भय राहण्याची गरज आहे. जाणकार व सहकार्‍यांच्या मदतीने काही विशेष उपक्रम राबवू शकाल. संवाद व कार्यातील कौशल्य कामी येईल. दुसरीकडे काहींना आरोग्याची काहीशी कुरबूर जाणवू शकते. त्यासाठी विश्रांतीची गरज आहे. कुटुंबातील वातावरण सहकार्य आणि सौहार्द्राचे राहील.
शुभ दिनांक - 15, 16, 19, 20.
 
 
कर्क (Cancer Zodiac) : कौटुंबिक सुखास पूरक
आपला राशिस्वामी चंद्रच असून तो या आठवड्यात कुंडलीतील पराक्रम स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे. ही स्थिती भाग्यकारक योग, व्यावसायिक लाभ व कौटुंबिक सुखास पूरक आहे. आपल्या प्रयत्नाने कुटुंबातील ताणतणावाचे वातावरण दूर होऊ शकेल. कौटुंबिक किंवा भाऊबंदकीची तेढ असल्यास ती ही निवारण करता येऊ शकेल. आपले वर्तन पारदर्शी व विश्वासार्ह राहील. यामुळेच आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव वाढेल. काही चांगल्या योजना साकारता येतील. संधी मिळतील. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ दिनांक - 15, 16, 17, 18.
 
 
सिंह (Leo Zodiac) :  व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील धन स्थानातून सुरू होत आहे. चंद्राचे हे भ्रमण आपल्या अर्थत्रिकोणास बळ देणारे असून कार्यक्षेत्रातही चांगल्या संधी निर्माण करणारे आहे. या आठवड्याची सुरुवात काहीशी खर्चिक ठरू शकते. एखादी महत्त्वपूर्ण मोठी खरेदी किंवा गुंतवणूक, व्यवसाय विस्ताराच्या उपाययोजनेचे स्वरूप मिळून हा खर्च सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांचा एखाद्या मोठ्या बॅनरशी संबंध निर्माण होऊ शकतो. त्याने आपली व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरदारांना समाधानकारक आठवडा राहील. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
शुभ दिनांक - 16, 17, 18, 19.
 
 
कन्या (Virgo Zodiac) : सामंजस्याचे वातावरण राखा
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्याच राशीतून सुरू होत आहे. सर्वसाधारणपणे ही स्थिती अतिशय उत्तम असली, तरी राशिस्वामी बुध व्ययात असल्याने तो काही प्रसंगी आपला हिरमोड करू शकतो. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात, व्यवहारात जरा सतर्क राहण्याची गरज आहे. कुणाच्याही चुगली, चहाळीवर विश्वास ठेवून आपले मत बनवू नका. कोणत्याही सामुदायिक योजनेत किंवा संशयास्पद योजनांमध्ये आर्थिक वा मानसिक गुंतवणूक टाळा. भावनात्मक निर्णय घेताना काळजी घ्या. काही विचित्र बातम्या कळू शकतात. गुंतलेले तिढे सावकाश सोडवा.
शुभ दिनांक - 15, 18, 19, 20.
 
 
तूळ (Libra Zodiac) : कार्यक्षेत्रात आत्मनिर्भर असावे
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या व्यय स्थानातून सुरू होत आहे तर आपला राशिस्वामी शुक्र लाभस्थानात उत्तम स्थितीत आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आत्मनिर्भर राहण्याचा प्रयत्न करा. कोणाच्याही जबाबदारीत गुंतणे टाळा. कोणाची हमी घेणे, जामीन घेणे टाळा. कारण दुसर्‍याच्या चुकीने आपणास नाहक मनस्ताप भोगावा लागू शकतो. त्यामुळे आपली पत-प्रतिष्ठा अडचणीत येऊ शकते. मित्र व सहकारी यांचा हस्तक्षेप कामापुरताच राहील, याची काळजी घ्या. या आठवड्यात खर्चाला जरा अधिक पाय फुटलेले राहतील, ते आटोक्यात ठेवावेत. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.
शुभ दिनांक - 16, 17, 18, 20.
 
 
वृश्चिक (Scorpio Zodiac) : आर्थिक घडी व्यवस्थित बसेल
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील लाभ स्थानातून सुरू होत आहे. ही स्थिती काही भाग्यकारक घटना, कौटुंबिक समाधान व कार्यक्षेत्रातील आर्थिक व मानसिक समाधानास उपयुक्त आहे. त्यामुळे या सप्ताहात काही उपयुक्त घटना अनुभवास येऊ शकतात. मात्र, यासाठी एक तंत्र आपणास अवलंबावे लागू शकते, ते म्हणजे मोठी उडी घेण्यासाठी दोन पावले मागे जाणे. हाती आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी प्रसंगी या तंत्राचा वापर करा. फायदाच होणार. आर्थिक निश्चितता दूर होऊन घडी व्यवस्थित बसेल.
शुभ दिनांक - 14, 17, 18, 19.
 
 
धनु (Sagittarius Zodiac) : वादविवाद, मतभेदापासून दूर 
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील दशम या प्रथम दर्जाच्या कर्म स्थानातून सुरू होत आहे. आपला राशिस्वामी गुरू सुस्थितीत असून अर्थत्रिकोणाला बळ देत आहे. यामुळे नोकरी-व्यवसायात उत्तम संधी लाभणे, काही महत्त्वाच्या घडामोडी घडणे अनुभवास यावे. कोणत्यादी वादविवाद, मतभेदापासून स्वतःस दूर राखण्याची गरज आहे. कोणत्याही वादात सहभागी होऊ नका. कार्यक्षेत्रात आपली वाट वेगळीच ठेवणे फायद्याचे राहील तसेच या सप्ताहात वाहन चालवताना काळजी घ्या. रात्रीचा प्रवास शक्यतो टाळा. कुटुंबीयांना विश्वासात घेऊन कामे करावीत.
शुभ दिनांक - 14, 15, 19, 20.
 
 
 
मकर (Capricorn Zodiac) : स्वतःच्या विवेकाने निर्णय घ्या
या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या भाग्य स्थानातून सुरू होत आहे, त्याचवेळी राशिस्वामी शनी धनस्थानी आहे. ही अतिशय उपयुक्त व भाग्यकारी स्थिती आहे. यामुळे आपली आर्थिक कामे या सप्ताहात वेगाने होण्याची शक्यता आहे. नोकरीत काही चांगल्या संधी मिळू शकतील. व्यवसायात असणार्‍यांना विस्ताराच्या योजना राबविता येतील. गुंतवणुकीचाही विचार करता येईल. दरम्यान, कार्यक्षेत्रात केवळ गप्पा व बढाया मारणार्‍यांपासून जरा दूरच राहा. त्यातून काहीच साध्य होत नसल्याचे कळून येईल.
शुभ दिनांक - 15, 18, 19, 20.
 
 
 
कुंभ (Aquarius Zodiac): स्वभावात रोखठोकपणा हवा
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील आठव्या या पीडादायक स्थानातून सुरू होत असले, तरी राशिस्वामी शनी आपल्याच राशीत असल्याने काही किरकोळ त्रास वगळता संपूर्ण सप्ताह सुस्थितीत व समाधानाने व्यतीत करता येऊ शकेल. विमा, वारसासंबंधी काही कामे प्रलंबित असतील तर त्यांना वेग देता येईल. व्यावसायिक प्रवास दौर्‍यातून अपेक्षित लाभ पदरी पाडून घेता येईल. नवे व्यावसायिक प्रस्ताव, करार अस्तित्वात येऊ शकतात. आपल्या मोकळ्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेणार नाहीत, याची काळजी घ्या. स्वभावात रोखठोकपणा आणावा लागेल.
शुभ दिनांक - 14, 15, 16, 20.
 
 
 
मीन (Pisces Zodiac) : लाभकारक घटना घडतील
Weekly Horoscope : या आठवड्यात चंद्राचे भ्रमण आपल्या कुंडलीतील सप्तम या कौटुंबिक व वैवाहिक सुखाच्या स्थानामधून सुरू होत आहे. याच चंद्राच्या प्रभावामुळे कार्यक्षेत्रातील प्रभाव, पराक्रम वाढणे, काही लाभकारक घटना घडणे व आपले व्यक्तिमत्त्व वाढीस लागण्यास मदत मिळेल. राशिस्वामी गुरू लाभस्थानात शुभंकराची भूमिका वठवीत आहे. गुंतवणुकीच्या योजना विचाराधीन असतील तर सावधपणे अंमलात आणा. पुरेशा विचारानंतरच आपले निर्णय स्वतः घ्या. कुणाच्या आहारी जाणे नको की उतावळेपणा नको. सोयीचा काळ असला, तरी सध्या सावध पवित्राच योग्य ठरेल.
शुभ दिनांक - 15, 17, 18, 19.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746